विषयानन्द - श्लोक २१ ते ३५

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


घोर आणि मुढ या दोन वृत्तीमध्यें सत्ता आणि चैतन्य हे दोन स्वभाव व्यक्त असतात, आणि शांत वृत्तीमध्यें सत्त चैतन्य आणि सूख ते तीन ही व्यक्त होतात याप्रमाणें मिश्र ब्रह्म सांगितलें. (२१)

आतां जें अमिश्र म्हणजे शुद्ध ब्रह्म आहेतें ब्रह्म आणि योग यांहींकरुन समजलें जातें, ते ज्ञान योग पुर्वीच सांगितलें आहेत. प्रथमाध्यायीं म्हणजे ब्रह्मनंद प्रकरणी योगाचा विचार पुर्वींच सांगितलें पुढील दोन अध्यायांत ज्ञान सांगितलें. (२२)

असत्ताज्याड्या आणि दुःख ही तीन मायेंची रुपें आहेत. नरशृंगादिकाचेठायीं असत्ता पहावी. काष्ठशिलादिकाचेठायीं जाड्य पहावें. (२३)

आणि घोर व मूढ वृत्तीचेठायीं दुःख अनुभवास येतें या प्रकारें माया पसरलीं आहे. शात आदिकरुन ज्या बुद्धिवृत्ति सांगितल्या त्यांशी ऐक्य पावल्यामुळे मिश्र ब्रह्म असें ह्मटले. (२४)

हें सर्व येथें सांगण्याचें कारण इतकेंच कीं ब्रह्मध्यान करण्याची ज्याची इच्छा असेल त्याने नरशृंगादिकाचे उपेक्षा करुन बाकी उरेल त्याचें ध्यान करावें. (२५)

ह्मणजे असें कीं शिलादिकाचेठायीं नाम आणि रुप हीं दोन वर्ज्य करुन केवळ अस्थित्वाचे चिंतन करावें घर आणि मुढ या दोन वृत्तीचेठायीं दुःख तेवढें वर्ज्य करुन सत्ता आणि चैतन्य यांचें ध्यान करावें. (२६)

आणि शांतवृत्तीचेठायीं सत्ता, चैतन्य आणि आनंद या तिहींचेंहीं ध्यान करावें यांत पाहिलें कनिष्ठ दुसरें मध्यम आणि तिसरें उत्तम प्रतीचे ध्यान समजावें. (२७)

मूढाच्या व्यवहारांत देखील मिश्र ब्रह्मचें उत्कृष्ट चिंतन करतां यावें म्हनुन या प्रकरणीं विषयानंदाचा विचार आम्हीं सांगितला. (२८)

उदासीन स्थितीमध्यें वृत्ति शिथिल असल्यामुळें वामनानंद असतो. तेव्हा जे ब्रह्मध्यान होतें ते उत्तमोत्तम होय. याप्रमाणें चार प्रकारचें ध्यान समजावें. (२९)

हें जें शेवटलें ध्यान सांगितलें त्याला ध्यान म्हणणें देखील गौणच. कारण ज्ञान आणि योग यांच्या सहाय्यानें ती ब्रह्मविद्याच होते. या ध्यानेंकरुन चित्ताचें ऐकाग्र्य झालें असतां ती विद्या दृढ होते. (३०)

ती विद्या स्थिर झाली असतां सत चित, आनंद हे तीनहीं ब्रह्मचे स्वभाव भेदक उपाधि गेल्यामुळे अखंडैकरसात्मतेप्रत पावुन एकरुप होतात. (३१)

ते भेदक उपाधि कोणते म्हणाल तर शांत कृत्ति घोर वृत्ति आणि शिलदि जड पदार्थ हे होते योगेंकरुन किंवा विवेकें करुन या उपाधीचा निरास होतो. (३२)

मग निरुपाधि असें स्वयंप्रकश ब्रह्मच राहतें तेथें त्रिपुटी नसल्यामुळे त्यास भूमानंद असें ह्मणतात. (३३)

याप्रमाणें ब्रह्मनंद प्रकरणाच्या पांचवें अध्यायांत हा विषयानंदाचा विचार सांगितला या द्वारें अंतरी प्रवेश करावा. (३४)

या ब्रह्मनंदेकरुन हरिहर प्रसन्न होवोत व आपल्याठायीं आश्रय पावलेलें जे शुद्ध मनाचें प्राणी आहेत त्याचें सरंक्षण करोत.

इति विषयानंद समाप्त ॥

N/A


References : N/A
Last Updated : March 19, 2010