आत्माराम - समास २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥    
जयजय सच्चिदानंदा । जयजयाजी निजबोधा । जयजयाजी आनंदकंदा । परमपुरुषा ॥१॥
अनंत ब्रह्मांडें ढिसाळें । मायेनें रचिलें विशाळें । तुमचे कृपेचेनि बळें । विरती स्वान्मदडोहीं ॥२॥
आतां स्वामीनें जें इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारिलें । शरणागत आपुलें । उपेक्षूं  नये ॥३॥
नाशिवंत काय टाकावें । तें मज स्वामींनीं सांगावें । मज दातारें करावें । आपणाऐसें ॥४॥
ऐकोनि शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें । अवधान देऊनि घेणें ॥५॥
शिष्या बहुत मन घालीं । आतां बाष्कळता राहिली । तेथें वृत्ति चंचळ केली । तरी बुडशी ॥६॥
अग्रिसंगें लोह पिटे । पिटतां तयाचा मळ तुटे । परिसासि झगडतां पालटे । लोहपण तयाचें ॥७॥
जयाचा मळ जळेना । अभ्यंतरहि वळेना । तरी तें सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥८॥
नाशिवंत तितका मळ । तुवां त्यजावा अमंगळा । तो गेलिया तूंचि सकळ । आहेसि बापा ॥९॥
नाशिवंत तूं जाण माया । मायिक जाईल विलया । ते मायाचि प्राणसखया । ऐक सांगतों ॥१०॥
अहं ऐसें जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण । मायेपासून त्रिगुण । गुणापासोनि भूतें ॥११॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । सृष्टि रचिली सावकाश । एवं दृश्य आणि अदृश्य । सकळ माया ॥१२॥
एक माया दों ठायीं वांटिली । प्रकृति आणि पुरुषें झाली । जैसी दो दिवसांची बोली । एकचि परवा ॥१३॥
माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान । माया ध्येय ध्याता ध्यान । माया हेंचि समाधान । योगियांचें ॥१४॥
ऐशी माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद । माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥१५॥
आत्मा ब्रह्मस्वरूप । हें मायेचें निजरूप । रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥
जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचा विस्तार । शिवरूप विश्वंभर । अवघी माया ॥१७॥
माया मनासी चाळक । माया बुद्धीस व्यापक । माया अनेकीं एक । ऐसें बोलणें ॥१८॥
माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी । माया द्रष्टयास दाखवी । नेत्रीं रिघोनियां ॥१९॥
मायेनें माया चाले । मायेनें माया बोले । मायेनें माया हाले । वायुरूपें ॥२०॥
तंव शिष्य म्हणे जी तात । माया चाले स्वरूपसत्ता । अरे सत्ता ती तत्त्वतां । माया जाण ॥२१॥
तरी मायेनें स्वइच्छा असावें । स्वरूपसत्तेनें नसावें । मनास आलें तैसें करावें । हें केंवीं घडे ॥२२॥
लटिक्यावरी खरें चाललें । लटिकें मर्यादेनें राहिलें । तें गर्भांधें । हे अघटित वार्ता ॥२३॥
तैसी माया ही मानिली । स्वरूपसत्तेनें चालली । तुवां गर्भांधें । हे वार्ता सांगसी ॥२४॥
जें झालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता । ऐसें हें ज्ञातेपणें बोलतां । तुज लाज नाहीं ॥२५॥
सकळ माया म्हणतां । आणि झालीच नाहीं ही सांगतां । तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥
अरे जें जें मनास अनुभवलें । तें तें मायिक नाथिलें । तितुकें तुवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥
सळहि माया नाथिली । स्वरूपीं नाहीं राहिली । एवं नाहीं हे बोली । माया जाणावी ॥२८॥
एवं सांगतों तें ऐकावें । मायिक मायेतें जाणावें । आतां मनन करावें । सावध होवोनि ॥२९॥
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माया भासे । मायेकरितां लाभ असे । परमार्थाचा ॥३०॥
माया भवसिंधूचें तारूं । माया पाववी पैलपारू । मायेवीण उद्धारू । प्राणियांसि नाहीं ॥३१॥
मायेकरितां देवभक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त । मायेकरितां जीवन्मुक । होती स्वानुभवें ॥३२॥
मायेकरितां वेद श्रुती । मायेकरितां वित्पत्ती । मायेकरितां होती । मूढ ते विवेकी ॥३३॥
माया परमार्थाचें अंजन । मायेकरितां जोडे निधान । मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥३४॥
मायेकरितां स्वहित घडे । माये-करितां भ्रांति उडे । मायेकरितां बिघडे । प्रपंचभान ॥३५॥
मायेवीण ज्ञान कैंचें । माया जीवन सकळांचें । मायेवीण साधकाचेम । कार्य न चले ॥३६॥
मायेवीण परमार्थ जोडे । ऐसें हें कधींच न घडे । मायेवीन सहसा नातुडे । गूज योगियांचे ॥३७॥
माया योग्यांची माउली । जेथील तेथें नेऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥३८॥
सकळ मायेचें रूप झालें । त्यांत तुझेंहि रूप आलें । हें इतुकेंहि आपुलें । मानूंचि नको ॥३९॥
आतां सांगतों तुज खूण । त्वां नाशिवंत केलें मदर्पण । आतां करिशील हलकेपण । तरी मज शब्द नाहीं ॥४०॥
संग तितुका नाशवंत । नि:संग शब्द अशाश्वत । म्हणोनि संगानि: संगातीत । होवोनि राहें ॥४१॥
पुढेले अध्यायीं निरूपण । आदरें करावें श्रवण । संगातीत होईज ते खूण । सांगिजेल पुढें ॥४२॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम । योगी पावती विश्राम । जयेठायीं ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP