मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|चक्रव्यूह कथा| प्रसंग चवथा चक्रव्यूह कथा माहिती व विवेचन प्रसंग पहिला प्रसंग दुसरा प्रसंग तिसरा प्रसंग चवथा प्रसंग पांचवा प्रसंग सहावा चक्रव्यूह कथा - प्रसंग चवथा श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत. Tags : krishnadaspoemकविताकृष्णदासमराठी प्रसंग चवथा Translation - भाषांतर ॥ श्रीकृस्णरायायन्मा : ॥श्री॥ ॥श्री॥ ॥श्री॥श्रीकृस्ण आर्जुन तेथें गेलें : तवं टहुटाळके पाचारीले : तुम्ही अनंत पवाडे केलें : म्हणौनि युध्यासी बोलावीलें : ॥४॥मग बोलीला प्राराक्रर्म : आतां तुम्हासी संग्रामी करीन संभ्रम : आता नीवडेल तुमचा भ्रम : सांहे मात : ॥५॥म्हणौनी आमिते बाण : आर्जुने वरच्यावर तोडुन : तव आज्ञी शस्त्रें घालुन : तवं आज्ञि प्रजळला ॥६॥त्या आज्ञीतें देखिलें : आर्जुनें प्रजयेशस्त्रें घातले : तेण आज्ञितें निवारीलें : मग तेणें प्रहरीला वायो ॥७॥पार्थे पन्नकाशस्त्रें घातलें : तेणें पंन्नक चालीलें : तवं टहुटाळके प्रहरीलें : गरुडाशस्त्रें ॥८॥तेणे पंन्नक गीळीलें : मग आर्जुन्ये काये केलें : ऐसी बहुत आसतीलें : आता नीर्वाण करू ॥९॥आता पाठवा बंदिजन : तुम्ही बोलावीलें आम्हालागुन : ऐसी बहुत वींदान : थोडी आसती : ॥१०॥तेणे पार्थे तयाते : हाणीतले टहुटाळकाते : तेणे तोडिले त्या बाणाते : मग हाणीतले सात बाण ॥११॥च्यार्ही चहु वारुवासी : येके भेदला सारथीयासी : दोन लागले टहुटाळकासी : तेणे त्यासी मुर्छेना आली : ॥१२॥तेणे सांडिला तो रथ : गेला आपुलिया दळात : तवं पाठि लागला तो पार्थ : वर्सला सरधारी ॥१३॥बाण येती घनदाट : सैन्य अवघे घायवंट : पाडिले विर सुभट : बारा वाटा सैन्यासी ॥१४॥बाणापाठि येती बाण : आती तीखट दारूण : बहुत पाडिले रण : तीयेवेळी : ॥१५॥बहुतदळ आटाले : तवं टवटाळके काये केलें : मावेतें स्मरीलें : आवघे जाले तेजमये : ॥१६॥उदकाचे कलोळें : वाहती नदीचे खलाळे : ऐसें देखिलें डोळा जळें : पार्थवीरे : ॥१७॥रथ गज नगर : वाहात असति आपार : ग्रामगृहे (सु)स(र)(म)गरः जाताति वाहत ॥१८॥ऐसा माहापुर बहुत : देखितां जाला पार्थ : मग म्हणे देवातें : आतां निगीजे वेगी : ॥१९॥उदकाचा माहापुर : वाहुन जाईल रहीवर : ऐथें न चले वीचार : धनुरवीद्येचा ॥२०॥ते वेळीं श्रीकृष्णनाथ : नाभी म्हणती आर्जुनातें : तुज दावीन वैरीयाते : हे माव राक्षेसी ॥२१॥दैत्याची या मावा : न कळती समस्ता देवा : आर्जुन म्हणे केसवा : दावी प्रचीती : ॥२२॥बहुत युध्ये मागा जाली : परि हे माव नाही देखली : देवे मंत्रुनी रक्षा टाकीली : तंव उदक न दीसे : ॥२३॥काही न दीसे पुर : मग देखिला दळ्भार : मग म्हणे सारंगधर : याचा मृत्यु मी सांगेन : ॥२४॥टवटाळक नावयासी : तुज सांगेण परीऐसी : तळवातळ हात अन टाळुसी : भेदी एकचि बाणे : ॥२५॥हे सांगतिले श्रीकृष्णनाथे : मग वीनवीलें पार्थे : भेदीन तीनी ठाया यातें : यातें : ऐसे म्हणिता जाला : ॥२६॥देवो म्हणे परी ऐसी : तु कैसा याते भेदीसी : तरि सांगै मजपासी : पंडुसुता : ॥२७॥पार्थ म्हणे पुर्वामुख : भेदीन उर्ध वीषेख : ऐसें लक्षण देख : छेदिन दैत्याची ॥ ऐसें पार्थ बोले : ते देवाच्या मना आले : मग चालीयलें : तयावर्ही ॥२८॥तवं टहुटाळके दैत्यनाथे : वेढिले आर्जुनातें : हाणता शस्त्रेंघात : लक्षे क्रोडी ॥२९॥त्याची शस्त्रें तोडुनि : वीद्या जपे मोहनि : शस्त्रेंजाळ घालुनी : मोहीता जाला ॥३०॥देति जांबया आंगमोडे : सैन्य नीद्रा येउनी पडे । मग रथावरी पहुडे : टवटाळक तो : ॥३१॥तो नीट चरण पसरी : मग धनोरजयो संध्यांन करी : भेदी तीये आवस्वरी : तळवातळ हात टाळु ॥३२॥भेदुन तळवातळहाता : वाण जाला नीगता : मग भेदीला माथा : तयांचा पै : ॥३३॥या परी दैत्यारी मारीले : मग सीर छेदिले : कबंध पाडीलें : धरणीवरी : ॥३४॥मग मोहोनीशस्त्र काढिलें : सैन्य सचेतन जालें : तेहि पडिला देखीलें : टहुटाळकाते ॥३५॥मग हाहाकार जाला : वीरा पळ सुटला : मग पार्थ बोलीला : देवरायासी : ॥३६॥काऐ वर्तलें आसेल तेथें : माझीये उदरी लोळे फीरते : सोध झडकरी पेलीजे रथे : आप्ण जाउं वेगी : ॥३७॥देव जवं ज्ञानी पाहे : तवं आभीमन्या पडीला आहे : देवो काये म्हणता होये : तीयेवेळी ॥३८॥द्रोण धनोर्धर थोर : त्या समोर न राहे वरकोदर : जरी धरीला युध्येस्टीर : तरि कार्य नासलें : ॥३९॥ऐसे पार्थ आसे बोलत : मेलीकारा पावला त्वरीत : तव कोल्हाळ आईकत : दोघेजण : ॥४०॥आर्जुन म्हणे मुरारी : कोल्हाळ होताये मेलीकारी : काही वीपरीत परी : जाली असे : ॥४१॥मेलीकाराजवलि आले : स्थातळी उतरले : धनुस्य भाते ठेवीलें : तव आले वैराट द्रोपद : ॥४२॥तयातें आर्जुन पुसे : हा कोल्हाळ काईसा आसे : तयातें देव म्हणत आसे : चला सामोर ॥४३॥ऐसे देव बोलीला : तवं ते भीम आला : तेणे हांबरडा हाणीतीला : मग सांगता जाला ॥४४॥आभीमन्याची वेवस्ता : भीम जाला सांगतां : मूर्छना आलि पार्था : मग पडला धरणीवरी ॥४५॥अर्जुन उचलीला : धर्मापासी नेला : तव कोल्हाळ जाला : लकुळशाहादेवाचा ॥४६॥मुर्छना आली पार्थासी : भीम धरीला पोटेसी : कृस्ण म्हणती आर्जुनासी : ऐसे यास काई कीजे ॥४७॥मग सावध होउन : लेकरु युध्यासी पाठवण : ऐसा बहुत कोपुन : धर्मावरी ॥४८॥असतां ईतुका दळभारु : युध्या पाठविले लेकरु : या वडिलास काऐ करु : मग धर्म बोलीला ॥४९॥चक्रवीहु रचीला : भीम संग्रामा पाठवीला : सात क्षेवणिने वेढिला : मग आला आम्हावरी ॥५०॥द्रोपदाते जिंतिले : सैन्य अवघे भंगले : मग आमते धरीले ते सोडवीलें : वरकोदरे क्षणामाजी ॥५१॥भीम येकला वेढिला : तो सर्वाआंगी खोचला ॥ थोर मूर्छागत जाला : मग आले दळ टाकोनी : ॥५२॥ईतुके जवं जाले : तवं द्रोणे भाट पाठवीले : संग्रामासी बोलावीलें : तव भीम मुर्छनागत : ॥५३॥चक्रवीहुचा मारू : भाट बोलेंती बडीवारु : मग तुमचा तो कुमरु : उठीयला : ॥५४॥तो नीघाला संग्रामासी : आम्ही वर्जिले तयासी : अभीमन्ये मात केली कैसी : चक्रवीह भेदीला : ॥५५॥भीम होता वेढिला : तो त्याने सोडवीला : अभीमन्ये संव्हार केला : कौरवात : ॥५६॥पुनरपी चक्रवीहु भेदीला : कुमर लक्षीमन मारीला : द्रोणकर्ण पळवीला : मार केला सैन्यासी : ॥५७॥आस्वास्थामयासी : जिंतीलें सरजाळे समस्तसी : ख्याती केली ऐसी :तुझेनी पुत्रे : ॥५८॥मग समस्ति वेढीला : ते बहुत हा येकला : ऐसा जाला ऐक वेळा : काये कीजें पार्था ॥५९॥तु म्हणतांसी लेकरू : परी तो सासाअर्जुनाचा अवतारु : तो जाणे मार्गु : चक्रवीहुचा ॥६०॥ऐसे धर्म बोलीला. तवं आर्जुन कोपला : आम्हा वनवास जाला : तुमचेनि बोलें ॥६१॥गांधार गंधर्वि धरूनि नेला : तो तुम्ही सोडवीला : वैरभाव होतां तुटला : राज्ये आपुले होते ॥६२॥आता काऐ आठउ जीवी : तुम्ही रीती केली बरवी : संतोषें तुमचा जीवी : कुमर आधी मारवीला : ॥६३॥ऐसा बहुता परी कोपला : हातें खर्गासी घातला : तो श्रीकृस्णे धरीला : मग नेला येकांतासी ॥६४॥त्यासि जाला सीकवीता : धर्म पंडुपस्ये मान पीता : त्यासी प्रवर्तलासी घाता : काऐ आता तुज म्हणु : ॥६५॥क्षेत्रधर्म पुत्रे केला : धर्म वाया दुखविला : तुवा आपराध थोर केला : जाय लाग चरणासी : ॥६६॥देवासि म्हणे पार्थ : माझा अपराध जाला बहुत : मी करीन अपघात : मुख केवी दाउ धर्मासी ॥६७॥कृष्ण पार्थासी म्हणे : आपघात न लगे करणे : पुत्राचा कुढावा करणे : हे विचारा पा : ॥६८॥आता धर्माची स्तुती करावी : झडकरी त्याते बुझावी ; रणभुमि सोधावी : अभीमन्याची : ॥६९॥मग आले धर्मापासी : आर्जुन लागला चरणासी : नीष्टुर बोलीलो तुम्हासी : घात आपुला करीन : ॥७०॥क : मग कढंवाचा खंजीर काढीला : धाउनी भीमाने धरीला : काये म्हणता जाला ; आर्जुनासी : ॥७१॥तुम्हा ऐसे जाले मरण : आभीमन्याच्या सुड घ्यावा कवण : कौरवा नीपात करण : वायावीण का मरतां : ॥७२॥नीर्वाळा कौरवा : सुड आपुला घ्यावा : मग भलता वीचारु करावा : जीवासी तुम्ही ॥७३॥