मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग ३| मानव महंमद विभाग ३ बळी राजा मानव महंमद संस्थान बडोदें यांना पत्न जगन्नाथ यांना पत्न उत्तर म्हस्के यांस पत्न काव्यरचना - मानव महंमद महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले मानव महंमद Translation - भाषांतर १महंमद झाला जहामर्द खरा ॥ त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥जगहितासाठी लिहिलें कुराण ॥ हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥मन केलें धीट, धरीली उमेद ॥ नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ उभारील्या ॥९॥कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ कल्याणाची हाव ॥ पोटीं माया ॥१३॥मूर्तीपूजकांच्या बंडासी मोडीलें ॥ ढोंगी वळविले ॥ ईशाकडे ॥१४॥देव एक ऐसें ग्रंथांसी स्थापिलें ॥ जग-बन्धु केलें ॥ मनुजास ॥१५॥तेणें धर्मगुरु तप्तची जहाले ॥ हट्टासी पेटले ॥ मूर्तीसाठीं ॥१६॥ढोंगी धार्मीकांनीं पाठलाग केला ॥ विवरीं लपला ॥ डोंगराच्या ॥१७॥ईश रक्षी त्याला लंड वधूं गेले ॥ शोधीत फिरले ॥ सर्व व्यर्थ ॥१८॥मेल्यामार्गे बहु त्याचे शिष्य झाले ॥ बळीस्थानीं आले ॥ किती एक ॥१९॥कळूं आलें त्यांना आर्याजी अभद्र ॥ मुक्ते केले शुद्र ॥ दास्यांतून ॥२०॥इस्लामा प्रसारी, आर्या घशीं पाडी ॥ खीळी सत्य-बिडी ॥ त्यांचे पायीं ॥२१॥आर्यं वस्यु इस्लामानें मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ सर्व काळ ॥२२॥आर्यंधर्म-भंड इस्लामें फोडीलें ॥ ताटांत घेतले ॥ भेद नाहीं ॥२३॥मांगासह आर्या नेलें मसीदींत ॥ गणी बांधवांत ॥ आप्त सखे ॥२४॥क्षत्निया जिंकलें राज्य त्यांचे झालें ॥ मोंगलांनीं केले ॥ मुक्त कांही ॥२५॥जातिभेदाभेदीं फायदा तो साचा ॥ मुसलमानांचर ॥ झाला मोठा ॥२६॥अंत्यजास धरी पोटीं सावकाश ॥ लाजवी आर्यास ॥ सर्व काळ ॥२७॥म्हणूनीयां आर्य बोंब मारीताती ॥ शिमगा खेळती ॥ ब्रह्मरुपी ॥२८॥भेद सोडुनीयां एका ताटीं खाती ॥ एकच बनती ॥ म्हणोनीयां ॥२९॥इस्लामासी मान शुद्र राजे देती ॥ कर्बलास नेती ॥ ताबूतास ॥३०॥इस्लामी बांधव अचंबा करीती ॥ धूळ फेकीताती ॥ मनूवर ॥३१॥मनुस्मृति आहे पाखांडाची मुळी ॥ गिर्वाणाचे तळीं ॥ विळपळे ॥३२॥कणकणीच्या गाई ब्राह्मण भक्षीती ॥ कां रे चिडवीती ॥ मुसलमाना? ॥३३॥आर्य गाई खाती, वरी शुद्ध होती ॥ शुद्रा लढवीती ॥ जोती दावी ॥३४॥------------------------------------------------------------------------------------------------------------२आर्यधर्म श्रेष्ठ वाखाणीतो ॥ जुलमी म्हणतो ॥ मोंगलास ॥धृ.॥भटपाशांतून शुद्र मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ कोणी दादा? ॥१॥देशामाजी कोणी उन्माद तो केला ॥ शुद्र वागवीला ॥ दासापरी? ॥२॥जिंकल्या क्षेत्न्यास पिशाच्य म्हणाला ॥ ग्रंथांर्नी नोंदीला ॥ वैरभावें ॥३॥अहंब्रह्म हाच कसा निवडीला ॥ तुच्छ मानण्याला ॥ मनुज्यांस ॥४॥आपुल्या पूर्वजां वर्णी बेलगामी ॥ हे ते म्हणे स्वामी ॥ निर्मीकाचे ॥५॥आर्यांचे पूर्वज मच्छकच्छ व्याले ॥ डुकरीनें दिलें ॥ तिजें बाळ ॥६॥खांबातील किडा मानव बनला ॥ वधी भूपतीला ॥ पोट फाडी ॥७॥कपटी वामन अगडबंब झाला ॥ घाली रसातळा ॥ बळीराजा ॥८॥आर्या अवतार परशुरामाचा ॥ वैरी विधवांचा ॥ बाळे वधी ॥९॥पडल्या विरास लाथांनीं मारीतो ॥ माकड लढतो ॥ लंकापुरीं ॥१०॥पशूंचा अलाप भटा ऐकू येतो ॥ टोणगा बोलतो ॥ चारी वेद ॥११॥होते आर्य यज्ञीं ब्राह्मणकसाई ॥ हंबरती गाई ॥ भटामार्गे ॥१२॥ब्राह्मण बोडक्या काळ्या पाण्या जाती ॥ ऋषी गुण गाती ॥ वर्णू किती ॥१३॥आतां म्हारमांग किर्तन करीतो ॥ शिमगा खेळती ॥ आर्य नांर्वे ॥१४॥नाटकांत भट स्त्नीवेश घेती ॥ नाक उडवितो ॥ वेश्येपरी ॥१५॥भट थाप देती भोळ्या इंग्रजांस ॥ नित्य देती त्नास ॥ शुद्रादिकां ॥१६॥भटजी शिकूनी कामगार होती ॥ शुद्राला नाडीती ॥ सर्वोपरी ॥१७॥आर्य धर्मलंड शुद्रा फसवीती ॥ यवना र्निदीती ॥ खिस्तासह ॥१८॥मुसलमानांना निच्यांत गणीती ॥ हॉटेलांत पीती ॥ बरांडीस ॥१९॥मास आंड्यासह बिस्कीटास खाती ॥ पुस्तकें रचीती ॥ मतलबी ॥२०॥इतिहासग्रंथ खुबीनें याचीती ॥ शुद्रांत पेरीती ॥ राजद्रोह ॥२१॥भुललेत शद्र आर्य सेवायास ॥ मुसलमानांस ॥ त्यागावया ॥२२॥आर्यभट स्थापी न्याशनल सभा ॥ नारदाचा सुभा ॥ टाळ्या पिटी ॥२३॥क्षत्नीया पाहूनी बळिस्थानीं मुढ ॥ करी धडपड ॥ कळचेट्या ॥२४॥मुसलमानाला म्हणे एकी करा ॥ एकीकडे सारा ॥ तूर्त धर्म ॥२५॥भट सोदे साई पोटामध्ये ठेवी ॥ म्लेंच्छास फसवी ॥ पक्का धूर्त ॥२६॥डोईचा पदर सदा खांद्यावर ॥ नाग डोक्यावर ॥ वीष पोटीं ॥२७॥रोज घाली वेणी भांगांत गुलाल ॥ सोडी बहु ताल ॥ चालतांना ॥२८॥अंगीं कामवीर भवाया कमानी ॥ शर नेत्नांतूनी ॥ सोडो नित्य ॥२९॥भोळ्या इंग्रजास भाव दावीताती ॥ मेजवान्या देती ॥ दीमाखानें ॥३०॥भटीण न्हावून धाब्यावरी जातां ॥ केस वाळवीतां ॥ कांती फाके ॥३१॥भटणीचा इंगा विचारी दावीदा ॥ काममोहगदा ॥ करी चेंदा ॥३२॥भटणीला आहे कंचुकी सोरट ॥ सोवळ्याचा वीट ॥ भटा नाहीं ॥३३॥तीर्थयात्नीं आर्यं अंगस्त्नें नेती ॥ फुगड्या खेळतो ॥ पंढरीस ॥३४॥शुद्र घरीं पुजा खेळ मांडी भट ॥ देवा करी न ॥ हितासाठी ॥३५॥बळीस्थानीं किती आर्यभट लंड ॥ देवाजीचे भंड ॥ ज्यांनीं केले ॥३६॥ढोंगासाठीं खळ वर्दळीस येती ॥ यवना र्निदीती ॥ चुलीपाशीं ॥३७॥यवनी भाषेत लिहितां अहंता ॥ आर्याजीच्या सुंता ॥ करितील ॥३८॥मोठमोठे वीर जंगी झाले ठार ॥ पडद्याचा सार ॥ ऐक भटा ॥३९॥अल्पसा पडदा तारी तरुणास ॥ विषयलंपटास ॥ रीग नाहीं ॥४०॥कदापि पडदा सज्जनीं नसावा ॥ समूळ त्यागावा ॥ जगामाजी ॥४१॥ओंगळे सोवळें तुझें फार द्वाड ॥ मोडी हाडोहाड ॥ अंत्यजाचें ॥४२॥हलाल कंदुरी शुद्रादीक खाती ॥ दुरुनी वाढीती ॥ फकीरास ॥४३॥सावकारी खूण शूद्रास लुटीतो ॥ भटास वाढीतो ॥ तूपपोळ्या ॥४४॥अनाथांची मुलें दुरुन पहाती ॥ लाळीस घोटीती ॥ मुकाट्यानें ॥४५॥भटजी शुद्रांच्या पोरा आधीं खाता ॥ उष्टेमाष्टें देती ॥ यजमाना ॥४६॥सदोदित म्हण अशिक्षित ॥ बोधितो पत्नांत ॥ अडबंका ॥४७॥राष्ट्रसभेसाठीं मित्न होऊं जातो ॥ येईन म्हणतो ॥ मद्रासेस ॥४८॥जसे मांग म्हार याचे नव्हे दादा ॥ पुन्हा शत्नुभेद ॥ जागा देतो ॥४९॥आर्य ब्राह्मणांनी शुद्र नागवीले ॥ नित्य बोंबलले ॥ ॥ शिमग्यांत ॥५०॥ताबुता करुन नाहीं उमजले ॥ फकीर ते झाले ॥ इमामाचे ॥५१॥नटी नारसिंह सोंगास बा घेती ॥ तेंच गाणे गाती ॥ ताबुतांत ॥५२॥सोमरस दारु यज्ञीं भट पिती ॥ गाईमांस खाती ॥ हाय हाय ॥५३॥थोतांडें रचितो देवा लाथ देवी ॥ भट लांच खाती ॥ हाय हाय ॥५४॥धूर्त भट शास्त्री निलाजरे होती ॥ खोटे लेख देती ॥ हाय हाय ॥५५॥विषारी नागास फेकी दुधपेढा ॥ भट भ्याला वेडा ॥ हाय हाय ॥५६॥आर्या देईं गोता ॥ करुं नको आतां ॥ हाय हाय ॥५७॥आर्य धर्म श्रेष्ठ ॥धृ.॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP