ब्रह्मानन्दे आत्मानन्द - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


शि०- ह्म प्रकरणाच्या प्रथमाध्यायीं तृष्णीं स्थितीतील वासनानंद आणि सूषुप्तांतील ब्रह्मनंद याखेरीज समाधीतील निजानंद जो सांगितला तो जाणण्यास केवळ योगी मात्र समर्थ आहेत पण मुढास तो समजणें कठिण असल्यामुळे त्यांणी काय करावें ? ॥१॥

गू०- जे केवळ अज्ञानी आहेत त्यांचे होईल तसे होवों. पुर्वजन्मीं केलेल्या पुण्यपुरुप कर्मवंशांत ते जन्ममरणाच्या फेर्‍यात पडेनात बापडे. त्यांजवर दया करुन उपयोग काय ? ॥२॥

शि०- सर्वावर अनुग्रह करण्याचें काम ज्या अर्थी आपण पतकरलें आहे त्य आर्थी असं ह्मणून कसें चालेल ? त्याच्याहीं उद्धारस कोणचा तरी मार्ग सांगितलाच पाहिजे. गू०- अरे मुढ दोन प्रकारचें आहेत. एक जिज्ञासू म्हणजे ज्यास तत्त्वज्ञनाचे इच्छा आहे तो आणि दुसरा पराडमुख ह्मणजे ज्यास ती इच्छा नसून केवळ परलोकाची मात इच्छा आहे तो. यापैकीं तं कोणचा घेतोस ? ॥३॥

पराड्मुख जर ह्मणशील तर त्याला आह्मी उपासना किंवा कर्म सांगून वाटेस लावितों. आणि जिज्ञासू असून जड बुद्धिचा असेल तर त्याला आत्मानंदाचें विवेचन करुन मार्गास लाविलें पाहिजे. ॥४॥

शि०- ह्म आत्मानंदाचें विवेचन पुर्वी कोणी कोणाला केलें आहे काय ? गू०- होय तर याज्ञवल्क्यऋषीनें आपल्या मैत्री नामक पत्नीला असा बोध केला आहे कीं, हे प्रिये स्त्रीला पति जो आवडतो तो पतीच्या सूखाकरितां नव्हें, तर तिच्या स्त्री भाया सूखाकरितां याचप्रमाणें पति जाया, पुत्र द्रव्य पशु ब्राह्मण क्षत्रिय लोक , देव वेद आणि सृष्टींतील इतर सर्व पदार्थ मनूष्यास आपल्याकरितां प्रिय झाले आहेत. ॥६॥

जेव्हा पतिविषयीं स्त्रीला काम उप्तन्न होतो तेव्हा तिला तो अतिप्रिय होतो. आणि जेव्हा क्षुधा अनूष्ठान आणि रोगादिइहीकरुन तो युक्त असतो तेव्हा तो त्याला आवडत नाहीं. ॥७॥

यावरुन तिची प्रीती स्वार्थाकरितां आहे, ती कांही पतीकरितां नव्हे तसेंच उलट पक्षी पाहतां पतीची स्त्रीयेवरील प्रीती ही स्त्रियेकरितां नसून केवळ स्वतः करितांच आहे. ॥८॥

याप्रमाणेंच परस्पर प्रीत करण्याची प्रेरणा स्वेच्छनेंच उप्तन्न होते, ॥९॥

बाप मुलाचे इतकें मुके घेतो ते कांहीं मुलाकरितां नव्हत तर केवळ आपल्याकरितांच आहेत. कारण मुलाकरितां जर ह्मणावें तर दाढीच केंस त्याच्या कोमल आंगास टोचल्याने तें मुल रडत असतांही हा धुम मुके घेतच असतो. तेव्हा अर्थातच मुलाकरितां नव्हत हें उघड आहे. ॥१०॥

ही मनूष्यांची गोष्ट झाली आतां द्रव्याविषयीं तर बोलाययाच नको कारण सोनें रुपें बोजून चालुन जड असल्यामुळे त्यांत इच्छेचा संभवच नाहीं ह्मणोन त्याजीवशयींची मनूष्यांची प्रीति केवळ स्वार्थीकरितांच आहे हें उघड आहे. ॥११॥

तशीच जनावरांची गोष्ट वाण्याची बैलावरील प्रीति जर बैलाकरितां म्हणावी तर त्याजवर बाळजोरीनें तो ओझें कसें लादील. याजकरितां तीहि प्रीति स्वतःच करितां. ॥१२॥

जातीवर जी आमची प्रीति आहे तीहीं स्वार्थपरच मी ब्राह्मण आहें ह्मणून मी पुज्य आहें, असा जो जाति विषयींचा संतोष्फ़ तो मनुष्यांसच होतो; तो जातीस होत नाहीं. ॥१३॥

तसंच मी क्षत्रिय आहे, मी राज्य करितों असा राजाभिमानही मनुष्यालाच होतो. क्षत्रिय जातीला मुळींच नाहीं हा नियम बाकीचे वैश्यादिक जाती लागू आहे. ॥१४॥

हा सिद्धांत इतका खरा आहे का तो केवळ प्रपंचालाच लागतो. असं नाही परमार्थातही याणें आपला अंमल तितकाच बसविला आहे. स्वर्गलोक ब्रह्मलोक इत्यादि मला मिलावे अशी जी मनूष्याला इच्छा होते तीही केवळ स्वतःकरितांच आहे त्या लोककरितां नाहीं. ॥१५॥

आपलें पाप नष्ट व्हावें म्हणून ईश विष्णू इत्यादि देवतांची लोक जी उपासना करितात ती आपलें पाप जावें म्हणून निष्पापी जें देव त्यांना काय त्यांची जरुर आहे. ॥१६॥

तशीच वेदाध्यायनाची गोष्ट ऋगवेदादि चार वेदांचे अध्ययन जे करितात. तें आपलें व्रत्यत्व जाऊन ब्राह्मण्य़ यावें म्हणून वेदाला कांहीं त्यांची जरुरी नाहीं मनुष्यांनाच आहे. ॥१७॥

तशीच पृथ्वीदिपंचभूतें यांवर जी मनूष्यांची प्रीती आहे तीही आपल्याकरितांच आपल्याला राहण्यास जागा पाहिजे ह्मणून पृथ्वी प्रिय तृषेकरितां पाणी स्वयपाकाकरितां अग्नि शोषणा करितां वायु आणि अवकाश मिळावा म्हणून आकाश. ॥१८॥

याचप्रमाणें धनी आणि चकार राजा आणि प्रजा यांचाही संबंध तसाच आहे. त्यंची परस्पराविषयींची हिताचिता केवळ आपल्याकरितांच आहे. कोणाचा कोणांवर उपकार नाहीं. ॥१९॥

अशीं उदाहरणें व्यवहारांत पुष्कळ आहेत यावरुन मनूष्यानें आत्मावरील जो स्वाभाविक प्रीति ती ओळखुन दृढ करावी. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP