मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोरक्ष प्रवाह| भाग ६ श्री गोरक्ष प्रवाह ग्रंथाच्या पारायणाची माहिती भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ गोरक्ष प्रवाह - भाग ६ मनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते. Tags : bookgorakshagranthanavanathpustakगोरक्षग्रंथनवनाथ भाग ६ Translation - भाषांतर १५ गांठी भेटी (२) गोरक्ष - कानीफा॥ पालखीसी भोई । सेवक चालती । हेलापट्टणासी । येती सारे ॥२०४॥॥ जगन्नाथाहूनी । गोरक्षुहि येती । उभयो भेटती । नाथु-पंथी ॥२०५॥॥ कानीफा प्रेरीती । विभक्तु मंत्राते । फले पक्व राशी । सांचतसे ॥२०६॥॥ प्रौढी देखोनीया । गोरक्षु ना साहे । थाटु मिरवी तो । अमृतांचे ॥२०७॥॥ सामर्थ्ये उभये । जेंदि दावियेले । मिठी परस्परे । होये क्षणी ॥२०८॥॥ वृतांते आदेशें । गोष्टी परस्परां । निश्चिती मार्गाची तैशी जाली ॥२०९॥॥ स्त्रियांच्या गांवासी । गोरक्षानें जावें । गोपीचंदाप्रती । कानीफानें ॥२१०॥॥ अपूव स्वागत । गोपीचंदे केलें । कानीफा तें नेलें । वाडीयांत ॥२११॥॥ शांत क्रोध करी । पाय चुरी हातें । सेवा कानीफाची परोपरी ॥१२॥॥ मैनावती तैसी । सांभाळिते नीति । क्षमा; शांति, प्रीति । वरीतसे ॥१३॥॥ उभां शिष्यांतें । कानीफा आश्वासी । शांत चित्तें म्हणे । ‘शुभ होय’ ॥१४॥१६ जालंधर सुटका॥ कानीफासी राये । दावियेली गर्ता । अश्वांच्या उत्कीरी । जालंधरू ॥१५॥॥ कल्याणार्थ तदा । कानीफा तो वदें । पांच मृर्ती करी । राजया ! तूं ॥१६॥॥ ‘हेम, रौप्य, ताम्र, । कांस्य, लोह, तेंवी । रचीं गर्तेवरी । एकू एकी ॥१७॥॥ गर्तेवरी धावू । गोपीचंद घाली । घात योजियेला । कोणे ? वदा’ ॥१८॥॥ जालंधर बोले । गोपीचंद सांगे । घावू घालतसे । लोह मूर्तू ॥१९॥॥ जालंधरें शापें । मूर्ती भस्मु होत । गर्ता उत्कीरीत रावराणा ॥२०॥॥ जालंधर नाथु । पाही गर्ते आंतु । कानीफा शरण । त्यासी जातु ॥२१॥॥ शिष्यांतें आलिंगी । गुरुंसी वंदिती । गोपीचंदु तेवी । माता मैना ॥२२॥१७ गोपीचंद तपस्या॥ राया ! गीपीचंदा ! । तपस्येसी जावे । भिक्षा-पात्र घ्यावे । संगे तुम्ही ॥२३॥॥ सांगे गुरुराजा । जालंधरा ओजा । ‘अहंकार बोजा । झडो द्यावा ॥२४॥॥ लुमावती राणी । रडे दीनवाणी । तीसी समजावणी । होता पुरे ॥२५॥॥ मुक्तचंद्र-पुत्र । राज्यासनी येई । गोपीचंदु यात्रा । चाले पायी ॥२६॥१८ चंपावती भगिनी ॥ कौला बंगाल्यासी । पौलापट्टणासी । शिष्या गोपीचंदा । प्रजा पाहे ॥२७॥॥ वार्ता राया गेही । चंपावती कानी । बंधूसी भगिनी । देखे स्वतां ॥२८॥॥ गोपीचंदा नामें । जालंधरा कर्में । निंदिती ते वर्में । काढोनियां ॥२९॥॥ पौली जो तिलकु- । चंदु नामें राया । चंपावति कांत । तोहि निंदी ॥३०॥॥ बंधूसी तै अन्नु । चंपा पाठवीते । सेवीतसे ब्रम्हू । जाणोनी तें ॥३१॥॥ निंदीती आप्तत्वें । चंपा राणीयेते । कटघारींनें । घातु । स्वयें करी ॥३२॥॥ गोपीचंदु म्हणे । ‘जालंधरा आणूं । ‘भगिनीचा प्राणूं । देही घालूं’ ॥३३॥॥ ‘जालंधर गुरु । येतील तोंवरू । प्रेतातें सांवरू । भगिनीच्या ॥३४॥॥ ज्ञानी जालंधरु । धांवोनीया येती । गूरु-शिष्यां देखी । तिलकू तो ॥३५॥॥ धांवे पायांपाशी । पावे तात्कालीकीं । तपोराशीं जपे । मंत्रपंक्ती ॥३६॥॥ मृत्यंजय मंत्रे । संजीवन दिले । चंपा तिलकांसी । भेटवीले ॥३७॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP