मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|भीमरूपी स्तोत्रे| नमन गा तुज हे भिमराया । न... भीमरूपी स्तोत्रे भीमरूपी महारुद्रा । वज्रह... जनीं ते अंजनी माता । जन्म... कोपला रुद्र जे काळीं । ते... अंजनीसुत प्रचंड । वज्रपुच... हनुमंता रामदूता । वायुपुत... कपि विर उठला तो केग अद्भ... रुद्र हा समुद्र देखतांक्ष... भुवनदहनकाळीं काळ विक्राल ... लघूशी परी मूर्ति हे हाटका... चपळ ठाण विराजतसे बरें । प... नमन गा तुज हे भिमराया । न... भिम भयानक तो शिक लावी । भ... बळें सर्व संहारिलें रावणा... भीमरूपी स्तोत्र - नमन गा तुज हे भिमराया । न... श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. Tags : hanumanmarutiramdassamarthaमारूतीरामदाससमर्थहनुमान भीमरूपी स्तोत्र Translation - भाषांतर नमन गा तुज हे भिमराया । निज मती मज दे मज गाया । तडकिता तडकी तडकाया । भडकितां भडकी भडकाया ॥१॥हरुषला हर हा वरदानीं । प्रगटला नटला मन मानी । वदविता वदनीं वदवितो । पुरवितो सदनीं पदवी तो ॥२॥अवचितां चढला गडलंका । पळभरी न धरी मनिं शंका । तडकितां तडकी तडकांतो । भडकितां भडकी भडकीतो ॥१॥खवळले रजनीचरभारें । भडकितां तडके भडमारें । अवचितां गरजे भुभुकारें । रगडिजे मग काम दळ सारें ॥४॥कितियका खरडी खुरडीतो । कितियका नरडी मुरडीतो कितियका चिरडी चिरडीतो । कितियका अरडीं दरडीतो ॥५॥बळि महा रजनीवर आले । भिम भयानकसेचि मिळाले । रपटितां रपटी रपटेना । अपटितां अपटी अपटेना ॥६॥खिजवितां खिजवां खिजवेना । झिजवितां झिजवी झिजवेना । रिझवितां रिझवी रिझवेना । विझवितां विझवी विझवेना ॥७॥झिडकितां झिडकी झिडकेना । तडकितां तडकी तडकेना । फडकितां फडकी फडकेना । कडकितां कडकी कडकेना ॥८॥दपटितां दपटीं दपटेना । झपटितां झपटी झपटेना । लपटितां लपटी लपटेना । चपटितां चपटी चपटेना ॥९॥दवडितां दवढी दवडेना । घडवितां घडवी घडवेना । बडवितां बडवी बडवेना । रडवितां रडवी रडवेना ॥१०॥कळवितां कळवी कळवेना । खवळितां खवळी खवळेना । जवळितां जवळी जवळेना । मळवितां मळवी मळवेना ॥११॥चढवितां चढवी चढवेना । झडवितां झडवी झडवेना । तडवितां तडवी तडवेना । गडवितां गडवी गडवेना ॥१२॥तगटितां तगटी तगटेना । झगटितां झगटी झगटेना । लगटितां लगटी लगटेना । झकटितां झकटी झकटेना ॥१३॥टणकितां टणकी टणकेना । ठणकितां ठणकी ठणकेना । दणगितां दगणी दणगेना । फुणगी फुणगेना ॥१४॥चळवितां चळवी चळवेना । छळवितां छळवी छळवेना । जळवितां जळवी जळवेना । टळवितां टळवी टळवेना ॥१५॥घसरितां घसरी घसरेना । विसरितां विसरी विसरेना । मरवितां मरवी मरवेना । हरवितां हर्वी हरवेना ॥१६॥उलथितां उलथी उलथेना । कलथिना कलथी कलथेना । उडवितां उडवी उडवेना । बुडवितां बुडवी बुडवेना ॥१७॥बुकलितां बुकली बुकलेना । धुमसितां धुमसी धुमसेना । धरवितां धरवी धरवेना । सरवितां सरवी सरवेना ॥१८॥झडपितां झडपी झडपेना । दडपितां दडपी दडपेना । तटवितां तटवी तटवेना । फटवितां फटवी फटवेना ॥१९॥वळवितां वळवी वळवेना । पळवितां पळवी पळवेना । ढळवितां ढळवा ढळवेना । लळवितां लळवी लळवेना ॥२०॥घुरकितां घुरकी घुरकावी । थरकितां थरकी थरकावी । भरकितां भरकी भरकावी । झरकितां झरकी झरकावी ॥२१॥परम दास हटी हटवादी । लगटला उतटी तटवादी । शिकवितां शिकवी शिक लावी । दपटितां दपटून दटावी ॥२२॥॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP