मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|नवम स्कंध| अध्याय अकरावा नवम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा नवम स्कंध - अध्याय अकरावा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय अकरावा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । नारदम्हणेमहामुनी । सावित्र्याख्यान ऐकुनी । आनंदझालामाझेंमनीं । कर्मविपाकऐकिला ॥१॥आतांलक्ष्मीचेंचरित्र । मज ऐकवीपवित्र । कोणेंपुजिलीकोणमंत्र । प्रगटकेवींजाहली ॥२॥ तेव्हांबोलेनारायण । प्रकृतीपुरुषदोघेंजण । त्याप्रकृतीपासून । लक्ष्मीप्रगटेवामांसी ॥३॥ दक्षिणांसीराधाझाली । पूर्वींचकृष्णेंतीवरिली । कृष्णावामांसीप्रगटली । विष्णुमूर्तिचतुर्भुज ॥४॥द्विभुजेंतेव्हांतयासी । लक्ष्मीदिलीसंतोषी । दोघेंगेलेंवैकुंठासी । लक्ष्मीआणिनारायण ॥५॥तीलक्ष्मीमहामाया । झालींयोगेंजगन्मया । नानारुपेंसर्वठायां । व्यापूनियाशोभविलें ॥६॥स्वर्गमृत्यूपाताळ । महालक्ष्मीव्याप्तसकळ । तियेचेयोगेंमंगळ । अमंगळलक्ष्मीविना ॥७॥प्रथमपूजाविष्णूची । दुजीपुजाविधीची । तिसर्यानेंशंकराची । मन्वादिकींअनंतर ॥८॥दुर्वासशापेंकरुन । इंद्रलक्ष्मीकोपून । वैकुंठींझालीलीन । सिंधुकन्यातीझाली ॥९॥इंद्रेंकेलेंमधुपान । रंभेसहक्रीडेवन । मार्गींदुर्वांसादेखून । नमिलातेणेंआदरे ॥१०॥विष्णुप्रसादपारिजात । ऋषिपुरंदरासिदेत । तेंपुष्पघेऊनत्वरित । इंद्रेंठेविलेंकरिमाथां ॥११॥पुष्पस्पर्शेंऐरावत । झालातेजेउन्मत्त । इंद्रांतेव्हांझुगारित । गेलावनींमोकळा ॥१२॥मत्तहोऊनपवीश्वर । पुष्प अवमानिलेंथोर । कोपलातेणेंमुनिवर । बिडोजाशीशापिलें ॥१३॥हेमूढापाकशासन । केवीकरिसीअवमाना । विष्णुप्रसादचतुरानना । वंद्यहोयशिवासीजो ॥१४॥महापातकाचेदहन । विष्णुप्रसादसेवन । त्रैलोक्यहोयपावन । निर्माल्यस्पर्शमात्रें ॥१५॥त्याचाकरिसीअव्हेर । दरिद्रीहोसत्वर । लक्ष्मीजाईलविष्णुपुर । तुजटाकोनीममशापें ॥१६॥कोणासीमीनाहींभीत । कायकरीलतुझातात । बृहस्पतीपुरोहित । मरीचिअथवाविरंची ॥१७॥ऐकतांऋषिशापवणी । इंद्रालोखेमुनिचरणीं । म्हणेस्वामीमजशापोनि । दंडकेलायथार्थ ॥१८॥नमागेमीराज्यादिक । ज्ञानद्यावेंमोहनाशक । जेणेंहोईलसुख । उपदेशावेकृपेनें ॥१९॥मुनिम्हणेपुरंदरा । बीज ऐक अज्ञानांकुरा । जन्ममृत्यूशोकजरा । विपद्वीजसंपत्ती ॥२०॥लक्ष्मीप्राप्तहोयजरी । दोषकितीतेअवधारी । धनमदाचीथोरी । सांगतोंतुज ॥२१॥धनजैसेंजैसेंमिळें । आशावाढेंवेळवेळे । तुप्तिनसेचिकदाकाळें । द्रव्यलाभहोतांची ॥२२॥पाप अथवाअन्याय । सहजघडेंलोभमय । परदुःखाचाआशय । नयेमनींकदापि ॥२३॥धनाचेंकरितांरक्षण । निद्रानये एकक्षण । मोहजडेविलक्षण । नसेविश्वासकोणाचा ॥२४॥प्राणाहूनिजरीप्रिय । धनयोगेंतोअप्रिय । धनयोगेसर्वाप्रिय । उपकारतुच्छमानीत्याचे ॥२५॥अहंपणाअंगींचढे । लोकींप्रतिष्ठावाढें । मीथोर ऐसेंगाढे । ठसावेंमग अंतरी ॥२६॥सुखघेईंविषयाचे । वस्तुमात्रींमनलालचें । शरीरींमगसुखाचे । चोजवाढेंअतिशय ॥२७॥किंचितहीश्रमनसोसें । नेत्रांपुढेंकांहींनदिसे । थोरपणाचेंभरेंपिसे । कर्ण असोनीतोबहिरा ॥२८॥पाय असोनीपांगुळा । नेत्र असोनिअंधळा । सेवकगर्जतीवेळवेळां । सावधव्हावेंम्हणूनीं ॥२९॥वाचाळपरीमुकाजैसा । नबोलेखुळाजैसा । संपत्तीचाएंवसोसा । लागेजेव्हां ॥३०॥तेणेंहोयमदांध । वाढेंतेव्हांभवबंध । लोभमानकामक्रोध । उपजतींतेणेंची ॥३१॥सुखभासेंविषयागमी । परीदुःखहोयपरिणामीं । संगसुखेंरजतमी । न इच्छीमोक्षमार्ग ॥३२॥बरीवाटेप्रवृत्ती । नोळखेकदांनिवृत्ती । मावळेंतेव्हांस्वात्मवृत्ती । दुर्वृत्तहोयमदांध ॥३३॥विषयमदेंनासलेडोळे । संपत्तीखूपलागेबळें । दरिद्रांजनेंनिर्मळे । नेत्रहोतीसवेग ॥३४॥रजतमतेव्हांनासत । सत्वशुद्धप्रकाशत । मोक्षमार्गतेव्हांदिसत । मदमळनासता ॥३५॥एवंशक्रासेबोधून । कैलासांज्जायतपोधन । स्वर्गीगेलावृत्रहण । भ्रष्टश्रीकपाहिलें ॥३६॥अस्रुरेंनगरवेष्टिलें । भयंकरसर्वभासले । गुरुचरणवंदिले । मंदाकिनीतीरासीं ॥३७॥वाक्पपतीसतोसुरपती । सांगेसर्वकर्मगती । सर्वांसहबृहस्पती । ब्रम्हलोकींपातला ॥३९॥चतुर्मुखेंऐकूनवृत्त । मानसीहोयविस्मित । अवश्यभावींनचुकत । मायाबलदुस्तरहें ॥४०॥तेव्हांस्वयेंब्रम्हदेव । सवेघेऊनसर्वदेव । वैकुंठींयेऊनमाधव । स्तविलातेणेंवेदपदी ॥४१॥कथिलासर्ववृत्तांत । मघवादुःखेंरुदनकरीत । अभय देईरमाकांत । अचलाश्रीदेईनम्हणे ॥४२॥परिवाक्यसमयोचित । ऐकामाझेंकिंचित । परिणामींकरीहित । सत्यमित अतिप्रीय ॥४३॥ असंख्यातहाजन । सर्वमाझेंआधीन । परीमीभक्तपराधीन । स्वतंत्रनाहींमोकाटा ॥४४॥निरंकुशमाझेंभक्त । तेजयावरीकोपत । तेथेंमीनवसेंसत्य । सलक्ष्मीकतयांघरीं ॥४५॥शंकरांशतोमुनीवर । माझाभक्त अतिथोर । तद्वचनेंअतिसत्वर । गृहत्यागिलेंतुमचेंमी ॥४६॥शंखध्वनीशिवार्चन । नतुळसीविप्रभोजन । भक्तनिंदाभक्तीहीन । तेथेंपद्मानराहे ॥४७॥हरिवासरीजन्मदिनीं । भोजनकरीजोप्राणी । ममनामेंकन्याविकूनी । द्रव्यघेईदुरात्मा ॥४८॥जेथेंनजेवीअतिथी । जारिणीपुत्र अथवापती । शूद्रश्राद्धान्नखाती । पद्मातेथेंनराहे ॥४९॥शुद्रशवाचेंकरीदहन । शूद्रगृहींशिजवीअन्न । वृषावरीआरोहण । करितांपद्मानराहे ॥५०॥हिंसानिंदाक्रूरमन । शुद्रगृहींकरीयजन । जोभक्षीअवीरात्र । पद्मातेथेंनराहे ॥५१॥नखानेंछेदीतृण । मखेंभूचेविलेखन । निराशजायब्राम्हण । पद्मातेथेंनराहे ॥५२॥सूर्योदयींकरीभोजन । दिवसांकरीतसेशयन । दिवसांचकरीमैथुन । पद्मातेथेंनराहे ॥५३॥विप्रजोआचारहीन । शूद्राचेघेईंदान । अदीक्षितस्वांगवादन । पद्मातेथेंनराहे ॥५४॥ओलेंचपायठेऊन । नग्नचीकरीशयन । सदाहसेबहुभाषण । पद्मातेथेंनराहे ॥५५॥ तेललावुनीशिरी । अन्यासीजोस्पर्शकरी । व्रतोपवाससंध्यानकरी । पद्मातेथेंनराहे ॥५६॥ सदाराहेमलीन । शिवविष्णूभक्तिहीन । निंदकहिंसकदयाहीन । पद्मातेथेंनराहे ॥५७॥ शालिग्रामशंखतुलसी । सेवाकरीभक्तीसी । शिवदुर्गाआर्चनाशी । करीतेथेंश्रीवास ॥५८॥विप्रसेवाविप्रभोजन । सर्वदेवांचेंअर्चन । शिवविष्णूनामस्मरण । करीतेथेंश्रीवास ॥५९॥ऐसेंबोलूनसुराशी । बोलेप्रेमेंरमेशी । क्षीरोदधींतकलांशी । अवतरोनीसुररक्षी ॥६०॥विधीसीसांगेनारायण । क्षीरोदकींजेंमंथन । लक्ष्मीदेवासीदेऊन । सुखीकीजेपद्मजा ॥६१॥अंतःपुरींगेलाहरी । देव आलेक्षीरसागरी । शेषाचीकेलीदोरी । रवीकेलीमंदराचला ॥६२॥ कूर्माचाकेलाआधार । मंथितीतेव्हांसुरास्रुर । कालकूटविषदुस्तर । पूर्वींप्रगटजाहलें ॥६३॥उठतींसागरींविषज्वाला । कल्पांततेणेंआरंभिला । सर्वींतेव्हांशिवस्तविला । प्रसन्नझालादयाळ ॥६४॥सर्वांचेंकरायारक्षण । विपाचेंकेलेंपान । सर्वजगाचेशोषण । भूषणझालेस्मरांतका ॥६५॥नीलकंठनामझालें । सर्वजगांतेंरक्षिलें । मंथनपुन्हाचालिलें । सागराचेसवेग ॥६६॥सप्ताश्व इंदूपारिजात । धन्वंतरीधेनुअमृत । सुदर्शनशंख ऐरावत । निधिपद्मरमारत्नें ॥६७॥रमाविष्णूसीवरी । अमृतार्थसुरासुरी । कलहहोतापरस्परीं । मोहिनीझालामाधव ॥६८॥देवांपाजिलेंअमृत । सूर्यचंद्रामध्येंबैसत । सुधार्थसिंहिकासुत । सुधाबिंदुलाधला ॥६९॥तेणेंझालातोअमर । विष्णुछेदीत्याचेंशिर । एकाचेतेदोन असुर । राहुकेतुजाहले ॥७०॥सूर्यचंद्रेंसांगितलें । म्हणोनित्यांसीवैरझालें । उपरागतोचिग्रहणझालें । चंद्रसूर्यासवैरत्वें ॥७१॥देवीदैत्यपराभविलें । विप्रशापांतूनीसुटले । लक्ष्मीकृपेंराज्यपावलें । स्वर्गलक्ष्मीसुस्थिरा ॥७२॥इंद्रेंकेलेंपूजन । मंत्राचेकेलेंअनुष्टान । रमादेतसेदर्शन । विमानस्थांजगत्प्रसू ॥७३॥ ब्रम्हहरीहर आर्चिंती । सर्वमुनीमनींध्याती । इंद्रकरीभावेंस्तुती । वेदोक्तजीविधिदत्त ॥७४॥पद्मनेत्रेपद्मानने । पद्मकरेपद्मासने । हेपद्मेपद्मभूषणे । पद्मजस्तुतेवंदितों ॥७५॥कृष्णप्रियेकृष्णमये । श्रीकृष्णेंकृष्णह्रदये । कृष्णान्वयेकृष्णमाये । कृष्णस्तुतेवंदितों ॥७६॥हर्षदेहर्म्यदेमाते । वृद्धीसिद्धिसिंधुजाते । लक्ष्मीलज्जेविष्णुकांते । चंद्रशोभेवंदितों ॥७७॥वैकुठींतूंक्षीरसागरीं । राजगृहींतूंशक्रपुरी । गृहस्थाचेराहसीघरी । देवमातेवंदितों ॥७८॥स्वाहास्वधासर्वांधारा । सत्वरुपातूंचिधरा । धर्मार्थकाममोक्षसारा । वेदसारावंदितो ॥७९॥मातेचातोमिळेस्तन । बाळवाचदैवधीन । परीकोणीहीतुजवांचुन । वांचुनशकेनिश्चये ॥८०॥करुनियाकृपादृष्टी । वाचीव अंबेतवसृष्टी । तुजवांचून अनावृष्टी । बहुदुःखसोशिलें ॥८१॥नमूंतुज आदिमाये । मूळप्रकृतीअव्यये । नमोनमोकरुणामये । विश्वभर्त्रीनमोस्तु ॥८२॥ऐकतांचिऐसेंस्तवन । श्रीरमाझालीप्रसन्न । केलेदेवश्रीसंपन्न । गेलोस्वयेवैकुंठा ॥८३॥करितांहेंस्तोत्रपठन । नरहोयभाग्यसंपन्न । दरिद्रजायनिरसून । पुत्रपौत्रयशवाढें ॥८४॥एकुणसाठदोनशत । श्लोकलक्ष्मीचेचरित । तीचयेथेंप्राकृत । महालक्ष्मीबोलिली ॥८५॥देवीविजयेनवमस्कंदेनारद नारायणसंवादे । लक्ष्म्यावतारवर्णनंनामएकादशोध्यायः ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP