मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|पंचम स्कंध| अध्याय दुसरा पंचम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा पंचम स्कंध - अध्याय दुसरा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय दुसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । जातांचिदैत्यदूत । देवापाचारीशक्रत्वरित । पावकयमसोमवात । कुबेरादिसर्व आले ॥१॥मघवासांगेमहिषवृत्त । म्हणेरभपुत्रमदोन्मत्त । पदटाकींम्हणेत्वरित । यथेष्टजायनिघोनी ॥२॥अथवायावेंशरण । दयाळूतोकरीलपालन । एवंदूतवदोन । गेलानिःशंकतयाचा ॥३॥ब्रम्हवरेंरेडामाजला । उपायपाहिजेयोजिला । दानसंधीनीचाला । करणेंअसेंनिरर्थक ॥४॥बलाबलओळखून । शाहणेकरितींरण । भेदेंनाकळेमूर्खजन । हातोप्रत्यक्षटोणगा ॥५॥सर्वांहीविचारकरुन । राज्यकरावेंरक्षण । यावदुपायचालेपूर्ण । भक्तिव्यमुख्य असे ॥६॥परीतेपूर्वींनेणवे । पदहीसहसानसोडवे । शरणपशूसकेवींजावें । लोकमान्यहोऊनी ॥७॥व्यासह्मणेनृपती । एवंवदोनीशचीपती । सर्वांचीघेऊनसंमती । गुप्तदूतप्रेषिला ॥८॥सैन्यपाहूनीयादूत । कळवीयेऊनीत्वरित । शक्रेंऐकूनिमात । विस्मितझालामानसी ॥९॥मगसर्वांसंहएकांती । सवेंघेऊनवाचस्पती । मंत्रकरीशचीपती । प्रार्थीगुरुसीतेंधवा ॥१०॥म्हणेजीगुरुराया । संकटसमईंबुद्धीद्याया । योग्य आम्हांसीविप्रवर्या । जेंवीशुक्रदैत्याते ॥११॥युद्धायेतसेमहिषासुर । मंत्रबळेंरक्षीसुर । केवीकरावाविचार । सांग आम्हांयेसमई ॥१२॥गुरुबोलेपुरंदरा । स्वस्थहोयघरीधीरा । उद्योगकीजेदेववीरा । दैवाधीनसुखदुःख ॥१३॥प्राप्तहोतांसंकट । उपाययकीजेबळकट । जाणुनीदैवबलिष्ट । निरुद्यमनव्हावें ॥१४॥अंधपंगुखुळापिसा । निरुद्योगफिरेजैसा । शाहणाकदानव्हेंतैसा । झटोनिकार्यकरीतसे ॥१५॥निरिच्छजेमुनिजन । जाणतीसर्वदैवाधीन । परीस्वमुक्त्यर्थसाधन । निरालस्येंकरिताती ॥१६॥उद्योगकरितांनसेंसफल । दैवतेव्हांजाणप्रबळ । दोषनसेहोतांनिर्फळ । दैवाधीनम्हणोनी ॥१७॥सुखदुःखदैवाधीन । समठेवावेंसदामन । श्लोककीजेसदापठण । विवेकहोयसहजची ॥१८॥श्लोक । दुःखेदुखाधिकान्पश्ये सुखेपश्येसुखाधिकान् । आत्मानहर्षशोकभ्यांशत्रुभ्यामिवनार्पयेत् ॥१॥अर्थ - दुःखहोतांआपणासी । पहावेतेव्हांबहुदुःखितासी । सुखहोतांअपणासी । सुखाधिकादेखिजे ॥१९॥हर्षशोकत्रूचेंहातीं । कदानद्यावेंजीवाप्रती । धैर्यधरुनियाचित्तीं । स्वस्थसर्वदाराहावें ॥२०॥आपणामिळालेंशिळेंअन्न । दुजयापडिलेंलंघन । सुखीआहेतयाहून । जाणोनिस्वस्थ असावें ॥२१॥आपणाबैसायाहत्ती । मिळतांदेखिजेनृपती । तयासरसीममसंपत्ती । नाहींजाणूनीनहर्षांवे ॥२२॥हर्षशोकहोतांदूर । ह्रदयीउपजेज्ञानांकुर । निर्गुणमीजाणोनीअंतर । सुखामाजीडोलवावें ॥२३॥मनबुद्धिअहंकार । भूजलतेजसमीर । आकाशेंद्रियपरिवार । सहाविकारप्राणाचे ॥२४॥एवंहेचोवीस । याहूनमीभिन्ननिर्विशेष । कारणहेंचिसुखदुःखास । मीतोप्रथकसदासुखी ॥२५॥प्राणमन आणिशरीर । तिघांचेदोनदोनविकार । क्षुधातुषाशोकसाचार । मूर्छाआणिजरामृत्यु ॥२६॥मीनिराळाओळखून । स्वस्थकीजेइंद्रामन । हेंमुख्यसुखसाधन । मोहाहंकारटाकिजे ॥२७॥प्रपंचसुखपापमूल । दुःखतेचिपुण्यमूल । सुखतेंहोतांनिर्मूल । हर्षमानावापंडितीं ॥२८॥बुद्धिवानतूंपुरंदरा । करुनियापूर्णविचारा । संदेहरुपकार्यसारा । दैवगतीनेणवे ॥२९॥रण अथवादान । नसांगेमीतुजलागुन । करणेंतेपरिणामलक्षून । धीरधरुनीकरावें ॥३०॥व्यासम्हणेभारता । ऐकूनवाक्येवृत्रजेता । जाऊनीसत्यलोकींतत्वता । शरणगेलाविधीशी ॥३१॥सर्वांसहचतुरानन । शिवासहवैकुंठीजाऊन । विष्णुसीवृत्तकळवून । विचारकरितीसर्वही ॥३२॥सर्वहीसज्जहोऊन । निघालेयुद्धालागून । हंसारुढचतुरानन । गरुडारुढनिघेहरी ॥३३॥वृषारुढझालाशंकर । सेनापतिशिवकुमर । बैसोनियामोरावर । स्कंदनिघेमहाबळी ॥३४॥शस्त्रास्त्रेंकरुनीधारण । पातलेकरावयारण । तोंवरीसैन्यघेऊन । महिषासुरपातला ॥३५॥युद्धमाजलेंअपार । बाणखड्गमुसलतोमर । गदापरशुपट्टिशमुदगर । शूलचक्रहलशक्ति ॥३६॥वर्षतातींअनेकशस्त्रें । एकमेकामारितीअस्त्रें । गजारुढेयेउनीचिक्षुरे । इंद्रामारीपांचबाण ॥३७॥इंद्रेतेशरतोडुनी । अर्धचंद्रीएकाबाणी । मूर्छितपाडिलाधरणी । प्रधानशूरमहिषाचा ॥३८॥महिषेंप्रेषिलाबिडालासुर । गजारुढ इंद्रासमोर । येउनीतेणेंपन्नासशर । इंद्रावरीप्रेरिले ॥३९॥बाणतोडूनपुरंदर । वज्रेताडिलाकरीवर । स्वसैन्यीतोभयातूर । गजपळेबिडालाचा ॥४०॥बिडालरथीबैसून । इंद्रासवेकरीरण । इंद्रेंजाणूनिदैत्यकठिण । जयंतासीपुढेंकेला ॥४१॥पांचबाणेजयंत । पाडीबिडालामूर्छित । सारंथीतयामागेंनेत । ताम्रासुरपातला ॥४२॥वरुणतयाशीयुद्धकरी । ताम्रवर्षेशरधारी । यमेंताडिलादंडेपरी । नचळेतोमहावीर ॥४३॥अतिलाघवीताम्रासुर । बाणेझाकिलेसर्वसुर । देवीतोडूनीबाणनिकर । मूर्छितकेलाताम्राते ॥४४॥दैत्यकरितीहाहःकार । जयशद्बेंगर्जतीसुर । कोपूनीधांवेमहिषासूर । गजारुढहोऊनी ॥४५॥गदाघायेपुरंदर । ताडिलातेणेसत्वर । वज्रघायेंगदाचूर । करुनीधावेदैत्यावरी ॥४६॥खड्गघेउनीमहिषधावे । दोघेक्रोधेझुंजतीसवे । अतिघोरचित्रबरवे । विस्मयकारकदोघेही ॥४७॥तवदैत्येंमायारचिली । कोटिशाझालेमहिषबली । तैंसेनासर्वमर्दिली । इंद्रादिसर्वघाबरले ॥४८॥तयाचामारनोहेसहन । हरिहारांचेंकरितीस्मरण । पातलेतवतीघेजण । सृष्ठिस्थित्यंतकारकते ॥४९॥मायापाहूननारायण । सवेंसोडिलेंसुदर्शन । मायाविरालीतत्क्षण । तमजेवीसुर्योदयीं ॥५०॥पाहूनितिघामहिषासुर । परिघहस्तधावेसत्वर । प्रधानेंतयाचात्रिक्षुर । उग्रास्यदुजाउग्रवीर्य ॥५१॥असिलोमांत्रिनेत्रबाष्कल । अंधकताम्रबिडाल । युद्धकरितीतुमुल । अंधकधावेविष्णुवरी ॥५२॥धारदिधलीपाषाणी । विषाचेंपाजिलेंपाणी । ऐशातिखटमहाबाणीं । ताडिलाशौरीअंधक ॥५३॥बाणतोडीमुरारी । स्वयेंपांचबाणमारी । एवंअंधक आणिहरि । तुमुलकरितीसंग्राम ॥५४॥इंद्राबाष्कलमहिषशंकर । त्रिनेत्र आणिसूर्यकुमर । महाहनूतैसाकुबेर । वरुण आणिअसिलोमा ॥५५॥परस्परहेझूंजती । अंधकविष्णुबहुभांडती । पंनासदिवसदिनराती । नविरमतीएकक्षण ॥५६॥अंधकेंगरुडताडिला । गदाघायेंबहुपीडिला । शौरीआश्वासीतयाला । दक्षिणकरेंस्पर्शोनी ॥५७॥कोपेतेव्हांनारायण । दैत्यामारिसुदर्शन । अंधकेंस्वचक्रेकरुन । निवारिलेअनिवारतें ॥५८॥असुरगर्जेदारुण । चक्रनिर्फलपाहून । शोककरितीदेवगण । विपरीतम्हणतीकाळहा ॥५९॥हरीतेव्हांगदाझोकून । अंधकपाडिलामूर्छाधीन । त्तवधाविन्नलाकोपून । महिषासुरविष्णूवरी ॥६०॥गदातयासामारिली । महिषासुरामूर्छाआली । सावधहोऊनीमहाबळी । परिघेमूर्छितकरीकृष्णा ॥६१॥गरुडेंघेऊनीश्रीहरी । नेलारणापासूनीदुरी । दवबुडालेशोकसागरीं । महिषावरीरुद्रधावें ॥६२॥शूलमारिलाशंकरें । चुकवूनीतोदैत्येश्वरें । शंकरासिअतित्वरें । शक्तिमारीगर्जोनी ॥६३॥पुन्हामूर्छासांवरुन । युद्धाआलारमारमण । महिषेंतयादेखोन । महापर्वतझुगारिला ॥६४॥पर्वततिलशःफोडून । महिषामारीसुदर्शन । पडेदैत्यमुर्छायेऊनी । सावधहोऊनीपुन्हाउठे ॥६५॥मनुष्यरुपकरुन । दैत्यकरीसिंहगर्जन । हरीवाजवीपांचजन्य । त्रासलेअसुरतेधवा ॥६६॥महिषेंसिंहहोऊन । कंठकेशातेफुलऊन । अतिशयेतेणेंगर्जोन । गरुडानखेंविदारिला ॥६७॥नखेंविष्णूसीमारिली । महिषरुपेमहाबळी । श्रृंगेटोंचिलातेणेंहरी । विव्हलकेलातयानें ॥६८॥भयभीतनारायण । केलेंतेणेंपलायन । पावलात्वरेनिजभुवन । अवध्यजाणोनीपळेरुद्र ॥६९॥ब्रह्मागेलास्वलोकीं । धैर्यधरुनीसुरनायकीं । युद्धकेलेंबहुनेटकी । शतवर्षेंपर्यंत ॥७०॥शेवटींदेवथकले । शौर्यवीर्यव्यर्थगेलें । इंद्रादिदेवपळाले । स्थानेंटाकुनीआपुली ॥७१॥असुरांचाजयजाहला । महिष इंद्रपदींबैसला । यक्षकिंनरादिकींस्तविला । स्वर्गोपभोगभोगीतसे ॥७२॥सूर्यचंद्रवायूवरुण । सर्वांचीहिरोनीस्थान । तेथेंतेथेंदैत्यनेमून । करीकार्येस्वतेजें ॥७३॥हविर्भागदेतींब्राम्हण । स्वयेसेवीआपण । देवभोगितीदुःखदारुण । पीडाकरीनित्यतो ॥७४॥एवंबहुकाळतेअमर । दुःखितकरितीसंचार । विनवूनिमगब्रम्हाशंकर । देव आलेवैकुंठा ॥७५॥तेथीचाजोविचार । पुढिलेंअध्यायींसविस्तर । ऐकिजेश्रोतीसावध । रसभरितपुढेंपुढें ॥७६॥बावीसश्लोकदोनशत । महिषासुराजयहोत । देवपळालेसमस्त । कथावर्णिलीसुरसही ॥७७॥देवीविजयेपंचमेद्वितीयः ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP