शिष्य- आत्म्याविषयीं अनिमित्त प्रीति जो आपण सांगितली. तो कोणची म्हनुन समजावी ? जगामध्ये प्रीतीची चार स्वरुपं राग श्रद्धा भक्ति आणि इच्छा ( आवड ) आतां दृष्टीस पडतात. राग हीच आपण सांगितलेली प्रीति म्हणावी तर ती केवळ स्त्री पुत्र धन इत्यादिकांच्याठायीं श्रद्धा यज्ञयागादि कर्माविषयींच आहे. ॥२१॥
भक्ति म्हणावी तर ती केवळ गूरुदेवतेविषयीच आणि इच्छा म्हणजे आवड म्हणावी तर ती केवळ अप्राप्य वस्तुविषयीच तर तुम्ह्मीं सागितलेली जो एक सारखी असणारी प्रीती ती यापैकीं कोणती ? गू०- तूं ज्या तुम्हीं सांगितलेली जी एक सारखा असणारी प्रीति ती यापैकीं कोणती ? गू०-तुं ज्या चार प्रकारणच्या प्रीति सांगितल्यास त्यांना व्यभिचार घडतो तसा आमच्या आत्माप्रीतीस व्यभिचार मुळींच नाहीं तर त्या प्रीतींचे स्वरुप तुला आतां सांगतों सर्वदा सूखावरच जडलेली अशी अन्तः करणाची सात्विकवृत्ति तीच आमची आत्मप्रीति. ॥२२॥
शि०- मग ती इच्छा म्हणावी आत्मप्रीति कसची ? गू०- ती इच्छा होऊं शकत नाहीं. कारण इच्छा ही वस्तु प्राप्त होण्यापुर्वी मात्र असते. परंतु या प्रीतीची गोष्ट तशी नाहीं वस्तु प्राप्त होवो किंवा नष्ट होवों ती जशाची तशीं असते. म्हणून हो आत्मप्रातीच आहे. इच्छा नव्हे. ॥२३॥
शि०- अन्नपानादि पदार्थ सूखास साधनीभूत आहेत म्हनुन ते प्रीय झालेले आहेत. यावरुन असें अनुमान होतें कीं ज्या ज्या ह्मणून प्रीय वस्तु त्या त्या सूखाची साधनें आहेत. आतां आपण म्हणतां कीं आत्मा प्रीय आहे. त्यावरुन त्यालाही सूख साधनत्व आलें मग बाकीच्या अन्नपानदिकांत आत्म्यांत भेद तो काय ? गू०- आत्मा हा अन्नपानादिकाप्रमणें सूखसाधन ह्मणतां येत नाहीं. कारण अन्नपानादिकांपासूनजसे निराळें एक सूख प्राप्त आत्म्यानेंच घ्यावें . गू० तसें मानल्यास एकालाच कर्मता आणि कर्तृता येऊन विरोध येईल. ॥२४॥
`शि०- वैषायिक सूखावरही तशीच प्रीति असते. तेव्हा तुमचा आत्मा आणि विषयसूख यांत भेद काय ? गू०- भेद आहे नाही कसा ! विषयसूखावर प्रीती जरी असली तरी ती केवळ प्रीति होय. तो निरतिशय नव्हे ह्मणजे एकसारखी नसते. ती एका विषयसूखास सोडुन दुसर्यावर जाते. ह्मणून ती व्याभिचारिणी होय तशी आत्मप्रीति नव्हें. या प्रीतीस कधी व्याभिचाराच नाहीं ह्मणून आत्मा अतिप्रिय आहे. ॥२५॥
ती जशी एका विषयासूखास सोडुन दुसर्यावर जाते तशी ही आत्मप्रीती नव्हे. कारण अत्म्याचा त्यागही घडत नाही आणि ग्रहणही घडत नाही तेव्हा त्या प्रीतीस व्याभिचार कसा येईल ? ॥२६॥
शि०- ज्या वस्तुस त्याग आणि ग्रहण नाहीं ती तृणासारखी उपेक्षस पात्र आहे. ह्मणून तुमचा आत्माही तस उपेक्षा ह्मणजे तुच्छ झाला कीं ? गू०- तुच्छ कसाहोईल अरे जो त्यागग्रहणास विषय नाहीं. तो उपेक्षेस तरी कसा विषय होईल उपेक्षा करणारा आणि आत्मा यामध्यें मुळींच भेदच नाहीं. तेव्हा त्यांची उपेक्षा कोण करणार ? ॥२७॥
शि०- मनुष्याला रोगानें फार ग्रासलें असतां किंवा अतिसंताप आला असतां त्यास मरणाची इच्छा झालेली जगांत दृष्टीस पडते, यावरुन आत्मा द्वेषामुळे त्याज्य आहे असें होतें. ॥२८॥
गू०- होय मरणाची इच्छा मनुष्यास होते. पण तो देहत्यागाची इच्छा देह कांहीं आत्मा नव्हे. देहाचा त्याग करणारा जो कोणी निराळा आहे, तो आत्मा आणि त्याविषयीं कांहीं त्याचा द्वेष नसतो. शि०- देहाविषयीं तरी असतो ना ? गू०- देहाविषयीं असेना बापडा तेणेंकरुन आमचे सिद्धांतास काय हानी. ॥२९॥
याकरिता सर्व पदार्थावरील प्रीति आत्मार्थच असल्यामुळें तो ज्याप्रमाणें पुत्रास्तवा पुत्राच मित्र झाल्यामुळे पुत्रच मित्रापेक्षा अधिक प्रिय असला पाहिजे. त्याप्रमाणें आत्माही सर्वामध्यें प्रिय आहे हें सिद्ध झालें. ॥३०॥
शि०- युक्तीने तसें सिद्ध पण अनुभव फूठें तसा आहे. गू०- अनुभही तसाच आहे मी सदां सर्वदां असावें कधीच नष्ट होऊ नये. अशी आत्मप्रीतिदर्शक इच्छा कोणास बरें नाहीं ? तस्मात अनुभाअवरुनही सिद्ध झालें. ॥३१॥
शि०- याप्रमाणें अनुभव युक्ति आणि श्रुति या तीन प्रमाणांनी आत्म्यावरील अति प्रीति सिद्ध केली पण कित्येकांचे मत असें आहे की, पुत्रामायीदिकांकरितांच आपण आहों. ॥३२॥
तीं कांहीं आपणाकरितां नव्हेत. म्हणूनच तींच अतिप्रतीम पात्र आहेत व याविषयीं श्रुतीमध्यें प्रमाणहीं आढळते " आत्मावैपुत्रनामासि " असें उपनिषदामध्येंक पुत्राला मुख्यत्व दिलें आहे. ॥३३॥
श्रुतीत असें म्हटलें कीं, " बाप आपल्या पुत्राला पुण्यकर्मानुष्ठानाकरितां आपल्या जागीं प्रतिनिधी नेमुन आपण जराग्रस्त होऊन कृतकृत्य बुद्धिनें देह ठेवितो." ॥३४॥
याप्रमाणें पुत्राला मुख्यात्मत्व सिद्ध होते म्हणून पित्याचा आत्मा जरी असला तरी " अपुत्राला लोक नाहीं" असें पुराणांतच सांगितलें आहे. याकरिताच पित्यानें ज्यास पुढील मंत्राचा उपदेश केला असा पुत्रच परलोकास साधन आहे असें पैडित म्हणतात. ॥३५॥
इतकेंच नव्हें तर ऐहिक सूखास देखील पुत्राचीच गरज आहे. याविषयीं श्रुतिप्रमाण असं आहे कीं हा मनुष्यालोक पुत्रानेंच जिंकण्यास योग्य आहे. इतर कोणच्याही कर्मानें तो जिंकतों येतनाही. कारण निपुत्रिकांस कितीही संपत्ति असली तरी तिजपासून त्यास सूख होत नाही. वर जो उपदेश म्हनुन सांगितला तो मरणाच्या वेळीं बाप मुलांस करितो तो असा " तुच ब्रह्म तुंच लोक आणि तुंच यज्ञ." ॥३६॥
या सर्व श्रुतीमध्यें आत्म्यापेक्षां पुत्रभायीदिकांनाच महत्व दिलें आहे इतकेंच नव्हे तर पुत्राला या रीतीनें प्राधन्य जगांत सर्व लोक देतात. ॥३७॥
आपणा मेलों तरी बायकामुलांनी सूखानें रहावें म्हणून मनुष्य पैसा जमीन इत्यादिकांची तजवीज होईल तितकी आपण स्वतः दुःख भोगूनही करितो. याकरितां पुत्रादिकच मुख्य आहेत असें ठरतें. ॥३८॥
गू०- तु म्हणतोस तें खरें आहे परंतु एवढ्यावरुनच पुत्रदारापेक्षां आत्मा कमी प्रिय ठरती असें समजूं नको. कारण आत्म्याचें प्रकार तीन आहेत एक गौनात्मा दुसरा मिथ्यात्मा आणि तिसरा मुख्यात्मा. ॥३९॥
हा देवदत्त सिंह आहि " असें म्हणून आह्मी जेव्हा दोघांचे ऐक्य करितों तेव्हा उभयतांमध्यें भेद असल्यामुळें ते ऐक्य खरें नव्हें केवळ औपचारिक आहे तसाच पुत्रात्माही गौणच समजला पाहिजे. ॥४०॥