आतां याजवर कोनी अशी शंका घेईल कीं जेथें देश मुळीच नाहीं तेथें "आहे तेथेंच आहे" असें तरी साक्षीस म्हणणें कसें संभवलें ? तर आमचें तरी म्हणणें असें कुठें आहे ! त्याला देश परिच्छेद मुळींच नाहीं आतां श्रुतीमध्यें सर्वगतत्व जें त्याला लाविलें तें केवळ सर्व देशाची कल्पना मनांत आणुन लाविलें स्वतः त्याला कोनचेंच विशेषण लागत नाहीं ॥२१॥
साक्षित्व सुद्धा जें आहे तें बुद्धिच्याच संबंधानें आहे ह्मणुन आंत बाहेर किंवा सव देश यांची बुद्धि जशी जशी कल्पना करील त्या त्या देशांत तो साक्षी व्यापक आहे असें समजावें ॥२२॥
देशाप्रमाणें वस्तुंच्याठायीं ही योजना करावी ती अशी कीं ज्या ज्या रुपाची कल्पना बुद्धि करील त्या त्या रुपास प्रकाशविणारा हा साक्शी आहे पण स्वतः तो जर म्हणाल तर वाणी आणि बुद्धि यांस अगोचर आहे ॥२३॥
तर असा जो वाणी आणि बुद्धि यांस अगोचर साक्षी तो मुमुक्षुप्त प्राप्त कसा व्हावा असें जर कोणी म्हणेल तर त्याजवर हें उत्तर कीं त्यांचे अग्राह्मत्व आह्मांस इष्टच आहे सर्व पदार्थांच्या ग्रहणाची शांति झाली ह्मणजे अर्थातच तो उर्वरीत राहतो ॥२४॥
तुह्मीं सांगितल्या युक्तीने आत्मा उर्वरीत राहतो असें जरी झालें तरी त्यांस कांहीं तरी प्रमाण पाहिजे असें कोनी म्हणेल तर येथें प्रमाणाची अपेक्षा नाही; कारण तो स्वप्रकाशक आहे. तथापि तसें प्रमाणाच पाहिजे असेल तर गुरुजवळ जाऊन श्रुतींचें अध्यन कर. ॥२५॥
सर्वग्रहांचा त्याग करणें जर कठीण वाटेल तर बुद्धिलाच शरण गेलें म्हणजे जालें बुद्धिस शरण जाणें म्हणजे तिचा निरोध न करितां बाई तूं का करशील तें कर असें म्हणुन मोकळी सोडुन दे म्हणजे झालें. मग आंत बाहेर साक्षीचाच अनुभव येईल ॥२६॥