मग म्हणे योधीष्ठिरु : मग वर बोलीला वरकोदरु : हा बरवा केला वीचारु : आम्हास मानला : ॥७४॥ते वेळी तो पार्थ : आस्तुति करीत : आसुराचा केला घात : जगन्नाथ मानवला : ॥७५॥खांडववना आज्ञी दीधली : त्रीलोक्यें जींतीली : उत्तरे गोग्रहणी नागवली : कौरव समस्तें ॥७६॥ऐसी आस्तुत करीता : वीस्तारा जाईल कथा : आर्जुन जाला नीगतां : रणभुमीसी ॥७७॥सकळ सैन्यासी : अर्जुन आला रणभुमीसी : पडले देखिलें अभीमन्यासी : मग तयांसि काये बोले ॥७८॥घाईचुर्ण असे जाला : परी आत्मा नाहि गेला : मग काये म्हणता जाला : आर्जुनासी ॥७९॥म्या प्राण धरी कंठी : जे तुम्हासि होईल भेटी : आईक ताता जगजेठी : मी म्हणे ते परीसांवें ॥८०॥मी रणि पडिला : तवं जईद्रथे पापर हाणीतीला : तेणे दुखवला : प्राण माझा : ॥८१॥मग आर्जुन म्हणें अभीमन्यासी प्रभातें वधीन जईद्रथासी : हे सर्वथा माझी भाक ऐसी : जाण सत्ये : ॥८२॥प्रभाते जरी न मारी : तरी स्वान पातेल माझे सरीरी : त्याते न मारी : करीन आज्ञीप्रवेस ॥८३॥त्याचा न करी वध : तरी प्राणासी करीन खेद : हा वडीलाचा बोध : याचे पतन मज : ॥८४॥आपुलीया उदरपोसनाकारणे : पुडिलाचें बोले उणें : तेणे लीपीजे पतने : सत्ये जाणा ॥८५॥जरी मी तयांसी न मारीता : तरि प्रतिज्ञा बहुतां : पार्थ जाला बोलेतां : सांगतां होईल विस्तारु : ॥८६॥ऐसे पार्थ बोलीला : मग अभीमन्ये प्राण सांडिला : मग क्रीया कर्म करीता जाला : पार्थ वीरू : ॥८७॥आर्जुनाची बोली : दुतने आईकीली : तेही सांगीतली : दुर्योधनापुढें ॥८८॥मग दुर्योधन बोले : जईद्रथासि पाहिजे राखिले : मग द्रोणासी सांगीतिलें : तयावेळीं ॥८९॥यावरी द्रोण म्हणे : जैईद्रथासी राखिन : आज्ञीप्रवेस करवीन : पार्थाकरवी ॥९०॥आतां पांडवात : समर्थ येक पार्थ : तो आपणया करील घात : येराचा अंत पुरविन : ॥९१॥ऐसा जाला वीचारीता : तेथे पांडवाचा दुत होता : तेही जाणवीली धर्मासी वार्ता : भीमा आर्जुनासी ॥९२॥मग पांडव आले श्रीकृस्णापासी : तेही सांगीतले तयांसी : मग म्हणे ह्रसीकेसी : याचे काऐ भये : ॥९३॥देव ह्मणे पंडुसुतां : मी जवळी असतां : कैसा राखतील जईद्राथा : प्रभा ते जान वैल : ॥९४॥ते कर्मली नीसी : उदयो जाला दीनकरासी : पार्थ म्हणे वीरासी वेगी पालाणा : ॥९५॥सैन्य सावध केलें : मग कृस्णापासि आले : समस्त पायां लगले : सोडोस उपचारी ॥९६॥देव रथि बैसले : पुडा दळभार चालीले : रणतुरा गजर जालीले : मग आले रणभुमिसी : ॥९७॥तवं ऐरीकडे दुर्योधने : सामधी केली सैन्ये : मग काये केले द्रोणे : ते परीयेसा पां : ॥९८॥पालाणोनी बाहीर आला : मग गुरु काये करीता जाला : वीहु चहुकडे रचीला : मधे घातला जईद्रथ : ॥९९॥मग जन्मोजया म्हणे : त्या वीहुचि नावं कवणे : मग वैसंपायेन म्हणे : परीयेसी राया : ॥४००॥सुचिकावीहु संकटवीहु : त्यामधे कृस्णवीहु : चवथा चक्रवीहु : परीऐसा पा ॥१॥याचहुआत : घातला जईद्रथ : आता कैसा वींधील पार्थु : सवं देवें कौसालीया : ॥२॥ऐसे च्यार्ही वीहुते रचीलें : मग रणभुमीसी आलें : ते आर्जुने देंखिलें : (मग) म्हणतीले भीमासी : ॥३॥द्रोपद आणी वैराट : दुस्टदुन्म सुभट : मी पुढा करीन वाट : वीर आदट संव्हारीन : ॥४॥तुह्नि चौघी मिळुनी : कौरव पाडावे रणी : आसुध वाहे धरणि : ऐसे करावं ॥५॥ऐसा करावामारू : ना म्हणावा साना थोरु : सोधे कौरवोदळाचा करा शंव्ह रु : बहुत करावा : ॥६॥कोंतीभोज वीरराज : शीशुपाळ आत्मज : पराक्रर्म सहज : जाणवलें तुमचा : ॥७॥आजिचा दिवस : कौरवा घेउ द्या उलास : ऐसे बोले ह्रसीकेस : तया वेळी : ॥८॥नकुळ शाहादेवें : धर्मापासी असावें : बरवियापरी राखावे : ऐसी आज्ञा दिधली : ॥९॥संख स्फुरीला देवोदंत : ध्वजी भुभुकार करी हनुमंत : मग उठीवोला पार्थ : बाणि वरसला : ॥१०॥तेथें संग्राम थोर जाला : पार्थाने गुरू हाणीतीला । घोडे सारथी मारीला : पडले देखा : ॥११॥तो वीरथी करोनी : संवंचि वीहु भेदुनी : कौरवा मार करूनी : तवं भीम काये करी : ॥१२॥गजाने गज हाणे गाढा : मारी घोडयाने घोडा :ऐसा करी रगडा : कौरवसैन्याचा : ॥१३॥रथानें रथ हाणे : घे घे पुढिलाते म्हणे : ऐसे दळ संहारुन : कौरवचे देखा : ॥१४॥वैराटे द्दपद मार केले : दुष्टद्युम्ने संव्हारीले : मग पाचारीले : सुर्योनंदना : ॥१५॥तोही खडतर बानी हानीतला : कर्ना जीव्हारी खोचला : मग भीम काय करीता जाला : ते आवोधारा राया : ॥१६॥गदा घेउनि करी : धाविनला कर्णावरी : वारु मारीले च्यांर्ही : आनि सारथि पाडीला । ॥१७॥तो वीरथि जाला : आणिके रथासि गेला : तव तेथें पावला : सुभट अस्वस्थामा : ॥१८॥द्रुपद आणि वैराट : सैन्यासि भेवंडिला आट : तेथ पावोला सुभट : आस्वस्थामा ॥१९॥तो बाण वर्शत : त्या विराते पाचांरीत : ते तो देखे पार्थ : सींहनादें गर्जत : ॥२०॥पार्थे बाणी वरुशे : त्यामाजी आस्वस्थामा न दीसें : मग कर्ण द्रोण सरीशे : उठावले : ॥२१॥तेथें रणकंदन जालें : मग अस्वस्थामयातें सोडवीलें : तवं भीमसेने संव्हारीलें : कुंजरातें : ॥२२॥हस्ति धरुनि चरणी : येकात टाकि गगनी : येंक आपटी धरणी : आला लोटुनि पार्थापासी : ॥२३॥वैराट द्रुपदासि तेथें वेढिलें : त्यासि भीमे सोडवीले : रणी आणिक वीर मारीले : असंक्षात ॥२४॥द्दष्टद्युम्रें वेढिला होता : तो जाला येता : मग पार्थ जाला नीगता : भेदि चक्रवीहुते ॥२५॥दुर्योधन होता तेथें : तेणे देखीले पार्थाते : तो तेथुनी पळत : तयाते देखोनियां ॥२६॥त्यातें पार्थे म्हणे : राहे राहे जासि झणे : म्हणों हाण हाणे सत्राणें : साता बाणी ॥२७॥च्यार्ही चहुं वारुवासी : ऐक भेदला सारथीयासी : दोन भेदले गांधारासी : तेणे तयासी मुर्छना आली ॥२८॥तव कर्ण द्रोण आले : दुर्योधनासी पाठीसी घातले : मग काय करीते जाले : भीम आर्जुन : ॥२९॥कर्णा आणि द्रोणासी : संग्राम जाला अर्जुनासी : ते सांगेन परिऐसी : माहा दारुण : ॥३०॥ते वेळी वरकोदरु : धाविनला वेगवत्तरु : उचलीला रहवरु : कर्णवीराचा ॥३१॥रथ धरीला मकरतोंडी : वेढे च्यार्ही भोवंडी : तवं कर्णे घातली उडी : रथाखालुती : ॥३२॥रथ भुमिसी आपटी : तो वीर जगजेठी : तव द्रोणे शरदाटी : केळी देखा : ॥३३॥ते देखीले पार्थे : घातलें सरजाळाते : भीम हाणे द्रोणातें ॥ गदाघातें : ॥३४॥भीम हाणे जाणौनी : द्रोण गेला रथ सांडोनी : सारथी वारु मारूनी : भीम परतला : ॥३५॥तव तो पार्थ : सरजाळि वरूषत : सैन्ये संव्हारी बहुत : कौरवांचे : ॥३६॥थोर उठावला दळभारू : भोवतें शस्त्रेराचा पुरकलोळ : बानी खीलीले सकळ : तीये वेळी ॥३७॥तव हाहाकार जाला : भीम सींहीनाद गर्जला : भुभुकार केला : पवनपुत्रें ॥३८॥संख स्फुरला देवदत्त : ब्रह्मादिक कापत : थोर जाला अकांत : कौरवासी ॥३९॥ते वेळी कृपाचार्याचा वीहु भेदीला : कौरवभार मोडिला : मग पळ सुटला : माहावीरासी : ॥४०॥कर्ण आणि द्रोण : गेले सकटविहु टाकुन : दारवटा बळकाउन : वीर राहीले ॥४१॥आस्वस्थामा कृतवर्मा : दुस्वाशान सुसर्मा : बहुत वीराचा सामा : दारवठा राहीला ॥४२॥सैल्य सोमदत्त : भुरीस्रवा भगदत्त : ऐसा मेळवा बहुत : राहीला आसे ॥४३॥अणीक नामनीके वीर : तेथें राहीले आपार : माहाकाळाचे जुंझार : भज भारी राहीले ॥४४॥दळ सात क्षेवणी : जाण राहीले बळकाऊनी : तवं पंडुनंदन : संधान करी ॥४५॥आर्जुनाचे बाण : अती तीखटे दारूण : बहुत पाडिले रण : कौरवांचे ॥४६॥हाका देती वीक्राळी : येकाहुनी येक बळी : भीमसेन तीये वेळी : रथाखाली उतरला : ॥४७॥गदा घेऊनी वेगी आला आत : मीसळला सैन्यांत : शस्त्री खोचला बहुत : मग पार्थ सोडवीला : ॥४८॥भीम गदाघाते : संव्हारी त्या दळाते : त्यासि वेढिल बहुते : शस्त्रें वर्शताती : ॥४९॥तेथें अर्जुन आला टाकुनी : सोडविलें भीमालागुनी : संकटवीहु भेदुनी : वाट केली भीतरी : ॥५०॥तो आर्जुन येकला : संकटवीहुमाजि गेला : शस्त्राचा पुर वर्शला : कर्ण द्रोण आश्वस्थामा : ॥५१॥अणिक कौरव बहुत : तेही शस्त्रे वरुर्शत : त्या शस्त्राते तोडित : पार्थवीर ॥५२॥शस्त्रजाळ वर्शति कैसे : त्यामाजि आर्जुन न दिसे : सुर्यबींब झाकुळे जैसे : आभ्रामाझी ॥५३॥शस्त्राशस्त्री घनदाट : वीर वर्सती सुभट : गगनी नाहीं वाट : वारीयासी ॥५४॥प्रजन्यधारा कल्पांती : जैसे मेघ वर्सती : तैसे कौरव हाणीती : आर्जुनासी : ॥५५॥तयाचि शस्त्रे तोडित : तो पंडुचा सुत : आणी दळ संव्हारीत : कौरवाचे ॥५६॥बापु धनुर्धर जगजेठी : येकला बहुताते दाटी : वीर नींघत कपाटी : दाही दीशा ॥५७॥बहुत पाडिले रणी : आसुध वाहे धरणी : मग कर्ण द्रोणे करणी : काय केली : ॥५८॥न नागवे हा सुभट : सैन्या भवंडिला आट : आता चहुकुणी करु दाट : आर्जुनासी ॥५९॥येव्हडा वेग नाही मना : आर्जुनाचिया संधाना : तेही पंडुचीया नंदना : वेढिले चहुकुणी ॥६०॥हे चवघे धनुर्धर ॥ सस्त्रे हाणीती आती आपार : ते कौरववीर : हाणती पार्थासी : ॥६१॥द्रोण कर्ण आस्वस्थामा : चौघे वीर कृतवर्मा : हे वीर आर्जुना : हाणते जाले ॥६२॥बाणी भरले अंबर : सींहुनाद गर्जती वीर : बाण न माती धरणीवर : तीऐ वेळीं देखा ॥६३॥च्यार्ही चहुवारुवासि : येक भेदला सारथीयासी : दोन लागले तयासी : वक्षस्थळी : ॥६४॥आर्जुनाच्या बाणी : कृतवर्मा पाडिला रणी : मग कर्णाद्रोणालागोनी : सुटला पळ ॥६५॥तव हाहाकार जाला : कौरववोसर मोडला : तवं दीवस उरला : पाहार येक ॥६६॥देव म्हणे पार्थासी : उदक द्या वारूसी : त्रुस्या लागली सैन्यासी : उदक दीधले पाहीजे ॥६७॥मग बाण लावीला गुणी ॥ आणीली भोगावती मेदनी : उदकाचे कल्लोळ नीगती रणी : मग उदक घेतले ॥६८॥उदक सकळी घेतली : मग हो माहानदी प्रवर्तली : रणी द्रोणगुरू : ध्वजस्तंबि भुभुकारू : करी हनुमंत ॥७०॥संख स्फुरीला देवोदत्त : मग बोले पार्थ : द्रोणाते असे म्हणत : साहे मात : ॥७१॥तुम्हीं लपविला जईद्रथ : आता करीन नीर्धात : नाहि तरी नीपात : करीन समस्तांचा ॥७२॥जईद्रथाकारणे : का जाता प्राणे : ऐसे म्हणौनि हाणे शस्त्राने : आर्जुन तो ॥७३॥मग आणीक बाण घातले : ते कर्णे तोडीले : पार्थे त्याते म्हणतीले : आपुले वळ ना वीचारसी : ॥७४॥मग कोपला पार्थ : हाणीतीले कर्णाते : मारीले सारथीयाते : त्या समई ॥७५॥तो वीरथी जाला : आणीका रथासि गेला : तव द्रोण हाणीतला : आमीत्ये बाणी ॥७६॥ते बाण तोडीले : तवं अस्वस्थाम्याने हाणीतले : द्रोणे संधान केले : ते वेळी पाहा ॥७७॥मग बाण घातले कर्णे : पार्थ तोडी संधाने : आता सुचीकावीहु भेदणे : ते सांगैल कवि कृष्ण पंडीते ॥७८॥तीन चक्रवीहु भेदुन : पार्थ गेला तीही तडाकुन : चौथा चक्रवीहुचें भेदन : ते आईक श्रुत ॥ प्रसंग चवथा ॥४॥ ॥छ॥ ॥छ॥ ॥छ॥श्री सारस्वतीयेन्मा : श्रीगुरूभ्येयन्मा : N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP