काव्यरचना - म्हस्के यांस पत्न
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
॥अखंड॥
आजारी शत्नूच्या जाई खबरीस ॥ साह्यकारी त्यास ॥ खरा शूर ॥१॥
झालें गेलें सर्व आणूं नये मनीं ॥ सूड कारस्थानी ॥ वर्तू नये ॥२॥
नीट झाल्यावर त्यास उभा करी ॥ कुस्तीगीरापरी ॥ त्याशीं लढे ॥३॥
सत्याआचरणीं यश मिळवावें ॥ जगा दाखवावें ॥ जोती म्हणे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP