सदस्यांची अपात्रता - कलम १०१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


जागा रिक्त करणे .

१०१ . ( १ ) कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही , आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहोंपैकी कोणत्याही एका सभागृहातील तिची जागा रिक्त करावी यासाठी संसदेकडून कायद्याद्वारे तरतूद केली जाईल .

( २ ) कोणतीही व्यक्ती , संसद व * * * * राज्याच्या विधानमंडळाचे सभागृह या दोन्हींची सदस्य असणार नाही , आणि एखादी व्यक्ती संसद व [ एखाद्या राज्याच्या ] विधानमंडळाचे सभागृह या दोन्हींची सदस्य म्हणून निवडली गेल्यास , राष्ट्रपतीने केलेल्या नियमांत विनिर्दिष्ट केला जाईल असा कालावधी समाप्त होताच तिने तत्पूर्वी त्या राज्याच्या विधानमंडळातील आपल्या जागेचा राजीनामा दिला नसेल तर तिची संसदेतील जागा रिक्त होईल .

( ३ ) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य ---

( क ) [ अनुच्छेद १०२ चा खंड ( १ ) किंवा खंड ( २ ) ] यामध्ये उल्लेखिलेल्यांपैकी कोणत्याही कारणामुळे अपात्र होईल तर , किंवा

[ ( ख ) सभापतीला , किंवा , यथास्थिति , अध्यक्षाला संबोधून आपल्या जागेचा सहीनिशी लेखी राजीनामा देईल आणि सभापती , किंवा , यथास्थिति , अध्यक्ष त्याचा राजीनामा स्वीकारील तर , ]

तदनंतर त्याची जागा रिक्त होईल :

[ परंतु , उपखंड ( ख ) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही राजीनाम्याच्या बाबतीत , मिळालेल्या माहितीवरुन किंवा अन्यथा आणि स्वतःला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर जर , असा राजीनामा स्वेच्छापूर्वक किंवा प्रामाणिकपणे दिलेला नाही अशी सभापतीची , किंवा , यथास्थिती , अध्यक्षाची खात्री झाली तर , तो असा राजीनामा स्वीकारणार नाही . ]

( ४ ) संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य सभागृहाच्या अनुज्ञेशिवाय साठ दिवसांच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर , सभागृहात त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करता येईल :

परंतु , साठ दिवसांचा उक्त कालावधी मोजाताना , ज्या कालावधीत सभागृहाची सत्रसमाप्ती झालेली असेल किंवा लागोपाठ चार दिवसांहून अधिक काळ ते तहकूब असेल , असा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जाणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP