विषयानन्द - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


विषयानंद प्रापंचिक असल्यामुळे जरी तो मुमुक्षूस ग्राह्म झाला नाहीं तथापि तो ब्रह्मनंदाचा अंश असल्यामुळे त्याचें निरुपण ब्रह्मज्ञान होण्यास फार उपयोगी आहे. म्हणून तें आह्मीं या प्रकरणीं करितों. हा विषयानंद मोक्षाचें द्वार आहे. तो ब्रह्मनंदाचा अंश आहे. एतद्विषयीं श्रुतिप्रमाण असें आहे. कीं (१)

"हा जो ब्रह्मनिष्ठाचा अखंडैकरस परमानंद, त्याच्या अंशभूत आनंदाचा उपभोग इतर भूतें घेतात " असा श्रुत्यर्थ आहे. (२)

आतां विषयानंद ब्रह्मनंदाचाच अंश आहे हें नीट समजावें म्हणून तदुपाधिभूत अंतःकरणाच्या वृत्ति येथें सांगतों, या मताच्या वृत्ति तीन प्रकारच्या आहेत शांत , घोर, आणि मुढ वैराग्य , क्षमा औदार्य इत्यादि वृत्ति शांत होत. (३)

तृष्णा, स्नेह राग, लोभ इत्यादि मूढ वृत्ति समजाव्या आणि मोह भय इत्यादि मुढ वृत्ति होत. (४)

या सर्व वृत्तीचेठायीं ब्रह्मचा चैतन्यस्वभाव प्रतिबिंबित असतो. परंतु त्याच्या आनंदस्वभावाचे प्रतिबिंब केवळ शांतवृत्तीमध्यें मात्र पडतें (५)

यांस "रुपं रुपं बभूवासौ प्रतिरुप; " ( एकच परमात्मा भिन्न भिन्न रुपाप्रत पावला. ) असें श्रुतिप्रमाण आहे. आणि उपमासूर्यक असें व्याससूत्रांचे प्रमाण आहे. (६)

परमात्मा एकच असून उपाधीच्या संपर्कानें भिन्न भिन्न भूताचेठायीं व्यवस्थित होऊन जलप्रतिबिंबिंत चंद्राप्रमाणें बहुविध रुपाप्रत पावला अशींही एक श्रुति आहे. (७)

ज्याप्रमाणें चंद्राचें प्रतिबिंब गढुळ पाण्यांत अस्पष्ट व निर्मलोदकांत स्पष्ट दिसतें, त्याप्रमाणें ब्रह्मही वृताचेठायीं दोन प्रकारें दिसतें. (८)

घोर व मुढ वृत्ति मलीन असल्यामुळें त्यात ब्रह्मचा आनंदांश आच्छादित असतो. व किंचित् पारदर्शकताही असल्यामुळें त्यांत चैतन्याचें मात्र प्रतिबिंब पडतें. (९)

अथवा यांस दुसरा एक दृष्टांत आहे. प्रकाश आणि उष्णता असे अग्नीचें दोन स्वभाव असून तापविलेल्या स्वच्छ पाण्यांत त्याची उष्णता मात्र उद्वुत होते. पण प्रकाशाचा प्रवेश होत नाहीं. तद्वत घोर मुढ वृत्तीचेठायीं चैतन्य मात्र प्रीतिबिंबित होतें. (१०)

परंतु लांकडामध्ये उष्णता व प्रकाश असे दोनहीं धर्म उद्गव पावतात त्याप्रमाणें शांत वृत्तीमध्यें सूख आणि चैतन्य दोनहीं ब्रह्मचें स्वभाव अनुभवास येतात. (११)

ही व्यवस्था कशी केली ह्मणाला तर पदार्थाचें स्वभाव पाहुन आह्मीं ती केले. कारण कोणताहीं नियम बांधणें झाल्यास अनुभवास अनुसरुन तो कल्पिला पाहिजे. (१२)

घोर आणि मुढ वृत्तीचेठायीं सूखानुभव होत नाही. शांतवृत्तेमध्यें देखील सूखातिशयाचा अनुभव केव्हा तरी होतो. (१३)

घरदार शेतभात इत्यादिकांविषयीं जेव्हां इच्छा होते. तेव्हा तो ती रजोगूणापासून उप्तन्न झाली असल्यामुळे ती घोर वृत्ति होय. ह्मणून तेथें सूख नाहीं. (१४)

यांचें कारण असें आहे कीं सूख मिळेल किंवा नाहीं असा संशय असल्यामुळे दुःख होतें. न मिळाले असतां तें वाढतें प्रतिबंध झाला असतां क्रोध होतो. किंवा प्रतिकुलतेनें द्वेष उप्तन्न होतो. (१५)

त्याचा परिहार करणें अशक्य झाल्यास विषाद होतो. त्याचें कारण तमोगूण होय. क्रोधादिकाचेठायीं महा दुःख असल्यामुळे सूखाची शंका देखील नाहीं ? (१६)

इच्छिल्या विषयाचा लाभ झाला आसतां हर्ष वृत्ति होते. ही शांतवृत्ति असल्यामुळें त्यांत महत्सूख आहे. भोगामध्यें महत्तर सूख आहे. लोभ होण्याचा प्रसंग दिसल्यास किंचित सूख होतें. (१७)

विरक्तीचेंठायीं इच्छेचाच अभाव असल्यानें सर्वोत मोठें सूख आहे. हें सूख विद्यानंद प्रकरणांत सागितलें आहे. याप्रमाणें क्षांतीचेठायीं क्रोधाचा व औदार्याचेठायीं लोभाचा अभाव असल्यामुळे तेथेहीं सूख आहे. (१८)

जें जें ह्मणून सूख होतें तें तें सर्व ब्रह्मचे प्रतिबिंब असल्यामुळे ब्रह्मच समजले पाहिजें हे प्रतिबिंब जेव्हा वृत्ति अंतर्मुख असते तेव्हां निर्विघ्रपणें पडतें. (१९(

सत्ता, चैतन्य आणि सूख हे तीन ब्रह्मचें स्वभाव आहेत दगड माती इत्यादि जड पदार्थात ब्रह्मचा सत्ता स्वभाव मात्र व्यक्त होतो. इतर दोन स्वभाव आच्छादित असतात. (२०)

N/A


References : N/A
Last Updated : 2010-03-19T04:47:40.6230000