ब्राह्मणांचे कसब - चाल नववी
हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.
॥अभंग॥
उत्तम ब्राह्यण जन्म हिंदुस्थानीं ॥
दिसे शुद्रावाणी अखंडीत ॥१॥
दोरा घालुनीया शुद्र द्विज केला ॥
नाहीं पालटला जरा कोठे ॥२॥
द्वाड खोडकर स्वभाव देहाचा ॥
जाईना सुळीचा वज्रलेप ॥३॥
स्नान संध्या नित्य टिळाटोपीवर ॥
घेती मांडीवर जारीणीस ॥४॥
नेसुनी सोवळें विटाळसा झाला ॥
शिवेना शूद्राला शुद्व कैसा ॥५॥
श्रवण वेदाचें शुद्रा बंद केलें ॥
मुळीं शिकवीलें इंग्लिशांना ॥६॥
भूदेव होवूनी पायां पडविती ॥
पायथीं पडती रांडांच्या हो ॥७॥
शुद्राला भोजन दुरुन वाढिती ॥
मद्यपान घेती शाक्तमिषें ॥८॥
पायधुववणी शूद्रा तीर्थ देती ॥
मुखरस पिती यवनीचा ॥९॥
विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला ॥
जोडा सांभाळीला ब्राह्यणाचा ॥१०॥
हातांतील जोडे मधीं टांकू नका ॥
शोध करा नीका जोती म्हणे ॥११॥
समाप्त
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP