कुलदैवत ओव्या - ओवी १५
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
संसार खेययीता पैला डाव गीरजाचा
जिकावून नेला ढवळा नंदी शंकराचा
संसार खेययीता संसाराचे बारा फासे
गिरजाव आला डाव शंकर मनामंदी हासे
अरन्या वनात शंकर सोडे जटा
समजाया आला गेला गिरजाचा हिय्या मोठा
अरण्या वनात शंकर करे तप
समजाया आल्या गेल्या गिरजा भिल्लनीची रुपं
चंद्रना सेनायाच्या हिर्या पलंगाना सईजाई
वचन देऊ गेली गिरजारानी सई
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012

TOP