आदित्यानामंह विण्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥२१॥
बोलोनियां ऐसें । मग कृपावंत । म्हणे आदित्यांत । विष्णु तो मी ॥४४१॥
मी च तेजस्व्यांत । रवि रश्मिवंत । मरुत्समूहांत । मरीचि मी ॥४४२॥
नभीं नक्षत्रांत । चंद्र मी साचार । म्हणे शार्ङ्गधर । पार्थालागीं ॥४४३॥
वेदानां समवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानमस्मि चेतना ॥२२॥
मरुद्बंधु इंद्र । देवांमाजीं मी च । वेदांमाजीं साच । सामवेद ॥४४४॥
इंद्रियांमाझारीं । अकरावें मन । तें मी ऐसें जाण । कुंती -सुता ॥४४५॥
प्राणिमात्रांमाजीं । जी का स्वाभाविक । चेतना ती देख । मी च आहें ॥४४६॥
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावक्रश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥२३॥
सर्व रुद्रांमाजीं । शिव मदनारि । मी च तो निर्धारीं । धनुर्धरा ॥४४७॥
यक्षराक्षसांत । धनवंत जो कां । तो श्रीशंभु -सखा । कुबेर मी ॥४४८॥
अष्टवसूंमाजीं । अग्नि तो मी साच । पर्वतांत उंच । मेरु तो मी ॥४४९॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥२४॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥२५॥
जयाचें साहय्य । स्वर्ग -सिंहासना । जो का सर्वज्ञाना । आदिपीठ ॥४५०॥
पुरोहितांमाजीं । तो मी बृहस्पति । म्हणे रमा -पति । ऐक पार्था ॥४५१॥
महेशाच्या वीर्यें । अग्नि -संगें जाण । कृत्तिकांपासोन । जन्म ज्याचा ॥४५२॥
तो मी कर्तिकेय । स्वामी सुविख्यात । मुख्य सेनानींत । त्रिलोकींच्या ॥४५३॥
अर्जुना , सकळ । जळाशयीं साच । सागर तो मी च । जळराशि ॥४५४॥
महर्षिमाझारीं । तपस्वी जो थोर । जाण ऋषीश्वर । भृगु तो मी ॥४५५॥
सर्व वाणींमाजीं । सत्याचा उत्कर्ष । नित्य निर्विशेष । नांदें जेथें ॥४५६॥
तो मी एकाक्षर । ॐ कार निर्मळ । बोलिला वेल्हाळ । वैकुंठींचा ॥४५७॥
जो का कर्मादिक । साधनावांचोन । होतसे निष्पन्न ॥ इह -लोकीं ॥४५८॥
प्रणव -स्वरूपें । येई प्रत्ययास । पार्था ज्याचा त्यास । अंतरीं च ॥४५९॥
सर्व यज्ञाममाजीं । तो मी सोऽहंजप - । यज्ञ आपोआप । होय जो का ॥४६०॥
स्थावरामाझारीं । पर्वतांमधील । जो का हिमाचल । पुण्य -राशि ॥४६१॥
तो मी जाण ऐसें । बोलिला श्रीपति । आपुल्या विभूति । निवेदितां ॥४६२॥
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षींणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः । सिद्धानां कपिलो मुनिः ॥२६॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥२७॥
पार्था , कल्पद्रुम । आणि पारिजात । गुणें सुविख्यात । चंदन हि ॥४६३॥
परी सर्व वृक्षां - । माजीं जो पिंपळ । तो मी श्रीगोपाळ । म्हणे ऐसें ॥४६४॥
चित्ररथ तो मी । सर्व गंधर्वांत । जाण देवर्षींत । नारद मी ॥४६५॥
सर्व सिद्धांमाजीं । जो का मुनिवर्य । तो मी कपिलाचार्य । प्रज्ञावंता ॥४६६॥
पार्था , सुप्रसिद्ध । अश्वांमाजीं सर्व । उच्चैःश्रवा अश्व । तो हि मी च ॥४६७॥
क्षीर -सागराचें । करितां मंथन । निघे तयांतून । ऐरावत ॥४६८॥
तो मी सकल हि । हत्तींमाजीं जाण । होती जे भूषण । भूपतींसी ॥४६९॥
होवोनियां प्रजा । सर्व लोक पार्था । सेविती सर्वथा । जयालागीं ॥४७०॥
तो हि जाण माझा । विभूतिविशेष । होय जो नरेश । नरांमाजीं ॥४७१॥
आयु धानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥२८॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥२९॥
वज्र तें मी जाण । आयुधांमाझारीं । इंद्राचिया करीं । शोभतें जें ॥४७२॥
धेनूंमाजीं मी च । काम -धेनु जाण । म्हणे विष्वस्केन । अर्जुनासी ॥४७३॥
जन्मवित्यांमाजीं । जो का रति -पति । माझी च विभूति । मदन तो ॥४७४॥
सर्पकुळामाजीं । वासुकी मी श्रेष्ठ । नागांत वरिष्ठ । अनंत मी ॥४७५॥
जळ -देवतांत । पश्चिमेचा स्वामी । वरुण जो तो मी । म्हणे देव ॥४७६॥
अर्यमा नामक । पितृ -देवता जी । विभूति ती माझी । पितृगणीं ॥४७७॥
शुभाशुभ कर्में । ठेविती लिहोन । हिशेब घेवोन । मानसाचा ॥४७८॥
कर्म तैसें फळ । देवोनियां मग । सुख -दुःख -भोग । भोगविती ॥४७९॥
निग्रहानुग्रह - । कर्ते ऐसे जे का । होती यमलोका - । माजीं कोणी ॥४८०॥
त्यांत कर्मसाक्षी । तो मी यम -धर्म । म्हणे आत्माराम । रमा -पति ॥४८१॥
प्रह्लादश्चाऽस्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्र पक्षिणाम् ॥३०॥
प्रह्लाद मी देख । दैत्य -कुळीं भक्त । । होई ना जो लिप्त । दैत्य -भावें ॥४८२॥
ग्रासितयांमाजीं । जो का महाकाळ । तो मी श्रोगोपाळ । सांगे ऐसें ॥४८३॥
हिंस्त्र पशूंमाजी । जो का पंचानन । विभूति ती जाण । माझी च गा ॥४८४॥
पक्ष्यांत गरुड । तो मी अवधारी । मज पाठीवरी । वाहूं शके ॥४८५॥