पंचम स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । रावपुनःप्रश्नकरी । म्हणेऋषेतववाक्यजरी । देवीगीतसुधाहलरी । तृप्तीनसेऐकतां ॥१॥

देवीअंतर्धानझाली । मगतीव्यासाकुठेंगेली । पुढेंकथाकेवीवर्तली । देवकायकरितीमग ॥२॥

सांगिजेपुन्हांदेवीचरित । जेणेंसर्वसुखलाभत । धन्यतेचिजगांत । गातीऐकतींदेविगाथा ॥३॥

कृष्णम्हणेनृपती । श्रीपुरजेकथिलेंतुजप्रती । तेथेंगेलीभगवती । व्याप्तसर्वभरलीसे ॥४॥

सूर्यवंशीचानृपाळ । शत्रुघ्नकेलाभूपाळ । महिषाचेपदींतात्काळ । इद्रेंस्थापिलाआनंदें ॥५॥

देवगेलेस्वकीयभुवनीं । शत्रुघ्नपाळींमेदिनी । दोषदुष्काळराष्ट्रांतुनी । नीतियोगेंपळालें ॥६॥

सर्ववर्णधर्मरत । झालेदेवीभक्तिवंत । रोगकलहनसेतेथ । अपमृत्यूकोणानबाधे ॥७॥

वृष्ठिहोयसमयावारीं । धान्यरसादीपरीपरी । पुष्पेंफलेंरसभरी । कालींकालींयथेष्ट ॥८॥

असोऐकेदेवीचरित्र । कर्णामतपरमपवित्र । पावनकरीजेंसर्वगात्र । पात्र आहेसीऐकाया ॥९॥

शुंभनिशुंभसहोदर । बधूदोन्हीहेअसुर । पाताळाहुनीपृथ्वीवर । आलेतपकराया ॥१०॥

सेविलेत्याहींपुष्कर । दहासहस्रवत्सर । तप आचरलेदुस्तर । हंसासनप्रसंनझाला ॥११॥

अमरत्वतैवांछिलें । विधीम्हणेंहेंनमिळे । मर्यादाकदांनटळे । जन्मतेथेंनित्यमृत्यु ॥१२॥

देवादिकीटपर्यंत । पुरुषाहातींनसोघात । स्त्रीस्वयेअबलाविख्यात । मारीलकाय आम्हांसी ॥१३॥

इच्छिततयातेंदेऊन । ब्रम्हागेलानिजभुवन । भ्रुगूनेंराज्यींस्थापून । पौरोहित्यरक्षिलें ॥१४॥

धूम्राक्ष आणिचंडमुंड । रक्तबीजमहाप्रचंड । वरदानेंमत्त उदंड । युदधीअवध्यदुष्टते ॥१५॥

तयाचेगळतांरुधिर । बिंदुसंख्याहोतींअसुर । रुपेंबलेंतेदुर्धर । युद्धकरितीदारुणते ॥१६॥

अपारसन्यघेऊन । राहिलेसेवकहोऊन । पृथ्वीसमस्तजिंकून । निशुंभगेलासुरलोकां ॥१७॥

समरमांडिलादेवाशीं । इंद्रेंकोपूननिशुंभासी । मूर्छितपाडीलाभूमीशी । वज्रघातेंकरुनिया ॥१८॥

बंधूऐकुनिमूर्छित । शुंभधाविंनलात्वरित शस्त्रास्त्रेंबहुवर्षत । समस्तदेवजिंकिले ॥१९॥

इंद्र अग्नीयमकुबेर । सूर्यचंद्रवरुणसमीर । पराजितपळतीसत्वर । शस्त्रेंवाहनेंसांडानीं ॥२०॥

कठिण असुरांचामार । देवकेलेजजर । पदींबैसलाशुंभासुर । पुरंदराचेतेसमई ॥२१॥

पदेंसर्वांचीहिरोन । स्वयेंभोगीआपण । वस्तुरत्नेंकेलीहरण । ऐरावतादीसर्वही ॥२२॥

निराश्रितदेवझाले । यज्ञभागतेणेंघेतले । फिरतीदुःखितदैवबलें । सहस्त्रवर्षेजाहली ॥२३॥

गुरुसीगेलेदेवशरण । म्हणतीसोडीवदुःखांतून । गुरुम्हणेहिमाचलीजाऊन । स्तवनकराअंबेचे ॥२४॥

तिचेतुम्हांवरदान । स्मरणेसंकटनाशीन । दैवबळेंतीसविसरुन । भोगितांदुःखपरोपरी ॥२५॥

ऐकतांचबृहस्पतीवचन । तयांसीझालेपूर्वस्मरण । हिमाचलींसर्वयेऊन । स्तवनकरितीभक्तीनें ॥२६॥

नमोनमोविश्वसाक्षिणी । नमोनमोप्राणरुपिणी । नमोनमोआनंदनंदिनी । नमोनमोरपदेवते ॥२७॥

नमोनमोदेवसुखदायके । नमोनमोदैत्यांतके । नमोनमोनरार्थविधायिके । नमोनमोभक्तिगम्ये ॥२८॥

नमो नमो बहुनामवती । नमोनमोअव्यक्तमूर्ती । नमोनमोसर्वशक्ती । नमोनमोस्मृतिरुपें ॥२९॥

नमोनमोबुद्धीधृती । नमोनमोपुष्टिकांती । नमोनमोतुष्टिशांती । नमोनमोजराविद्या ॥३०॥

नमोनमोलक्ष्मीगती । नमोनमोमेधाकीर्ती । नमोनमोदयामती । नमोनमोक्षमारमा ॥३१॥

नमोनमोक्षुधानिद्रा । नमोनमोजृंभातंद्रा । नमोनमोछिक्काभद्रा । नमोनमोविवक्षा ॥३२॥

नमोनमोमायाभ्रांती । नमोनमोइच्छायुक्ती । नमोनमोमाताप्रकृती । नमोनमोकृतीलज्जा ॥३३॥

एवंऐकूनिस्तुती । प्रगटलीस्वयंज्योती । सर्वाभरणेंशोभतीं । दिव्यनेसलीपैठणी ॥३४॥

माथाकुंकुंमचर्चिलें । अष्टभुजींरुपशोभलें । मृढुस्वरेंदेवासिबोले । कोणास्तवितांसुरानो ॥३५॥

पाहूनीदिव्यरुपिणी । देवपडलेलोटांगणी । पुनःपुनःनमोनिचरणी । सगदगदबोलती ॥३६॥

मातेतूझेंचिस्तवन । करीतोंआम्हींभक्तीकरुन । दुःखदीधलेंदारुण । शुंभादिकींराक्षसीं ॥३७॥

दिधलेंत्वांवरदान । स्मरणेशत्रूंनाशीन । शरंण्य आम्हांतुजवांचून । नसेकोणीदुसरें ॥३८॥

व्यासम्हणेनृपती । वाक्य ऐकूनपार्वती । स्वशरीरांतूनीमागुती । दुजेरुपप्रगटकेलें ॥३९॥

कोशापासावप्रगटली । कौशिकीतीम्हणवली । तीचकृष्णवर्णझाली । कालरात्रीनामपावे ॥४०॥

अंबारुपमनोहर । म्हणेदेवासीसुखकर । स्वस्थतुम्हींअसास्थीर । नाशकरितेंदुष्टांचा ॥४१॥

एवंदेवासीबोलिली । सिंहावरीआरुढली । कालरात्रीसवेंघेतली । गेलीनगरारिपूच्या ॥४२॥

बैसलीएक्याउपवनी । स्वखल्लकीमेळऊनी । गान आरंभीमधुरस्वरीं । मोहिलेंजगतेधवा ॥४३॥

देवमानवमृग । प्राणीमात्रज्ञानीखग । श्रवणमात्रेंझालेगुंग । देवविमानींसुखावले ॥४४॥

चंडमुंडेंगान ऐकिलें । रुपयेऊनीदेखिले । मनदोघांचेमोहले । गेलेत्वरेंशुंभसदनीं ॥४५॥

करुनीतयासीनमन । सांगतीअतिप्रेमेंकरुन । मृत्यूचेंमुळनेणोन । अनर्थकरितीस्वहस्तें ॥४६॥

स्वगृहांजेविहुताशन । स्वयेंचेतवीफुंकून । नेणेंमूढमीजळेन । तेवीदोघेबोलती ॥४७॥

आपलेंनगरीउपवनीं । राजन्पातलीसेकामिनी । सुंदरीतैसीत्रिभुवनीं । नाहीनाहींनिश्चयें ॥४८॥

तियेचेंमुखावरुन । चंद्रटाकावाओवाळून । तुच्छझालेमृगनयन । नेत्रदेखतांजियेचे ॥४९॥

सरळसुंदरनासिक । पाहूनलाजतीशुक्र । वेणीदेखतांफणीनायक । लाजूनशिरेबिळामाजी ॥५०॥

नेत्रांतीलपाहूनभाउली । षटपदासिभ्रांतीझाली । म्हणेकांताबैसलीसेकमली । रुंजीघालीभोवती ॥५१॥

कपोलस्वच्छमनोहर । शुद्धकाय असेलमुकुर । ओंठरक्तिमासुकुमार । अरुणबिंबप्रत्यक्ष ॥५२॥

वर्तुळ उन्नतसघन । काचीगुप्तजींचेस्तन । स्वकीयद्रव्यवाटेमदन । ठेऊनीह्रदयींस्थिरावला ॥५३॥

रातोत्पलापरीकर । वीणावाजवीसुस्वर । गायनकरीअतिमधुर । पाणीकेलेंदगडजीणें ॥५४॥

एवंआलीसेसुंदरी । जवळबैसलाकेसरी । दुजीअतिकुरुपानारी । कृष्णवर्णाबैसलीसे ॥५५॥

नकळेंतीचेइच्छित । रत्नरुपातीसत्य । जाणोनियातीचेंवृत्त । भार्याकरीआपुली ॥५६॥

तुजयोग्यतीभामिनी । रत्नेंसर्वतवसदनी । ऐरावत आणिलाहिरुनी । कल्पतरुपारिजात ॥५७॥

अश्व आणिलासप्तानन । हंसध्वजहरिलेंविमान । निधीछत्रपाशस्यंदन । कालदंडपद्ममाला ॥५८॥

मृत्युशक्तीकामधेनु । वस्त्रेंअर्पीक्लशानु । तुजकांपतीकालभानू । कांसोडिसीस्त्रीरत्न ॥५९॥

ऐकूनीरुपसंपत्ती । मोहझालाशुंभाप्रती । पाठवीतोदूतत्वरिती । महाचतुरसुग्रीव ॥६०॥

तोअंबेसमीपयेऊनी । मृदुबोलेकरजोडुनी । म्हणेपाठविलेमाझेप्रभूनी । शुंभासुरेंतुजकडे ॥६१॥

वाक्यत्याचेअतिमधुर । श्रवणकीजेसादर । त्रैलोक्याचाजोईश्वर । नम्रतुजप्रार्थीतसे ॥६२॥

देवसमस्तजिंकिले । यज्ञभागहरणकेले । रत्नवस्तूसर्वहरिले । बलात्कारेंकरुनी ॥६३॥

अवधयमीदेखणा । श्रीमंतरसिकशाहणा । शूरवीररत्नेंनाना । भोगितसेबळानें ॥६४॥

रुपतुझेऐकिलेंकानीं । पहावेंसेंवाटेमनीं । विव्हलकेलेंकामबाणीं । वशझालोसर्वथा ॥६५॥

सर्वजगाचाईश्वर । परीतुझाजाणकिंकर । मजलावरुनीनिर्धार । स्वामिनीहोयजगाची ॥६६॥

अवध्यमीसर्वेश्वर । सौभाग्यसुखजन्मवर । भोगीधरुनीमाझाकर । काढीदावजाळितो ॥६७॥

व्यासम्हणेभारता । ऐकूनीगुप्तहसेंमाता । सत्यवदसीम्हणेदूता । एवंगुणेदोघेही ॥६८॥

पातलेमीहीऐकूनी । विवाहार्थयेभुवनी । कारणएकपाणिग्रहणी । एकांतीतयासांगिजे ॥६९॥

खेळतांमीबाळपणीं । पणकेलावेडयावाणीं । जोमजजिंकीलरणीं । पतीतोचिवरीन ॥७०॥

सख्याहंसतींऐकून । ऐसाकायवेडापण । परीआतांतेवचन । असत्यकेवींकरावें ॥७१॥

शुंभकिंवानिशुंभासुर । मजसीकरुनीसमर । जिंकूनिधरावाकर । दूर्घटकायतयांशी ॥७२॥

दूतबोलेहांसून । भलतेंचबोलसीवचन । कोठेंशुंभ अमरार्दन । सुकुमारतूंकोठें ॥७३॥

पायटाकिजेपाहून । बोलावेंविचारकरुन । टाकूनदेईमूर्खपण । वचनमानीतूंमाझें ॥७४॥

भलतेंजरीतोऐकेल । तेव्हांतूजसीकोपेल । दुजेंदैत्यपाठवील । नेईलबळेओढूनिया ॥७५॥

सर्वजाईलमान । दैत्यकरितील अपमान । नेतीलकेशओढून । किमर्थतुझ्याअपेष्टा ॥७६॥

देवीम्हणेसर्वसत्य । वाक्यमाझेंन असत्य । समरावाचूनलग्नकृत्य । सिद्धनोहेंसर्वथा ॥७७॥

शुंभेंनिशुंभेंयेऊन । मजनेईजेजिंकून । भयजरीशूलपाहून । सत्वरजावेंपाताळीं ॥७८॥

दूतकार्यतूवांकीजे । प्रभूशीऐसेंचसांगिजे । करोसुखेंमानसीजें । रुचेलत्यांच्यातैसेंची ॥७९॥

पस्तीस आणिदोनशत । शुंभनिशुंभाचेंचरित । देवीवाक्यवर्णिलेंयांत । भाषांतरेंदेवीनें ॥८०॥

देवीविजये पंचमेसप्तमः ॥७॥    

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP