चक्रव्यूह कथा - प्रसंग पहिला

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


क वाहे: तया वेगळा प्राण माझा न राहे ॥१६॥
करा रे करा भक्ती श्रीकृष्णकृपानीधीची : अनंत प्रभा कोटबिंब जयाची : करी कोण संखा तयाच्या रुपाची : अनंत लीळा स्वयं माधवाची ॥१७॥
कृपासींधु तो पैं क्रुपाळु जीवाचा : जगीं पुर्ण ठसा जयाच्या रूपाचा : तया सारीखा आणीक सखा कैचा । स्मरा रे स्मरा नाथ तो द्वारकेचा : ॥१८॥
ऐसे नमन केले देवाचे : आता अख्यान आइका चक्रवीहुचें : युद्ध जालें आभीमन्याचे : ते आइका ॥१९॥

आता नमिन श्रीकृष्णनाथ : जो नवाना (वानावा) अनाथाचा नाथ :तो नमिला सर्थ : श्रीकृष्णदेव : ॥१॥
आता नमो कृस्णशक्ती : जे कृस्णाची आंगकांती : ते नमू माया वेक्ती : प : कृपावंस ॥२॥
तीसरे नमन श्री गुऋनाथा : चरणावरी ठेवीला माथा : त्याही सांगीतली कथा : भारथी देखा : ॥३॥
अठरा ब्रह्महत्याचें दु:अ : जन्मोजयाचें गेलें देख : ते कथा तु आइक : जन्मोजया ॥४॥
ऐसी पुन्य पावन कथा : चक्रवीहु सांगेन आता : जन्मोजया : परिसतां : ते सांगे विस्णुदास पंडीतें : ॥५॥
भीस्मपर्वाभितरी : भीस्म पडला सरपंजरी : दुर्योधना दुख भारी : द्रोणाचार्याते म्हणत असे : ॥६॥
त्याचा सारथी श्रीहरी : भीस्म पडला सरपंजरी : ऐसें कौसाल करी : तो राखिल पांडवाते ॥७॥
असे बोलोन : मग संबोखिला दुर्योधन : ऐसे बोले द्रोण : तयांसि देखा ॥८॥
याउपरी दुर्योधन : मग बोलिला कर्ण : सुबळ अणी दुस्वासैन : हे हाकारीले ॥९॥
म्हणे आम्हासी जयाचा भरवसा : तयासी जाली असी दसा : हा विचार करावा कैसा : [ण :] रणवदु आतां कवणासी बांधीजे : ॥१०॥
मोडला आमचा आधारु : आता कवण असे वीचारु : आम्हासी दे नाभीकारू : तो  वीचार सांगीजे : ॥११॥
तयावरि बोले कर्ण । असे भारध्वजाचा नंदन : त्यासी प्रसन्न करुन : रनवटु बांधीजे : ॥१२॥
वाचा देतो स्राप मारी : मुखी वेद च्यार्‍ही : तो जरि अंगीकारकरी : आणील हारी पांडवासी ॥१३॥
हे मानलें समस्तासी : मग आले द्रोणापासी : गांधारु लागला चरणासी : म्हणे आम्हासी राखावें : ॥१४॥
मग द्रोण जाला बोलता : आम्हासी राखावें ना सर्वथा : पुडती पुडती ठेवी माथा : चरणावरी ॥१५॥
ह्मणौनी लोळे चरणावरी : कृपा भाकी नानापरी : मग ते अवस्वरी : द्रोणासी कर्ण बोलिला ॥१६॥
कायां मागतां आह्मासी : तयाचा अनुवाद न करीसी : दुर्योधन म्हणे परीऐसी : तुम्ही पांडवाते जींतावें : ॥१७॥
तेव्हेळी म्हणे द्रोणगुऋ : त्यासी सारथी सारंगधरु : भीस्मासारीखा वीरु : तोही रणासी आणीला ॥१८॥
तरी हा माझा नीधारु : जीत धरीन योधीस्टीरु : त्याचा सांगणें वीचारु : पुनरपी वनवास चवदा व (र्षें) पाठवीन : ॥१९॥
ऐसे भाकेसी कोंडावें : मग धर्माते सोडावें : पार्थासी वेगळे न्यावें : परीएसी वर्म येक : ॥२०॥
सैन्ये दो ठाई करावें : पार्थासी येकीकडे न्यावें : मग म्या धर्मासी धरावें : सत्ये जाणा : ॥२१॥
ऐसा केला वीचारू : टाकीला आपुला दळभारु : तव तेथे होता हेरू : पांडवाचा : ॥२२॥
हरे आले धर्मापासी : तेहि सांगीतले श्रीकृस्णासी : द्रोणे बुद्धी केली ऐसी : जे धर्मासी धरावें ॥२३॥
ऐसें मत वीचारीलें : ते तुमते सांगितलें : आता धर्मा धरतीलें : जीतची जाणा ॥२४॥
आर्जुणासी वेगळा नेती : द्रोणासमोर नही राहाती : आजीची कर्मुनी राती : मग भलते बिचारा : ॥२५॥
मग मेलीकारासी गेलें : थोर चींताग्रस्त जाले : ते वेळी भीम बोलीले : आर्जुनासी : ॥२६॥
मग म्हणे वरकोदरू : काही चींता नका करूं : रणामाजी द्रोणगुरू : मानवीन मी : ॥२७॥
ऐसें भीम बोलीला । तवं रात्रीचा अंत पुरीला । तवं उदयो जाला : दीनकरासी : ॥२८॥
मग द्रोणे काये केलें : विधि कर्माते सारीले : मग दान दीधले : द्वाजासी : ॥२९॥
सकळ सैन्ये पालाणौनी : घाव णीस्याना देउणी :दनानीली मेदनी : सींहीनादाने : ॥३०॥
तेथें पांडवाचे मेलीकारी : नीत्ये कर्म सारले वीरी : मग पुजीला श्रीमुर्‍हारी : पंडुकुमरी : ॥३१॥
तेव्हेली पांडव पालानती : नीस्याणी तुरंद्र वाजती : तेणे भुमी आसे कांपती : सींहीनादे देखा : ॥३२॥
दोन्ही सैन्ये जाली उनमंते : वेगळे न्यावं पार्थातें : मग मी धर्मातें : धरीन मी सत्ये : ॥३३॥
मग दुर्योधन म्हणे विरातें : वेगळे न्यावे पार्थाते : मग धर्माते धरीन जीतें : द्रोणचार्या ॥३४॥
वीडा घेतला करी : गांधार विराते पाचारी : तंव टहुटाळक विरी : हात पसरीला : ॥३५॥
तो म्हणे दुर्योधनासी : आजी युध्यें करीन अर्जुनासी ॥ जेणे जिंतिलें त्रीभुवनासी : आजि आम्हासी संग्राम : ॥३६॥
आह्मी जिंको त्या पार्थातें : तयाचा पुरविन अंत : परी जवळि असती श्रीकृस्णनाथ : त्यासि जिणता कवण असे : ॥३७॥
त्यासी करीन संग्राम : मानविन मेघस्याम : आजि नीवडिल भ्रम : आह्मा आनि पार्थाचा : ॥३८॥
ऐसै बोलोनि नीगुती : भाट अर्जुना पाठविती : मग बंदिजन सांगती : ते आईका सकळीक : ॥३९॥
ऐसे म्हणावे अर्जुनासी : तुम्हि जिंतिलें त्रीभुवनासी : आजि संग्राम आम्हासी : करावा तुवां : ॥४०॥
आणिक म्हणु येईल ते म्हणावे : परि त्यासी संग्रामासी आणावें : तेथें असतील द्वारकेरावे : त्याचे पवाडे पढावे : ॥४१॥
मग अर्जुनाचे पवाडे : पढिनले नीवाडे : तुम्ही जिंतले वीर गाढें ॥ म्हणौनि टहुटाळकी बोलीविलें : ॥४२॥
ऐसें बोलेती स्तुतिकारि : जी बीजे करावे झडकरी : आतां टहुटाळकासी जुझारी : घ्यावी तुम्ही ॥४३॥
पार्थ म्हणे श्रीकृस्णासी : आजि द्रोणें बुधी केली कैसी : आपण जाउ युध्यासी : तरि धर्मासी धरतिल : ॥४४॥
आम्हि संग्रामासी न जाणे : तरि सोमवंसासि ऐईलें उणे : धर्मासी राखावें कवणे : ते विचारा पा तुम्ही : ॥४५॥
मग बोले देव : सैन्य अवघे ठेबावे : भीमाने धर्मासी राखावें : तुम्ही जिताव टहुटाळकासी : ॥४६॥
मग  बोलाविले भीम सेनासि : आणि सकळा रायासी : श्रीकृष्ण ह्मणति तयांसी : तुम्ही राखावे धर्मातें ॥४७॥
ऐसे बोलोनी श्रीकृष्णनाथ : रथी बैसविला वीर पार्थ : मग म्हणतील समस्तात : तुम्ही राखावें धर्मासी ॥४७॥
ऐसे बोलोनी श्रीकृस्णनाथ : रथी  बैसविला वीर पार्थ : मग म्हणतीलें समस्तात : तुम्ही राखावे धर्मासी ॥४८॥
ऐसें सांगोनि नीघाले : मग दुर्योधने काये केलें : चक्रवीहुतें रचीलें : मग आले रणभुमीसी : ॥४९॥
द्रोण म्हणे दुर्योधना : न देखो पांडव्याच्या सैन्यां : झडकरी बोलावा भीमसेना : संग्रामासी ॥५०॥
तेथें पाठवीलें बंदिजनातें : तें म्हणती पांडवातें : तुम्हीं वधीलें गंगानंदनतें : तो सुड मागती आपुला ॥५१॥
आजी द्रोणासी रणवट : तो धनुर्धर नीट ळ संग्रामासी सुभट : आरीट रायासी : ॥५२॥
ऐसे आइकोनी बोलण : मग चालिला भीमसेन : धर्मासी मध्यें घालुन : आला रणभुमिसि ॥५३॥
भीमसेनें अवलोकिलें । तव चक्रवीहुतें रचिले : मग गुरुते नमिलें : करी घेतली गदा : ॥५४॥
मग म्हणें गुरुसी : वेगळें नेलें पार्थासी : चक्रवीहुतें रचसी : आम्हा बंदिजन पाठवीला : ॥५५॥
ऐसें केलें कैवाडें : आमचा केला नीवाडें : म्हणता घेईन सुडें । आज भीस्माचा : ॥५६॥
जयाची उणि आंगवण : तो ऐसि रचि विंदान : मग कोपला द्रोण : संध्यान करी ॥५७॥
ते द्रोपदे देखिले : मग वरच्यावर्‍हि तोडिले : तवं आणिक बाण घातलें : तेहि तोडिले तें जाणा : ॥५८॥
द्रोण संधान करी : द्रोपद तोडि वरच्यावरी : बाणाचिया कोडिसरी : दुखंड केलिया : ॥५९॥
येकमेकातें पाचारीती : येरयेरातें दाटिति : सींहिनाद गर्जताती : दोघेजण : ॥६०॥
दोघांचा फरसराम गुरू : दोघा संग्राम जाला थोरू : सैल्य कौरवविरु : तेही भीम पाचारिला : ॥६१॥
तो येकला भीमसेन : त्यावरि उठावले कौरवसैन्य : ते वेळीं तो भीमसेन : संग्रामामाजि न दिसे ॥६२॥
तेथें जाला हाहाकारू : न दिसे वर कोदरु : वरसती लोहाचा पुरु : तेनें भीम घायेवटला ॥६३॥
वैराट आणि कोंतीभोजु : आणि विरराज भोजु : महादेव पंडुआत्मजु : ऐसे विर उठावले ॥६४॥
करावया भीमाची सोडवण : उठावलें चौघेजण : मग द्रोण आपण : काऐं करीता जाला ॥६५॥
तेव्हेली बाण साते : हाणितले द्रोपदाते : च्यार्‍ही चहु वाऋवातें : येक सारथिया भेदला : ॥६६॥
दोन लागलें द्रोपदासी : तेनें मुर्छेना आली तयासी : राहणें नव्हें सारथियासी : धर्मापासि कोन्ही नाही : ॥६७॥
मग धावीनला द्रोणगुरु : तेणे धरिला यौधेष्टिरु : जवळी होता परीवारु : तयासि पळ सुटला : ॥६८॥
द्रोण म्हणे जइद्रथासी : तुम्ही धर्म न्यावा दुर्योधनापासी : भीम वेढिला चौघासी : तयासि धरीन : ॥६९॥
ते वेळी द्रोणगुऋ : तवं धाविनला वेगउत्तऋ : तवं तेणें टाकिला रहिवरु : तव तो वीर माहाबळी : ॥७०॥
माहामारी पेटला : सैन्या पळ सुटला : मग द्रोण पावला : तयावरी न वचे : ॥७१॥
पांडवदळि हाहाकार जाला : म्हणति धर्म धरुनी नेला । हें आईकोनी भीम परतला : धाविनला वेगत्तउत्तर : ॥७२॥
वेगि जईद्रथ टाकीला । राहें राहें म्हणें तयाला : तव तो धर्म टाकुन पळाला : तयावेळीं : ॥७३॥
तंव तेणें वेगेसी : मग तो आला धर्मापासी : रथि घालौन तयासी : मग निघे भीमसेन ॥७४॥
भिम धर्मासि घेउन आला : तव द्रोपद सावध जाला : जावघा दळभार मिळाला : वैराट साहादेव : ॥७५॥
आला कोंतीभोजु : वीरराजा भोजआत्मजु ॥ ते वेळी पंडुचा आत्मजु : काय बोलें : ॥७६॥
धर्म धरुनि नेला होता : बोल बैसला होतां माथां : तरि मुख कैसा दाविता : कृस्णा आर्जुनासी : ॥७७॥
वैराट आणि द्रोपदु : हा चुकला आमचा सब्दु : भीमा तुज सारीखा बंधु : म्हणौनि धर्म आळंगीला : ॥७८॥
ऐसे येकमेका बोलेती : तव द्रोण काये केली युक्ती : भाट पाठविला पांडवाप्रती : भीमसेनासी : ॥७९॥
मग ते आले त्वरित : पवाडे भीमाचे पढत: म्हणती एस आले तुमते : धर्म सोडवीला : ॥८०॥
द्रोणे चक्रवीहुते रचिले : तुमते असे बोलावीलें ॥ न याल तरि उणे एईले : सोमवंसासी : ॥८१॥
ऐसा बोल आईकोनी : नीस्याना घाव देउनी ॥ आले रणभुमि टाकोनी : मग द्रोण पाचारिला : ॥८२॥
तुम्ही जे वीचारीले : ते न चले काही केले : आता बोलाविले : काये कार्य : ॥८३॥
यावरी बोले द्रोण : पण केला तो साचे करीन : धर्म जीताचि धरीन : हा नीर्धार जाणावा ॥८४॥
यावरि बोले वरकोदर : तुम्ही पण केला तो साचार : परि जइद्रथ वीर : सांडुनी पळाला : ॥८५॥
तरि आता मागुते : कैसे धराल धर्मातें : तो तुम्हा मानी गुरुत्वातें : युध्यची हे नव्हे तुमचें : ॥८६॥
ऐसे भीम बोलीला : तंव द्रोण कोपला : मग बाणि हाणीतला : भीमसेन तो ॥८७॥
ते बाण तोडिले वरच्यावरी : आणीक संधान करी : तेहि बाण भुमीवरी : पाडी भीमसेन : ॥८८॥
आणीक द्रोण संधान करी : भीम तोडी वरच्यावरी : मग द्रोण तीये अवस्वरी : घाली सरुजाळ : ॥८९॥
न सावरत सरजाळे : बाणी भरले अंतराळ : तेव्हेळी खोचळे दळ : पांडवाचें : ॥९०॥
तेव्हेळीं भीमसेन : स्थातळी उतरून : धाविनला वेग करुन : गदा घेउनीया : ॥९१॥
द्रोणे बाण गुणी लावीला : भीम न सावरेची आला : गदाघावो उभारीला : तवं द्रोण रथ सांडुन पळाला : ॥९२॥
सारथि आनि वारु : त्यांचा केला संव्हारु : त्यात म्हणे वरकोदरु : रथ सांडोनि पळालासी : ॥९३॥
आता कोठे रे जासी : पुढें धाविनला वेगेंसी : हाणीतले द्रोणासी : थोर कोपें पै : ॥९४॥
ते वेळी तो द्रोणगुरू : तोहि सांडिला रहीवरू : ऐसा धाक थोरु : भीमसेनाचा : ॥९५॥
तोही रथ चुर्ण केला : मग हाहाकार वर्तला : सींहीनाद गर्जिनला : भीमसेन तो : ॥९६॥
आस्वस्तामा कर्णवीरु : समस्ता वेढिला वरकोदरू : संग्राम जाला थोरु : तीये वेळी : ॥९७॥
तेव्हेळी पंडुसुतें : देखता जाला दळाते : मग सांडोन द्रोणाते : त्यावरी धाविनला : ॥९८॥
रथाने रथ हाणतु : वारुवावरि वारु टाकीतु : गजाने गज झुगारीतु : माहाबळी तो : ॥९९॥
कौरववीर समस्ते : शस्त्रेंधारी वरुसतें : सर्वाआंगी भीमाते खोचतें : परि न मानितो ॥१००॥

ऐसे दळ मारीतु : सींहीनाद आसे गर्जतु : तेथें आला द्रोणसुतु : आणी कर्ण दुश्वासैन : ॥१॥
भीम आला पवनगती : शस्त्रें आमित हाणीती : दुस्वासेन गदाघाती : हाणितला : ॥२॥
च्यार्‍ही वारु आणि सारथी : सतचुर्ण जाले क्षीतीं : गदा लल्हाटी वाजली अवचीती : लागलि देखा ॥३॥
तो जाला मुर्छागत : भुमंडळि असे लोळत : आला वीरनाथ तेथ : तेणें घातला रथि : ॥४॥
तो तयासी घेउनि गेंला वेगें : तंव भीम आला पाठींलागें : आश्वस्थामा आला वेगें : तेणें भीम पाचारीला : ॥५॥
तो म्हणे वरकोदग : कां धांवसी सैरावैरा : गदा भंवडि तो गरगरा : पळतयावरी : ॥६॥
अस्वतामया उजु आला । तो द्रोणाने देखिला : मग तो वरर्संता जाला : सरधारी : ॥७॥
चक्रवीहुचा माहामारी : हाणीतीला बहुता वीरी : भीम प्रवर्तला माहामारी : कौरवसैन्यासी : ॥८॥
बळिवंतें वीर होते : तेहि वेढिलें भीमाते : द्रोणें हाणितलें शस्त्रेंघातें : कैसे तेथें वर्तलें : ॥९॥
भीम येकला ते बहुतें : तेथें वर्तला नीघातें : सैन्ये पाडीले बहुतें : माहापुर असुधाचें : ॥१०॥
ऐसी जाली केसधरणी : आसुध वाहे रणी : दळ मारीले येकक्षेवणी : माहावीरे ते ॥११॥
ऐसें रणकंदन जाले : कौरवदळ आटले : मग द्रोणे काये केले । ते सांग वीरणुदास नामया ॥१२॥
चक्रवीहुकथा : ते आईकावी श्रुतां : आभीमन्या वीडा घेता : कैसे वर्तलें : तो सांगेल व्याससुतें : प्रसंग पहीला ॥१॥छ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP