मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग १| उद्योग विभाग १ मानवांचा धर्म एक मानवी स्त्रीपुरुष आत्मपरीक्षण नीति धीर समाधान सहिष्णुता सद्विवेक उद्योग स्वच्छता गृहकार्यदक्षता काव्यरचना - उद्योग आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले उद्योग Translation - भाषांतर १.मानवा उद्योग अनेक आहेत ॥ ब-यावाईटांत ॥ काळ जातो ॥१॥आपहितासाठी उद्योग करीती ॥ मार्ग दावीताती ॥ संतानास ॥२॥त्यापैकी आळशी दुष्ट दुराचारी ॥ जन वैरी करी ॥ सर्व काळ ॥३॥जसा ज्याचा धंदा तशीं फळें येती ॥ सुखदु:ख होती ॥ जोती म्हणे ॥४॥२.सत्य उद्योगानें रोग लया जाती ॥ प्रकृती ती होती बळकटा ॥१॥उल्हासीत मन झटे उद्योगास ॥ भोगी संपत्तीस ॥ सर्वकाळ ॥२॥सदाचार सौख्य त्याची सेवा करी ॥ शांतता ती बरी ॥ आवडीनें ॥३॥नित्य यश देई त्याच्या उद्योगास ॥ सुख सर्वत्रांस ॥ जोती म्हणे ॥४॥३.उद्योग जो करी दीनबंधूंसाठीं ॥ ममता ती पोटी ॥ मानवाच्या ॥१॥विद्या सर्वा देई सद्गुणाची हाव ॥ करी नित्य कींव ॥ अज्ञान्याची ॥२॥थकल्या भागल्या दीना साह्य करीं ॥ उद्योगास सारी ॥ जपूनीयां ॥३॥त्याच्या उद्योगास नित्य यश देई ॥ जगा सुख देई ॥ जोती म्हणे ॥४॥४.सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता ॥ बाळपणीं कित्ता ॥ मुलीमुलां ॥१॥तरुणपणांत दुर्गूणी संसारीं ॥ वृद्वपणीं करी ॥ हाय हाय ॥२॥उद्योगा सोडूनी कलाल बनती ॥ शिव्याश्राप देती ॥ जनामाजी ॥३॥आळशास सुख कधींच होईना ॥ शांतता पावेना ॥ जोती म्हणे ॥४॥५.धनाढय आळशी जुव्वेबाज होती ॥ चोरुन खेळती ॥ एकीकडे ॥१॥डाव जिंकितांच बक्षीसें वेश्यांस ॥ खाऊ चोंबडयांस ॥ सर्व काळ ॥२॥द्रव्य हरतांच शेतावर पाळी ॥ सर्व देई बळी ॥ घरासह ॥३॥सर्व ऋतुमध्यें फिरे नंगा भुका ॥ मारीतसे हांका ॥ पोटासाठी ॥४॥आळशाचा धंदा नि:संग बा होती ॥ भिकेस लागती ॥ जोती म्हणे ॥५॥६.आळशांचा धंदा उद्योग करीती ॥ दुकान मांडिती ॥ सोरटीचें ॥१॥नांवनिशी नाही पैश देई त्यांची ॥ आदा आढाव्याची ॥ देत नाहीं ॥२॥उचल्याचे परी मुढास नाडीती ॥ तमाशा दावीती ॥ उद्योग्यास ॥३॥अशा आळशाची शेवटीं फजीती ॥ धूळमाती खाती ॥ जोती म्हणे ॥४॥७.रोजगारासाठी पैसा नसे गांठीं ॥ अज्ञान्यास गांठी ॥ नफा हल ॥१॥शअर घेणा-यास गळीं भाल दोरी ॥ पावतींत सारी ॥ जडीबुट्टी ॥२॥पशे बुडाल्यास नाहीं त्यास दाद ॥ सुका आशीर्वाद ॥ भटासाठीं ॥३॥उचल्याच्या परी खिसे कातरीती ॥ तोंड लपवीती ॥ जोती म्हणे ॥४॥८.शेअरमाकिटांत खप कागदाचा ॥ नफा दलालाचा ॥ बुड धन्य ॥१॥शेअरकागदास पाहूनी रडती ॥ शिव्याशाप देती ॥ योजी त्यास ॥२॥शेअर व्यापाराचा जळो तो उद्योग ॥ होऊनी नि:संग ॥ मुढा लुटी ॥३॥ आळशाचा खरा नित्य हाच धंदा ॥ दुरुनच वंदा ॥ जोती म्हणे ॥४॥९.सधन जगांत मारुनियां गप्पा ॥ देई व्यर्थ थापा ॥ पैसा लूट ॥१॥द्रव्यलोभासाठीं शेतास काढीती ॥ जल हाटवीती ॥ सागराचें ॥२॥जगामधीं ठक धनवान होती ॥ दिवाळे काढीती ॥ अखेरीस ॥३॥त्याच्या संगतीनें द्रव्यहीन होती ॥ प्राणास मुकती ॥ जोती म्हणे ॥४॥१०.शेअर्स काढून उद्योग काढण ॥ हिशेब ठेवणें ॥ रोजकीर्द ॥१॥खतावणी सर्व बिनचुक ठेवी ॥ नफातोटा दावी ॥ शोधी त्यास ॥२॥जामीन देऊन नितीने वर्तावें ॥ सर्वां वांचवावें ॥ अब्रूमध्यें ।३॥शेअर्स विकु गेल्या कांहीं नफा व्हावा ॥ जगा दाखवावा ॥ जोती म्हणे ॥४॥११.आळशाचा धंदा उद्योग काढीती ॥ भिंतीस फोडीती ॥ मध्यरात्रीं ॥१॥जाईल तितकी चोरी ते करीती ॥ मुकाटयानें जाती ॥ घरांतून ॥२॥दुष्ट नष्ट गूण अंगीं जडताती ॥ सर्पवत होती ॥ जगा त्रास ॥३॥त्यांच्या उद्योगास येत नाहीं यश ॥ रागावतो ईश ॥ जोती म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP