काव्यरचना - उत्तर

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


उत्तर देतों गंगोबांना ॥ म्हस्के वकीलांना ॥ उत्तर.....॥ ध्रुपद ।

पोट भरेना म्हणून भटजी सोडी ईराणा ॥ बळीस्थानीं येऊनी
यांनी केला धिंगाणा ॥१॥

कपटनीतीनें यांनीं जिंकलें क्षत्निम मर्दांना ॥ दास केल्या शुद्र गणणें
बटटा शिपायांना ॥२॥

कष्ट करीना आपुल्यासाठी मिरवी दिमाखांना ॥ शुद्रा घरीं भिक मागणें
बट्टा भटांना ॥३॥

उठा झडकरी, त्यागा सर्व, जागवा शुद्रांना ॥ पोटावरतीं नजर देणें
भय संतानांना ॥४॥

भटुजी दास राहण्या शुद्रबांधवांना ॥ कल्पनेचे ग्रंथ स्थापुत
वेडे करी त्यांना ॥५॥

नेंशनल सभा नदी काढिली सांगे यवनांना ॥ इंग्रजांचे दोष काढी ॥
बोधी कारस्थाना ॥६॥

व करी मना ॥ तो त्यापरी ब्रह्म घोकणें
पोषी ढेकुणांना ॥७॥

डोंगासाठीं सोवळे दावी फसवी मुढांना ॥ पोटासाठीं ब्रह्म त्यागी
खाई बिस्कुटांना ॥८॥

कष्टा सांडुन भिक मागणें बट्टा मनुजांना ॥ दीन शुद्रा उष्टें वाढणें
भटजी लाजेना ॥९॥

कसबी मुखविटाळ मानीना ॥ शुद्ध राजांना नीच मानी
घेईना पंक्तींना ॥१०॥

शुद्र शिकतां नोकरी घेतील धाक मंडूकांना ॥ कारभारी चोर नेमणें
नाडी अबलांना ॥११॥

सिवील सर्वीस भटा पाहिजे गाती पाळणा ॥ कोळशास नित्य धुतलें
सफेद होईना ॥१२॥

लाथ विष्णूला भूदेव मारतो दावी धूर्तपणा ॥ अशा दुष्टा देव मानणें
ईशा उणेपणा ॥१३॥

शुद्र म्हणतो धर्म रक्षणें क्षेत्न्याचा बाणा ॥  धूर्त आर्याचा पक्ष घेई
ठोकी मुसलमाना ॥१४॥

नसेल तेथें कळ काढणें भटजीच्या ध्याना ॥ आपण एकीकडे राही
लढवी मूर्खांना ॥१५॥

पेशावाईची पुन्हा स्थापना बंडखोर नाना ॥  परशुरामी खुण देतो
इंग्लीश पोरांना ॥१६॥

नि:क्षत्निय ते पृथ्वी म्हणती करिती विटंबना ॥ बेलगामी वर्मी टोंचीती
जाची शुद्रांना ॥१७॥

व्हाना ॥ अरेरावी लेख तोलून
योजा उपायांना ॥१८॥

भटपाशा सोडून तुम्ही यावें मैदाना ॥ शुद्र बांधवां सत्य सांगून
खुल्ले कराना ॥१९॥

शुद्र जनांची आज करिती भटजी हेळणा ॥ जोती म्हणे पुढें सांगूं
धूर्त आर्यांना ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP