जसजशीं नामरुपाची अवज्ञा होईल तसतसं अद्वैतदर्शन अधिक अधिक होत जातें आणि जसजसं अद्वैतदर्शन अधिक अधिक स्पष्ट होत जाते. तसतशी नामरुपें भासेनातशीं होतात ॥८१॥
या आभ्यासाच्या योगानें ज्ञान दृढ झालें असतां मनूष्य जीवंत असतांच मुक्त होतो. मग त्याचा देह असला तरी चिंता नाहीं ॥८२॥
शि०- ब्रह्मभ्यास ह्मणजे काय ? गू०- सदासर्वदां ब्रह्मतत्त्वाचेंच चिंतनः त्याचेंच कथन; परस्पर त्याचाच बोध; असं जें एकषरत्व त्यास पंडित ब्रह्मभ्यास असें म्हणतात ॥८३॥
हा द्वैतसंस्कार फार दिवसांपासून चालत असल्यामुळें आस्थेनें फार दिवस अभ्यास केला तरच त्याची अगदीं निवृत्ति होतें. ॥८४॥
शि०- एका ब्रह्मपासून हे अनेक आकार कसे उप्तन्न झालें ? गू०- एका ब्रह्मपासून जगदुप्तत्ति होणें जरी युक्तीस विरुद्ध आहे तरी मायेसहित ब्रह्मपासून ती होते असं म्हणण्यास कोणाची नड आहे. मातीच्या शक्तीनें जसे अनेक खोटें पदार्थ उप्तन्न होतात तसे ब्रह्मशक्तीपासून हे अनेक आकार उप्तन्न झाले किंवा यापेक्षांहीं चांगला दृष्टांत निद्रेचा आहे. ॥८५॥
जीवाचेठायीं असणारीं निद्रा जशी अघटित स्वप्नास उप्तन्न करितें त्याप्रमाणें ही जगदुप्तत्ति ब्रह्मचेठायीं सृष्टिस्थितिलयरुपानें होते ॥८६॥
स्वप्नामध्यें मनूष्यास काय काय दिसतें आणि काय काय नाहीं याचा कांही नेम आहे काय ? मी आकाशांत उडत आहे. माझा शिरच्छेद केला असें भलतेंच दिसतें व एका क्षणांत एक वर्ष गेल्यासारखें वाटतें पुत्रामित्राचा वियोग होतो पाहिजे तें दिसतें ॥८७॥
यांत युक्तायुक्त विचार ह्मणून मुळींच नाहीं. अमुक गोष्ट योग्य ह्मणतां येत नाहीं व अमुक अयोग्यही म्हणतां येत नाही जें जें जसें जसें असतें तें तें योग्यच म्हटलें पाहिजे ॥८८॥
जर एवढ्याशा या निद्राशक्तीचा एवढा मोठा महिमा आहे. तर मायाशक्तीचा महिमा किती अचिंत्य असावा बरें ! ॥८९॥
पुरुष स्वस्थ निजला असता निद्रशक्ति नाना प्रकारचें स्वप्न उप्तन्न करिते. त्याप्रमाणें निर्विकार ब्रह्मचेठायीं ही माया विकाराची कल्पना करिते. ॥९०॥
शि०- ते विकार कोणते ? गू०- आकाश वायु अग्नि, जल , पृथ्वी, ब्रह्मंड, लोक, प्राण शिला, इत्यादी सृष्टी शि०- माया ही जड असून तिजपासून सचेतच प्राणी कसे उप्तन्न झाले ? गू०- प्राण्याचें शरीराचेठायीं असणारें अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे त्यामध्यें मुळ चैतन्याचें प्रतिबिंब पडलें आहे म्हणूण तेंचैतन्यासारखें दिसतें परंतु तें वस्तुतः जडच आहे. ॥९१॥
शि०- तर मग हा जड चेतन विभाग ब्रह्मंचा नव्हे म्हणा, गू०- तो ब्रह्मचा कसा होईल ? सच्चिदानंद लक्षण ब्रह्म हें स्थावरजंगमीं सर्वत्र समान आहे. भेद काय तो नामरुपाचा ॥९२॥
ज्याप्रमाणें पटावर चित्र असतें त्याप्रमाणें ब्रह्मचेठायीं ही नामरुपें आहेत. त्यांची उपेक्षा केली असतां तुझी बुद्धि सच्चिदानंदमय होईल ॥९३॥
ज्याप्रमाणें पाण्यांत प्रतिबिंबित आपला देह दिसत असूनही त्याची उपेक्षा करुन तीरावर असणारा जो खरा आपला देह त्याविषयीं मात्र सत्यबुद्धि असते ॥९४॥
किंवा नाना प्रकारचे मनोराज्य होत असून त्यांची जशी मनुष्य उपेक्षा करितो, त्याप्रमाणें नामरुपाची उपेक्षा करावी. ॥९५॥
हा व्यवहार असा आहे की आतां जें दृष्टीस पडतें तें क्षणांत नाहींसे होतें आमचें मनोराज्य एका क्षणीं जसे असतें तसें दुसर्या क्षणी नाहीं. जी कल्पना एकदां झाली ती होऊनच गेले पुनः तो व्ह्यावयाची नाहीं. हा जसा मनांतील व्यवहार तसाच ब्रह्म जगांतलाही समजावा ॥९६॥
तरुणपणी बाळपण नाहीं. म्हातारणीं तरुणपण नाहीं. गेलेला बाप पुनः येत नाही आणि गेलेला दिवस गेलाच. ॥९७॥
ह्म क्षणाभंगूर व्यवहारांत व मनोराज्यातं भेद मुळींच नाहीं याकरितां तो जरी भासला तरी त्या विषयींची सत्य दृष्टी सोडुन द्यावी ॥९८॥
या वय्वहाराची उपेक्षा केली असतां बुद्धीला निर्विघ्नपणें ब्रह्मचितंन करितां येतें शि०- मग ज्ञान्यांचा व्यवहार कसा व्हावा ? गू०-सोंगाड्या जशी वेषाप्रमाणें बतावणी करितो तसा ज्ञानी निर्वाहापुरता कसा तरी व्यवहार करुं सकतो ॥९९॥
ज्याप्रमाणें पाण्याचा प्रवाह चालला असतांही त्यांतील मोठी शिला स्थिर राहते त्याप्रमाणें नामरुपांत कीतीही भेद झाला तरी कुटस्थ ब्रह्म आहे. तसंच असतें ॥१००॥
शि०- अखंड ब्रह्मचेठायीं आगदीं निराळ्या प्रकारचें जग कसें दिसतें ? गू ०- छिद्ररहित आरशामध्यें सर्व वस्तुंस मावुन घेणारें आकाश जसें दिसतें तसें छिद्ररहित अखंड ब्रह्ममध्यें नाना प्रकारचें जगांस मावुन घेणारें आकाश दिसतें ॥१०१॥
शि०- तर मग ब्रह्म मुळींच दिसत नसून केवळ जग मात्र कसें भासतें ? गू०-दर्पणाचा पृष्ठ भाग जसा नजरेंतुन चूकुन त्यांतील पदार्थ मात्र भासतात त्याप्रमाणें सच्चिदानंद ब्रह्म भासत असूनही तें अदृश्य होऊन नामरुपाकडेच चित्त जातें; परंतु वास्तविक पाहतां ब्रह्म आधीं भासल्यावाचून नामरुपें भासणारच नाहींत असा नियम आहे ॥१०२॥
शि०- तीं नाम रुपें डोळ्यापुढें असून ब्रह्म कसें पहावें ? गू०- कोणाचाही पदार्थ पाहतांना आदि सच्चिदानंदाचा भास होऊन नंतर तो पदार्थ दृष्टीस पडतो. याकरितां जेव्हा जेव्हा तुझी जगाकडे दृष्टी जाते तेव्ह तेव्हा तो भास होतो न होतो इत्यक्यांतच बुद्धिस ओढुन धरुन तिल अनामरुपाकडे जाऊ देऊं नये. ॥१०३॥
या प्रकारचें हें सच्चिदानंदरुप जगद्गहित एकच ब्रह्म आहे असें सिद्ध झालें. यासच अद्वैतानंद म्हणतात यामध्यें सर्व लोक सर्वदा रममाण होवोत ॥१०४॥
ब्रह्मनंद प्रकरणाच्या या तिसर्या अध्यायांत अद्वैतानंद आह्मी सांगितला तो जगन्मिथ्यात्व चिंतनानें प्राप्त होतो. ॥१०५॥
इति अद्वैतानंद समाप्त ॥