ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


शि०- मग एकुण घट खोटाच तर ? गू०- यांत संशय काय ? जो पदार्थ स्वतः निस्तत्व असून व्यक्त झाल्यावर मात्र भासणारा, ज्याला उप्तात्ति व नाश आहेत व ज्याला कांहीं एका नांवानें ओळखावयाचा, असा जो घट त्याला सत्य कोण ह्मणेल ? ॥४१॥

घट शब्दानें घटाचा व्यवहार असल्यामुळें घटाचें स्वरुप शब्दात्मकच आहे. कारण व्यक्त कार्य नष्ट झाल्यावरही घटे हें नांव मनुष्यांचे तोंडांत तसेंच असतें ॥४२॥

घटरुप कार्य निस्तत्व आहे, नाशवंत आहे आणि केवळ शब्दात्मक आहे. ह्मणून हें घटाचें स्वरुप मृत्तिकेप्रमाणें सत्य ह्मणतां येत नाहीं ॥४३॥

शि०- मग मृत्तिकें मध्यें तरी सत्यत्वाची गूण कुठे आहेत ? गू०- खर्‍याचें लक्षण ह्मणजे हेंच कीं त्यांत कां हीं तत्त्व असून कालत्रयींही त्याचा नाश होऊं नये. माती तशीच आहे. घट व्यक्त असतांनाही तीच आहे. घटापुर्वीही तीच आहे आणि घट फुटल्यानंतरहीं तीच आहे. ह्मणून ती येथें सत्यच म्हटली पाहिजे ॥४४॥

शि०-व्यक्त, घट आणि विकार या तीन शब्दांनी दर्शविलेला तो घटपदार्थ तो जर खोटातुम्हीं म्हणतां तर शुक्तिकाज्ञानानें असं रजत नाहींसे होतें, तसा मृत्तिकेच्या ज्ञानानें तोहीं का नष्ट होते नाहीं ? गू०- अरे ज्या अर्थी घटाविषयींची सत्यत्वबुद्धि नष्ट झाली त्या अर्थी तो घट नष्ट झाला असेंच समजलें पाहिजें ॥४५॥

शि०- पण शुक्तिज्ञानानें रजत अगदींच नाहींसे होतें गू०- त्यांचे कारण हेंच कीं तो रजतभ्रम निरुपाधिक आहे परंतु येथें तसें नाहीं येथील भ्रम सोआधिक आहे. ह्मणून अधिष्ठानज्ञानापसून होणारी जी निवृत्ति तिचा अर्थ त्या वस्तुचें आभान असें समजू नये. ती खोटी आहे. असें समजलें म्हणजे झालें ॥४६॥

शि०- हें मला तुमचें म्हणणें नीट समजलें नाहीं. गू०- याविषयीं तुला एक दृष्टांत देतों म्हणजे समजेल कल्पना कर कीं, नदीतीरीं एक मनुष्य उभा असून त्याचें अघोमुख प्रीतिबिंब आंत पडले आहे. तें जरी डोळ्याला दिसलें तई त्या उभ्या असलेल्या मनुष्याप्रमाणें पाण्यांत दिसलेल्या मनुष्याविषयीं कोणाला कधीं तरी खरेपणा वाटेल काय ? ॥४७॥

शि०- होय मग एवढ्या ज्ञानानें पुरुशार्थासिद्धि झालीं काय ? गूरु०- आमच्या अद्वैतवाद्यांचें मत असेंच आहे. अशा प्रकारच्या ज्ञानानेंच मोक्षप्राप्ति होते. शिष्य०- पण मृत्तिकेवर घट हा केवळ भासमात्र आहे असें जर मानलें तर तिच्या ज्ञानानें घटाविषयींची सत्यत्वबुद्धि नाहींशी व्हावी ती कोठें होते ? गू०- घटांतील माती वजा केली असतां घटाचें स्वरुप काय राहिलें सांग अशा विचारांने तो खोटा ठरतो ॥४८॥

शिष्य पण घट हा विवर्ताचे उदारहण नाहीं. तें परिणामाचें आहे. गू०- परिणामाचें नव्हे. कारण परिणामांत पुर्वपुरुप जाऊन दुसरें रुप येतें जसं दुधाचें; दहीं, परंतु कुंडलाची व सूवर्णाची गोष्ट तशी नाही. कुंडलातील सूवर्ण व घटातील माती यांचें रुपांतच होत नाही ॥४९॥

शि०- पण घत फुटला असतां माती कोठें दिसते ? केवळ खापर्‍या मात्र दिसतात गूरु नृत्या फॊडण्यानें जरी माती दुसली नाहीं तरी पुड केली असतां ती दिसते. कुंडलाविषयीं तर सांगायास नको, सूवर्ण त्यांत स्पष्ट आहेत ॥५०॥

शि०- तुम्हीं परिणामाविषयीं दुध, दहीं , मृत्तिका, घट आणि सूवर्नकुंडलें असं तीन दृष्टांत दिलेत त्यापैकीं घट आणि कुंडलें यांस जर विवर्तवाद लागू होतो, तर तो दुध दह्मसही कां लागूं पडुं नये ? गू०- दह्मस पुनः दुधाचें स्वरुप येत नाही. तशी घट कुंडलाची गोष्ट नाहीं. कारण त्यांना पुनः पुर्वरुप येतें. यावरुन आह्मीं जे दृष्टांत दिले ते बरोबर आहेत. ॥५१॥

शि०- मृत्तिका आणिसूवर्ण यांस जसे परिणाम आणि विवर्त लागू पडतात तसा आरंभवादहीं कां न लागू पडावा ? गू०- आरंभवाद्यांचें मत असं आहे कीं कार्याचें आणिकारणाचे स्पर्शादि गूण अगदी पृथक असतात; पण तसें द्वैगूण्य मृत्तिकेचे ठायीं दिसत नाहीं ॥५२॥

वेदामध्यें उद्दालकऋषींनी विवर्ताविषयीं मृत्तिका, सूवर्ण आणि लोखंड, असे तीन दृष्टांत दिले आहेत. त्यावरुन कार्य खोटें आहे असा सिद्धांत होतो. तोच सर्व चराचर वस्तुंचे ठायीं लावुन चांगला ठसवाव ॥५३॥

शि०- कार्याचा खोटेपणा ठसवावा असें तरी कां सांगितलें ? गू०- कारणाचें ज्ञान झालें म्हणजे कार्याचेंही ज्ञान होतें. शि०- कारण हें सत्य आहे आणि कार्य हें मिथ्या असं असून सत्याच्या ज्ञानानें मिथ्या ज्ञान होतें असें ह्मणण्यात विरोध नाहीं काय ? ॥५४॥

गू०- विचार दृष्टीनें पाहशील तर विरोध मुळींच नाही. मृत्तिकेसहित जो घटरुप विकार त्याला काय असें लोक म्हणतात या कार्यांत एक सत्यांश आहे आणि एक असत्यांश आहे. येथें मृत्तिकासत्यांश आहे त्या अंशाचें ज्ञानकारण ज्ञानानें होतें मग विरोध कसचा ? ॥५५॥

शि०- सत्यांश जसा समजतो तसा मिथ्यांशही समजेल गू०- मिथ्याशांचा मुळींच उपयोग नसल्यामुळे तो समजण्यास योग्य नाही. खर्‍या तत्वाचें जें ज्ञान तोच पुरुषार्थ असत्यांश जाणून फळ काय ? ॥५६॥

शि०- तर कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें असं ह्मनणे म्हणजे मृत्तिकाज्ञानापासून मृत्तिकाज्ञान होतें असं म्हटल्याप्रमाणें आहे. यांत अधिक काय सांगितल्यासारखें झालें ? ॥५७॥

गू०- खरें नवल नाहींच: पण तें कोनाला नाहीं? कार्याचे ठायीं जो सत्यांश आहे, तो कारणस्वरुपीच आहे असं ज्यांना समजलें त्यांना कांहीं नवल नाही; पण अज्ञान्याचें नवल कोठें जाईल ? ॥५८॥

कारणापासून कार्य भिन्न मानणारे जे आरंभवादी, पुर्वरुपाचा त्याग होऊन रुपांतर होतें असं मानणारे जे परिणामवादी आणि शास्त्र न जाणणारे सर्व लोक यांना कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें असं ऐकुन विस्मय झालाच पाहिजे ॥५९॥

शि०- एका कारणाच्या ज्ञानानें अनेक कार्यांचें ज्ञान होतें असा श्रुतींनें सांगितलेला अर्थ एकीकडे ठेवुन एकढ्या लांबलचक व्याख्यानाचें कारण काय ? गू०- श्रुतीनें अद्वैतपर ताप्तर्य लोकांस समजत नाही. ह्मणून व्याख्यान केलें पाहिजे. अद्वैतामताचें ज्ञान शिष्यास व्हावें ह्मणून छांदेग्य श्रृतींत कारणाच्या ज्ञानानें कार्याचें ज्ञान होतें असें सांगितलें अनेक कार्यांचें ज्ञान व्हावें हा कांहीं तिचा हेतु नाही. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP