विद्यानन्द - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


तैतिरीय श्रुतींत असं सांगितलें आहे कीं तरुण रुपवान विद्वान, निरोगी,दृढमनाचा, ज्याच्या पदरीं पुष्कळ सैन्य आहे व जो संपत्तीनें पुर्ण अशा पृथ्वीचे पालन करणारा सार्वभौम राजा , त्यास यासर्व मानवी भोगापासून जो आनंद मिळतो तो ब्रह्मवेत्यास प्राप्त होतो. ॥२१-२२॥

शि०- सार्वभौम राजा आणि ज्ञानी यांच्या विषयंप्राप्तीमध्यें साम्यतांमुळींच नाहीं असें असून दोघांची तृप्ति सारखी कशी ह्मणता? गू०- मनुष्यभोगाची इच्छा दोघांलाहीं राहिली नाहीं याकरितां या उभयंतानीही तृप्ति सारखीच आहे एकाला भोगानें तृप्ति आणि दुसर्‍याला विवेकानें. ॥२३॥

शि०- तो विवेक कोणचा? गू०- वेदशास्त्रांत सांगितलेले विषयभांगातील दोष ज्ञानी पाहतो, हाच आम्हीं म्हटलेला विवेक बृहद्रथ राजानेंमैत्रायणीय शाखेमध्यें या दोषाचें गाथारुपाने वर्णन केलें आहे. ॥२४॥

ते दोषे कांही देहसंबंधी व कांही चित्तसंबंधी आणि कांहीं विषयसंबंधी असे वर्णिलें आहेत. शि०- दोषदर्शनाने इच्छा कशी जाते ? गू०- कुत्रयाच्या ओकारीवर कोनाची इच्छा जाईल काय ? त्याप्रमाणें विवेक पुरुषास विषय वाटतात. ॥२५॥

शि०- दोघाचीही तृप्ति सारखी झाल्यावर राजापेक्षा ज्ञान्याची प्रतिष्ठा ती काय? गू०- उभयताची इच्छा तृप्ति जरी सारखी झाली तरी त्यामध्यें भेद आहे. राजाला साधनें मिलविण्याचें दुःख आणि भावी नाशांचे भय असतें. ॥२६॥

परंतु ज्ञान्यास ती दोन्हींही नाहींत म्हणून ज्ञान्याची योग्यता राजापेक्षा अधिक समजली पाहिजे. शिवाय राजाला सार्वभौमानंद मिळाल्यावर गंधर्वानंदाची आशा राहिलीच तो ज्ञान्यास नाहीं. ॥२७॥

गंधर्वाचे दोनप्रकार आहेत एक मर्त्यगंधर्व आणि एक देव गंधर्व या कल्पीं मनुष्य असून कोण्या एका पुण्यपाकविशेषेंकरुन गंधर्व पावला असतां त्यास मर्त्यगंधर्व असें म्हणतात. ॥२८॥

आणि पूर्व कल्पीं केलेल्या पुण्यपारिपाकेंकरुन या कल्पाच्या आरंभीच गंधर्वत्व पावला असतां त्यास देवगंधर्व असे म्हणतात. ॥२९॥

अग्निष्वात्तादिकने पितर त्यांस निरलोक पितर म्हणतात. आणि कल्पाच्या आरंभीच देवपद पावलल्यास आजार देवता असें म्हणतात. ॥३०॥

या कल्पाचेठायीं अश्वमेधादि कर्मे करुन ज्यांणी आजान देवांकडुन पुजा घेतली त्यांस कर्म देवता असें म्हणतात .॥३१॥

यम, अग्नि हें मुख्य देव आहित इंद्र बृहस्पति हे तर प्रसिद्धच आहेत विराट पुरुषासच प्रजापति ह्मणतात. आणि जो सूत्रात्मा तोच ब्रह्मदेव ॥३२॥

याप्रमाणें सार्वभौमापासून सूतात्मापर्यंत उत्तरोत्तर अधिक अधिक आनंद इच्छिणारें आहेत. या सर्वाहुन आत्मानंद श्रेष्ठ आहे कारण तो वाणीस व मनास अगोचर आहे. ॥३३॥

कोणाताही विषय पुर्णपणें प्राप्त झाला असतां मनुष्यास तो नकोसा होतो. श्रीत्रिय बर्ह्मनिष्ठास सर्वभौमादि आनंदाविषयीं अलंबुद्धि असते. त्याअर्थी ते सर्व आनंद त्यास मिळालेंच असें समजलें पाहिजे. ॥३४॥

यालाच सर्वकामाप्ति असें ह्मणतात किंवा ज्याप्रमाणें स्वदेहाचेठायीं आनंदाकार बुद्धि साक्षित्वेंकरुन ब्रह्मनिष्ठ आनंदीं असतो त्याप्रमाणें इतर देहाचेठायींही ज्या सूखाकारवृत्ति होतात त्यांचेही त्यास साक्षित्व अज्ञासल्यामुळें तो सदा आनंदीत ह्मटला पाहिजे. ॥३५॥

शु०- मग असें साक्षित्व अज्ञान्यास देखील असते. म्हणून सर्वानंद प्राप्ति त्याला झाली असें ह्मणतां येईल कीं काय? गू०- मी सर्वबुद्धीचा साक्षी आहे असे ज्ञान त्यास नसल्यामुळेम त्यास ती प्राप्ति नाहीं यो वेद सोऽश्रुते ( जो जाणेल त्याला मिळेल ) असें श्रुतिप्रमाण आहे. ॥३६॥

अथवा आणखी एका प्रकारें सामवेदांनी सर्वकामाप्ति गायिली आहे ती अशी "अहमन्न तथान्नादः " ( अन्नही मीच व अन्न खाणाराही मीच ) असें सार्वात्म्य वर्णिलें आहे. ॥३७॥

याप्रमाणें दुःखाभाव आणि सर्वकामाप्ति या दोन्हींचें निरुपण केलें. आतां कृतकृत्यत्व आणि प्राप्तप्राप्यत्व यांचा विचार करावयाचा. ॥३८॥

या दोहींचा विचार आह्मं पुर्वी तृप्तिदीपांत विस्तारेंकरुन केला आहे. तेच श्लोक वाचकांनीं वाचून पहावे ह्मणजे समजेल. ॥३९॥

ज्ञात्याला तत्त्वज्ञान होण्यापुर्वी ऐहिक म्हणजे या लोकीं सूखप्राप्ति आणि दुःखनिवृत्तिकरितां कृषी वाणिज्य इत्यादिक व आमुषिक म्हणजे स्वर्गलोकप्राप्तेकरितां यज्ञ व उपासनादिक, व मोक्षसाधन जें ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिकः या प्रकारेंकरुन बहुप्रकाराचें कर्म कर्तव्य होतें आणि आतां तर त्यांस संसारसूखाची इच्छा नाहीं म्हनुन व ब्रह्मनंद साक्षात्काराची सिद्धि झाली आहे, म्हनुन तें सर्व इच्छा नाहें म्हनुन व ब्रह्मनंद साक्षात्काराची सिद्धि झाली आहे म्हनुन ते सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे आतां त्याला कांही कर्तव्य उरलें नाहीं. ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP