पंचम स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । जननीतूंचिजगताची । पुरविणारतूंचिवासनेची । हरणारीसकलशत्रूची । वंदितोआम्हींहेचरण ॥१॥

रचिलेंसर्वचतुराननें । परीतेंतवशक्तीनें । नाहींइतरयुक्तीनें । रचूंशकलाचतुरतो ॥२॥

पाळितोसर्वशौरी । शक्तीतूचीह्रदयांतरी । हरसर्वजगाहरी । पाहतांशक्तीएकतूं ॥३॥

स्रजिशीपाळिशीहरशी । तूंचिस्वयेंसर्वकारशीं । निमित्ततिघांचेदाखवीशी । अलिप्तपणेंस्वकीयां ॥४॥

पाहतांयासंसारी । कार्यकर्त्रीतूंचिसारी । जीवमात्राचेकोशांतरी । पृथक्‍ नामेंदिससीतुं ॥५॥

मानव इच्छितोकीर्ती । लाभार्थचालवितोमती । कार्यार्थधरितोस्मृती । नामेंतुझीचसत्यत्वें ॥६॥

मिळोम्हणेउत्तमगती । श्रद्धायुक्तकरीधृती । करुणाकरीसर्वांभूतीं । नामेंतुझींचदयाळे ॥७॥

ममदेहींअसोपुष्टी । मनाअसोमाझेंतुष्टी । शुद्धहोवोम्हणेदृष्टी । नामभेदेंतूंचिसर्व ॥८॥

कांतीअसोमुखावरी । विद्यावसोजिव्हेंवरी । कालाजाणावीअंतरी । मेधाबुत्धीइच्छितो ॥९॥

क्षमादयाअंगींवसो । कमलामाझेंघरींअसो । जयाविजयारणीदिसो । सभाशोभावांछीतसे ॥१०॥

वसुधागिरीजासफलरमा । प्रमाधात्रीइच्छामना । नानार्थदायकतवनामा । घेतांकार्येंसाधितीं ॥११॥

नागकूर्मदिग्गज । धारणाशक्तीपावलेनिज । धरिलेंतैपृथ्वीसीसहज । महाभारकेवढा ॥१२॥

ब्रम्हाविष्णुइंद्रहर । चंद्रवन्हियमकुबेर । वायूगणेशादिदिनकर । ईशझालेतवकृपें ॥१३॥

यासींचमुख्यम्हणतीनर । तवमायामोहितांतर । यज्ञीबोलावितीसुर । हविर्भागविप्रदेतीं ॥१४॥

जरीतेस्वाहानम्हणती । देवानमिळेआहुती । ऐसेंजाणूनतुजप्रती । कांनयजतिविप्रते ॥१५॥

आपल्याअंशेकरुन । चराचरादेशींजीवन । सर्वांकरिसीभोगदान । दयासागरेपरिपूर्णे ॥१६॥

देवांजेवीपाळिशीं । अस्रुरांतेवीरक्षिशीं । आपपरनाहींतुजसी । जननीसत्यसर्वांची ॥१७॥

पुष्पपल्लवरहित । निर्फलवृक्षकंटकान्वित । सहजमनुष्यलावित । तोडीतनाहींतयासितो ॥१८॥

तेवींहेंजीवकानन । त्वांचिलाविलेंलीलेन । म्हणोनिकरिशींपालन । देवांपरीदैत्यांचे ॥१९॥

अक्षय्यभोगूंदेवांगना । ऐसीदैत्यांचीवासना । शस्त्रपूतकरोनित्यानां । स्वर्गस्थकरिशींसुखार्थ ॥२०॥

नवलएक आम्हांवाटतें । सर्वहोयतव इच्छेतें । किंचित्कार्यहेंतोंमाते । प्रयासकिमर्थयेवढा ॥२१॥

सहजभ्रूलताहलता । लयोत्पत्तीहोयतत्वता । क्षुद्रमहिषवधाकरितां । देहधारणनवलहें ॥२२॥

शस्त्रेंअस्त्रेंयुद्धतुमुल । किमर्थकेलेंबहुसाल । केवींनमेलेतात्काळ । तुझीइच्छाहोतांची ॥२३॥

दुसरेंनदिसेंकारण । क्रीडसीस्वयेंविनोदान । चरित्रकरिसीभक्ताकारण । ऐकावयागावया ॥२४॥

नातरीकासयाश्रम । तुजकाय असेदुर्गम । तूंस्वयेंवेदासीदुर्गम । भक्तासुलभयेणेंरुपें ॥२५॥

दुष्ठकलीचेंअंतरी । तुजनसेवितीदुराचारी । दैवेंवंचिलेंनिर्धारी । भवबंधकदांतुटेंना ॥२६॥

पुराणज्ञचेचतुर । जेधूर्तनेणतीसार । हरिहराचेसेवापर । करितीसर्वलोकांसीं ॥२७॥

प्राणरुपिणीप्रणवमया । व्याप्तसर्वांत आदिमाया । नानारुपेंकरुनिया । चराचरींभरलीसे ॥२८॥

प्रत्यक्षडोळांदिसे । शक्तिमयमनाभासे । शक्तिमयचीबोलतसे । तरीबापुडावैष्णव ॥२९॥

सूर्यचंद्रनक्षत्रींवसे । अग्नीविद्युत्तेजभासे । शक्तीह्यांतजीअसे । डोळांदिसेसर्वदा ॥३०॥

म्हणेसूर्यप्रभापसरली । चंद्रकांतिप्रगटली । नक्षत्रींज्योतीरेखिली । झळकलीपाहेवीज ॥३१॥

आधारशक्तीहीधरा । वायुचीगतीअवधारा । रुचीरसाचीमधुरा । पोकळीपहाव्योमाची ॥३२॥

एवंशक्तिमयदिसें । विचारकरितांमनाभासें । सर्वकर्माचेंमुळ असें । तेंहीबुद्धीशक्तिरुप ॥३३॥

द्विजत्वजेणप्राप्तहोय । अर्थज्याचाब्रम्हमय । नामत्याचेहीस्त्रीमय । गायत्रीजीवेदमाता ॥३४॥

एवंमातेतुजवांचून । रितेंनाहींकोठेंस्थान । परीतेतुजसोडून । शैववैष्णवम्हणवितीं ॥३५॥

कोणीसौर आम्हीवदतीं । कोणीगाणपत्यबोलतीं । शाक्तम्हणतांनिंदितीं । जाणतींतेमद्यप ॥३६॥

कोणीकृष्णकोणीराम । कोणीघेतींविठठलनाम । परीसर्वांचाजेथुनीउगम । तेंनामकोणीनस्मरती ॥३७॥

सूक्ष्मयाचाविचार । संतींकीजेसाचार । वेद आणिनामोच्चार । अक्षरापासावनिश्चयें ॥३८॥

तीजेथेंउदभवली । वाणीतीचप्रगटली । चाररुपेंविस्तारली । जगत्कार्यकराया ॥३९॥

पराप्रथमनिपजली । अक्षररुपातीसंचली । बहुधातीउच्चारिली । नाहींकोणीविशेषें ॥४०॥

अर्धमात्रातीचिअसे । शक्तिरुपस्पष्टभासे । अक्षादिभेदतेथेंनसे । अनुच्चार्यतेणेंती ॥४१॥

तीजपासावपश्यंती । नामतीचेवेदगाती । तीपाहेशूंन्याप्रती । सत्वगुणविशिष्टाती ॥४२॥

पूर्णमात्रातीजाहली । बीजरुपेंप्रगटली । वागभवरुपम्हणविली । स्वरात्मिकाजगदंबा ॥४३॥

तिजपासूनिमध्यमा । वाणीमायाआणिरमा । उत्पन्नकरीतेचिनिगमा । गायत्रीतीचवेदजननी ॥४४॥

तेथुनिपुढेंवैरवरी । स्थानकेलेरसनेवरी । पन्नासरुपेंप्रगटकरी । एकाक्षरापासाव ॥४५॥

मगशब्दाचाउच्चार । तेव्हांकळलेंविधिहरिहर । मूळशक्तीजीनिर्धार । सर्वेश्वरीतीचतूं ॥४६॥

एवंप्रत्यक्षजाणोनी । नलागतीतूझभजनी । हातींदीपपाजळोनी । अंधकुपींपडतीते ॥४७॥

तूंचिविद्यासुखकरी । अविद्यातूंचीदुःखकरी । आराधिलीनिरिच्छनरी । भोगलंपटनसविती ॥४८॥

विधिइंद्रादिहरिहर । सेवितीतुजनिरंतर । नसेवितीजेअधमनर । भवडोहींनिमग्नते ॥४९॥

धन्यधन्यतेचिजगती । जेतवपदाब्जसेवितीं । जन्मायेऊनीसफलकरितीं । कुळेंतारितीचौर्‍यांशीं ॥५०॥

कृष्णम्हणनृपती । एवंऐकुनीस्तुति । मृदुबोलेभगवती । दुःसाध्यकायवदाढुजें ॥५१॥

करालजेव्हांमाझेंस्मरण । तेव्हांचिप्रगटहोऊन । आपदासर्वहरीन । क्षणाभीतरीतूमच्या ॥५२॥

देवम्हणतीसर्वझालें । कार्यनाहीआतांउरलें । दुष्ठमहिषात्वांवधिले । लीलामात्रेकरुनी ॥५३॥

आतांमाते एककरी । दृढभक्तीचरणावरी । जडेतैसेंनिरंतरी । कार्य आमुचेंसदैव ॥५४॥

अपराध आमचेअनंत । घालिसीतूंपोटांत । ऐसातूंकृपावंत । नभजेतुजकोण ऐसा ॥५५॥

यादेहामाझारी । दोनमित्रपरस्परी । जीवशिवसुपक्षधारी । सखानाहींतिजातेथें ॥५६॥

शिवरुपिणीमित्ररुप । ह्रदईंतूचिअमूप । तुजटाकोनीजीवभूप । करीलकायएकला ॥५७॥

महापापीक्रूरखल । जोनस्मरेतवनामनिर्मल । सुखीदुःखीतूंचिकेवळ । शरण्य आम्हांसर्वस्वें ॥५८॥

वाक्यएवंऐकून । अंबाझालीअंतर्धान । विस्मितझालेदेवगण । स्वस्थानींसर्वगेले ॥५९॥

हेंआख्यानपरमपवित्र । दिव्यदेवीचेचरित्र । श्रवणपठणेंइहामत्र । मोक्षलाभनिश्चयें ॥६०॥

ऋषीसीवदलासूत । नृपासांगेशुकतात । चवेचाळीसश्लोकाप्रत । उकलूनसांगेमहालक्ष्मी ॥६१॥

देवीविजयेपंचमेषष्ठः ॥६॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP