दिवसाची गाणी - तारा धीना
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तारा धीना
तारा तारा धीना मन इजो रे
नारान देव त नारान दरखला रे
खुर्सीत बसून मझसी हसं रे
हा हाये फ़ुटला जातां
बिघडला नातां रे
बोटीची ती जोडव्या फ़ुटली रे
जोडव्या फ़ुटली भुईभार गेली रे
हातीचा तो चुडा फ़ुटेला रे
जलमाचा तो जोडा टूकेला रे
गरसोल टूकला भुईभार गेला रे
नमु चालं बैलाचे पाथ रे
नमू गेला काशीखंडाला रे
काशीखंडा किरणी उजेडली रे
एक किरण गेला महादेवाचे महाली रे
महादेव खुरसेत बसं रे
खुरसेत बसं महूरसी हसं रे
एक किरण गेला काले कंबलपुरा रे
काले कंबलपुरा किरणी उजेडली रे
चांदणीचा गण
चांदणीचा गण, मन गातेय रे...
नारान देव तो पाहिला रे
खुर्चीत बसून मला हसतो रे
रे हाय ऽ, फ़ुटले जाते
मोडले नाते रे.....
बोटांतील जोडवी तुटली रे
जोडवी तुटली मातीत मिसळली रे
हातातील चुडा फ़ुटला रे
जन्माचा जोडा तुटला रे....
गळ्यातील मंगळसूत्र तुटले रे...
मंगळसूत्र तुटले मातीत मिसळले रे
नमू चाले बैलगाडीच्या वाटेने
नमू गेला काशीखंडाला रे
काशीखंडात पहाट उजाडली रे
एक किरण गेला महादेवाच्या महाली रे
महादेव खुर्चीत बसला, मोहक हसला रे
एक किरण गेला काळ्या कमळपुरात रे
काळ्या कमळपुरात पहाट उजाडली रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP