ग्रंथाच्या पारायणाची माहिती

मनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.


ग्रंथाच्या पारायणाची माहिती
मनात एखादी इच्छा धरुन निश्चयानें ग्रंथपठण केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते, पूवेंकडे तोंड करून, एखाद्या मऊ वस्त्राच्या आसनावर बसून ग्रंथ पठण करावे. लाकडी पाट बसावयास घेऊं नये. घेतल्यास, पाटावर वस्त्र घालून त्यावर बसावे. समोर चौरंग किंवा पाट ठेवून, त्यावर ग्रंथ ठेवावा, व पूजा करून नित्य वाचन करावे. समोर किंवा उजव्या हाताला श्रीदत्तायेयाची तसबीर असावी तसबीर शक्य तर भिंतीस टांगावी जमिनीवर, ठेवूं नये. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आरंभ करून रोज रात्री एकदां संपूर्णं ग्रंथ वाचून आरती करावी. या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होण्यास अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागतो. तेवढी सवड काढून नित्य ग्रंथपठण करुन, नाथांचा ससाद भाविक जनांनी मिळवावा, हीच श्रीदत्तचरणी प्राथंना.

या गोरक्ष किमयागिरी ग्रंथात आलेल्या मन्त्रापैकी कांही महत्वाचे मन्त्र खालीळप्रमाणें
१) महामृत्युंजय मंत्र :--- ॐ होम्‌ ॐ जूं स: भूर्भुंव: स्व: त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्‌ । उर्वांरुक्‌मिव बन्धनान्मृत्योर्मूंक्षीय मामृतात्‌ ॥

२) संतानप्राप्तीसाठी गोपालमंत्र :--- ॐ श्रीं र्‍हौं क्लीं ग्लौम्‌ देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते । देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत: ॥

३) उच्छिष्ट गणपति मंत्र :--- ॐ हस्तिपिशाचि लिखे स्वाहा ॥

४) दत्तात्रेय मंत्र :--- १ द्रां दत्तात्रेयाय नम: ॥
                २ दिगम्बरा दिगाम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ॥

५) बाधानिवरक हनुमत्‌ मन्त्र :--- ॐ र्‍हां र्‍ही र्‍हूं सर्वदुष्टनिवारणाय स्वाहा ॥

६) सरस्वतीमन्त्र :--- ॐ ऐं र्‍हीं धीं क्लीं सौं श्रीं सरस्वत्यै नम: ॥
या मंत्रांची व इतरही बर्‍याच मंत्रांची संपूर्ण माहिती प्रस्तुत ग्रंथात आहे.
॥ श्रीआदिनाथाय नम: ॥

ॐ अस्य श्रीगोरक्ष ग्रंथस्य भगवान आदिनाथ ऋषि:
षडाक्षरी छन्द: नवनाथानुग्रह प्राप्त्यर्थे विनियोग: ।

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीपांडुरंगाय नम: ॥
श्रीलक्ष्म्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: ॥

॥ श्री रसेश्वरी प्रसन्न ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:37:41.0030000