नागपंचमीची गाणी - सणू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


सणू
वर्साच्या आल्या नागपंचमी
बापा मला नेसाया नाही काही
-आगं s तू माझे लाडके लेकी
जा तुझे मामा जवली

वर्साच्या आल्या नागपंचमी
आई मला भराया नाही काही
-आगं s तू माझे लाडके दुवं
जा तुझे मामी जवली

वर्साच्या आल्या नागपंचमी
बापा मला हाताला बांगड्या  नाही
-आगं s तू माझे लाडके लेकी
जा तुझे काका जवली

वर्साच्या आल्या नागपंचमी
आई मला गल्याला गाठी नाही
-आगं s तू माझे लाडके लेकी
जा तुझे काकी जवली

सण
वर्षाने आली नागपंचमी
बाबा,मला नेसायला नाही काही
-अगं, तू माझ्या लाडक्या लेकी
माग तुझ्या मामाजवळ

वर्षाने आली नागपंचमी
आई,मला अंगात चोळी नाही
-अगं, तू माझ्या लाडक्या लेकी
माग तुझ्या मामीजवळ

वर्षाने आली नागपंचमी
बाबा,मला थातात बांगड्या नाहीत
-अगं, तू माझ्या लाडक्या लेकी
माग तुझ्या काकाजवळ

वर्षाने आली नागपंचमी
बाबा,माझ्या गळ्यात सरी नाही
-अगं, तू माझ्या लाडक्या लेकी
माग तुझ्या काकीजवळ

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP