मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनिवृत्तिनाथांची समाधी| अभंग १ ते १० श्रीनिवृत्तिनाथांची समाधी अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग १ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवनिवृत्तिनाथपुस्तक अभंग १ ते १० Translation - भाषांतर १ निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥दाही दिशा चित्त जालें असें सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥आतां माझे श्रम नको घेऊं हरी । जावें त्र्यंबकेश्वरीं समाधीसी ॥४॥पार माझा प्राण आला असे कंठीं । आतां जगजेठी सिद्ध व्हावें ॥५॥नामा म्हणे देवा दिवस नाहीं आतां । त्वरें वेगीं संता सिद्ध करा ॥६॥२ विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥गोपाळांचे भार उठले तातडीनें । चालिलीं विमानें सुरवरांचीं ॥३॥आतां त्वरें चला तुम्ही सप्तश्रृंगा । कार्य हें गोविंदा सिद्धि न्यानें ॥४॥आदि माया तेथें होईल दर्शन । संत साधुजन भेटतील ॥५॥नामा म्हणे धन्य तुझ्या योगें हरी । तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ॥६॥३ टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तीचें ॥२॥आत्मसुख एक बोलती बोलणीं । ज्ञानराज मनीं आठवतो ॥३॥ज्ञानराजें आमुचे निवविले डोळे । आतां ऐसे खेळे नाहीं कोणी ॥४॥ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखीं । आतां ऐसी सखी नाहीं कोणी ॥५॥नामा म्हणे स्वामी सांगतां प्रमाण । ऐकतां श्रवण खेद वाटे ॥६॥४ अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥नाशिवंत शरीर केलें अविनाश । घडविला विलास अध्यात्मींचा ॥३॥अविट बोलणीं आठवती मनीं । आतां त्रिभुवनीं दिसेनात ॥४॥तुझ्यामुळें हरि चालतो उगला । देहा आधीं गेला प्राण माझा ॥५॥नामा म्हणे देवा करितां ऐसा घोर । सांडील शरीर निवृत्तिराज ॥६॥५ जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥ऐसें पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥ज्येष्ठाच्या आधीं कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥३॥उफराटें फार कळलें माझें मनीं । वळचणीचें पाणी आढया गेलें ॥४॥अवघ्यापरीस कष्टी केलें मुक्ताईनें । कांहींच बोलणें घडलें नाहीं ॥५॥नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणें । अवघियांची मनें कळवळती ॥६॥६ गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥१॥काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । ते ज्ञान सोपानें संपादिलें ॥२॥अनुभवें निवविला चांगा वटेश्वर । विसोबा खेंचर सिद्ध जाला ॥३॥त्या ज्ञानें जाला चांगदेव विकळ । त्यागियेली सकळ अविद्या माया ॥४॥अज्ञानासी ज्ञान जालें तैं सहज । ऐसें निवृत्तिराज आठविती ॥५॥सप्तश्रृंगीं आले देव सुरगण । उतरिलीं विमानें नामा म्हणे ॥६॥७ देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥वदताती देव आणि सुरगण । उतरिलीं विमानें ठायीं ठायीं ॥३॥सकळांनी पूजा केली आनंदानें । करिती कीर्तनें अंबेपुढें ॥४॥मंडपीं बैसले निवृत्ति नारायण । नारदकीर्तनें पुढें होत ॥५॥नामा म्हणे देवी पहाती सकळ । पूजिती गोपाळ आनंदानें ॥६॥८ वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥म्हणती पांडुरंगें दावियेलें स्थळा । निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥पंचमीचे दिवशीं गेले पंचवटी । उतरले तटीं गौतमीचे ॥४॥नामाअ म्हणे शेवट केला वनमाळी । रहाती ये स्थळीं निवृत्तिराज ॥५॥९ सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥विसोबा खेचर परिसा भागवत । अनेक ते संत बैसविले ॥३॥मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक । पाहाती कौतुक गौतमीचें ॥४॥दशमीचे दिवशीं केलें तें प्रस्थान । विधि नारायण सांगतसे ॥५॥नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ । जालासे विकळ निवृत्तिराज ॥६॥१० सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासीं । उत्सव निवृत्तीसी देवें केला ॥३॥द्वादशीं पारणें सोडिती वैष्णव । समारंभ देव करितसे ॥४॥राहिली ते शक्ति गळालें शरीर । देह अहंकार त्यागियेला ॥५॥कोणाची करावी पूजा कोणें कोणा । अवघेअ नारायणा करणें येथें ॥६॥नामा म्हणे देवा मुक्ताईची गती । सांडिलें निवृत्ति शरीरासी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP