मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|ब्राह्मणांचे कसब पोवाडा| चाल तिसरी ब्राह्मणांचे कसब पोवाडा चाल पहिली चाल दुसरी चाल तिसरी चाल चवथी चाल पाचवी चाल सहावी चाल सातवी चाल आठवी चाल नववी ब्राह्मणांचे कसब - चाल तिसरी हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा. Tags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले ब्राह्यण जोशी शूद्राच्या लग्नांत त्यास कसा बुचाडतो याविषयीं. Translation - भाषांतर ॥अभंग ॥मागणीच्या वेळीं जोशीबुवा येई ॥राशीबळ पाही दिमाखीनें ॥१॥स्वहिताची आस न्यून कल्पोनियां ॥ग्रह योजूनिया जप स्थापी ॥२॥लग्न वर्तवितां दुकान मांडलें ॥गणपती केले सुपारीचे ॥३॥खारका खोबरे नैवेद्याचा भार ॥दक्षिणा रीतसर पैसालूट ॥४॥टिपी कागदांत तिथी नेमिलेल्या ॥कुंकें शोभविल्या हातीं दिल्या ॥५॥वर्ष वय गूण तोलून पाहाणी ॥नाहीं येत मनीं ज्याच्या लेश ॥६॥लग्नाचे आधीं मोठी गडबड ॥धावे दुडदुड दोहींकडे ॥७॥सुरवात केली वरा वस्त्रें देई ॥भाळीं टिळा लावी देऊळांत ॥८॥उठे झडकरी मांडवांत जाई ॥बोले लवलाहीं त्वरा करा ॥९॥हातीं शस्त्रें देई पाठराखे केले ॥मामा नेमियेले परस्पर ॥१०॥मध्ये उभा राहे हातीं अंतरपाट ॥मंगळाचा पाठ सुरु केला ॥११॥टाळयांच्या गोंधळी वाद्यांचा दणाण ॥म्हणे शुभ लग्न सावधान ॥१२॥वधूवर दोघे बिचारे अज्ञानी ॥दिले गुंतवूनी जन्मभर ॥१३॥अगांतुक बाकी धांदलीनें येती ॥हात पसरिती पैशासाठी ॥१४॥सूत गुंडाळूनी वधूवरां कोंडी ॥दक्षिणा ती तोंडी बीजमंत्र ॥१५॥काडयामुडया जाळी लज्जाहोम केला ॥नाही मनीं धाल लज्जाहीन ॥१६॥उभयतांच्या काळ तेलसाडी देता१ ॥नाक मुरडतां वेळ जाई ॥१७॥फार थोडी ह्यणे मांडवखंडणी ॥घेई तो भांडूनी अखेरीस ॥१८॥परजातीवर तुह्यी सोपूं नका ॥बुडवितां फुका धर्ममीष ॥१९॥वडील धाकुटे स्नेही उभयतांचे ॥पंच स्वजातीचे निवडुनी ॥२०॥वर्ष वय गुण प्रित परस्पर ॥पाहा सारासार तपासुनी ॥२१॥देवा प्रार्थूनिया घालवावी माळ ॥मेळऊनी मेळ आनंदाचा ॥२२॥ब्राह्यणांचे येथे नाहीं प्रयोजन ॥द्यावे हाकलून जोती ह्यणे ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP