नाटकदीप - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


मागील प्रकारणांत उपासना ह्मणजे काय व चिता मुक्तीस किती उपयोग आहे हें सागितले आतां या प्रकराणीं साक्षीचें स्वरुप नाटकाच्या रुपानें तुम्हांस सांगतो.

सृष्टींच्या पुर्वी आद्वयानंतर परिपुर्ण जो आत्मा, होतो तोच आपल्या मायेच्या योगानें आपणच जग होऊन त्यातेंच जीव रुपांनें प्रवेश करितां झाला ॥१॥

तोच परमात्मा विष्णु आदिकरुन उत्तम देहोचेठायीं प्रवेश करुन देवतारुप बनला आणि मनुष्यादिक देहाचेठायीं प्रवेश करुन त्याचा पुजक झाला याप्रमाणें पुज्य आणि पुजक हे दोघेही एकाच परमात्माची रुपें आहेत ॥२॥

मग अनेक जन्मीं ईश्वराचें भजन करुन आपल्या स्वरुपाचा विचार करण्याची इच्छा होते. विचारांती मायेचा नाश होऊन पुर्वीप्रमाणें अद्वयानंद पुर्ण आहे तसा रहातो. ॥३॥

आत्मा अद्वयानंदरुप असुन त्याला द्वैताचा आरोप आला हाच दुःखरुप बंध आहे आणि स्वरुपेंकरुन जी स्थिति तीच मुक्ति असें ह्मटलें आहे ब्रह्माहमास्मि या ज्ञानापासुन मुक्ति होतें असें जें म्हटलें त्याचा हाच अर्थ आहे. ॥४॥

अविचारापासुन जो बंध प्राप्त झाला आहे त्याची निवृत्ति होण्यास दुसरा उपायच नाहीं. म्हणुन जीवात्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय यांचा सतत विचार करावा ॥५॥

देहादिकाला मी असें म्हणणारा जो चिदाभास त्यास कर्ता असें म्हणतात. तोच जीव. मन हें त्याचें साधन आहे. त्या मनाच्या एक अन्तवृत्ति आणि दुसरी बहिर्वृत्ति अशा क्रमानें होणार्‍या दोन क्रिया आहेत ॥६॥

मी मी अशी जी अंतर्मुख वृत्ति तो कर्त्याला दाखविते. आणि इदम ह्मणजे हें हें ह्माणणारी जी बहिर्मुखवृत्ति तो जगांतील बाह्म वस्तुस दाखविते. ॥७॥

या इदंवृत्तीचे शब्द स्पर्शादि पांच भेद आहेत इंदवृत्ति ही मनाची एकसामान्य वृत्ति आहे वरील पांच भेद घ्राणादिक इंद्रियापंचकांनी निरनिराळे केले आहेत ॥८॥

पुर्वी सांगितलेला कर्ता क्रिया व निरनिराळे विषय या सर्वांस एकदम भासविणारा जो एक कोणी ज्ञानरुप आहेत्यास वेदांत शास्त्रांत साक्षी असें म्हणतात ॥९॥

ज्याप्रमाणें नाटकगृहांतील दिवा ज्या गृहासहित नटप्रेक्शकादिकांस एकदम प्रकाशवितो त्याप्रमाणें मी पाहतों मी ऐकतों मी हुंगतों मी स्वाद घेतों आणि मी स्पर्श जाणतो या सर्व ज्ञान क्रिया त्या साक्षीच्या योगानें एकदम भासविल्या जातात ॥१०॥

ज्याप्रमाणें नाटकगुहांतील मुख्य दिवा मुख्य यजमान प्रेक्षकजन आणि रंगभुमीवर नाचणारी नर्तकी या सर्वांस एकदम प्रकाशित करितो; व त्यांच्या अभावींहीस्वतः प्रकाशमान असतो. ॥११॥

त्याप्रमाणें साक्षी हा अहंकार विषय आणि बुद्धि या सर्वांस भासवुन त्यांच्या अभावी ह्मणजे निद्वादिकक अवस्थांच्या ठायींही तो स्वतः भासतो. ॥१२॥

एथें अहंकारादिकांस बुद्धिच प्रकाशित करतें अशी शंका घेऊ नये कारण तो विकारी असल्यामुळे जड आहे निरंतर ज्ञनरुपेंकरुन भासणारा जो कुटस्थ त्याच्या प्रकारानें ही बुद्धि प्रकाशित होऊन नानाप्रकारचें नृत्य करिते, म्हणजे एकदा घटाकार एकदां पटाकार होते ॥१३॥

एथें अहंकार हा मुख्यं यजमान विषय हे प्रेक्षकजन, बुद्धि ही नाचणारी कालांवंतीर्ण इंद्रिये ही तालमृदंग वाजविणारे आणि त्या सर्वांस प्रकाशविणारा साक्षी हा दिवा असें रुपक बसवावें ॥१४॥

दिवा जसा आपल्या ठिकाणीच असुन सर्वत्र प्रकाश देतो, त्याप्रमाणें साक्षीही आपल्याच ठिकाणी स्थिरराहुन आंत बाहेर प्रकाशवितो. ॥१५॥

एथें आंत बाहेर म्हणुन जो विभाग केला तो साक्षीत लागत नाही. तो देहामुळे झाला आहे देहाचें बाहेर विषय आहेत आणी आंत अहंकार आहे ॥१६॥

एथें साक्षीं आंत बाहेर भासवितो असं जें म्हटलें त्याला अर्थ आंत एकदां भासवितो आणि बाहेर एकदा भासविती असें समजुं नये. कारण साक्षीचेठायी तसे चांचल्य मुळींच नाहीं तसें चांचल्य दिसण्याचें कारण हेंच कीं देहाचे आंत असणारी बुद्धि नेत्रादिद्वारा वारंवार येरझारा घालते तेव्हा त्या बुद्धीचे चांचल्य साक्षींत आहे असें उगीच भ्रांतीने वाटतें ॥१७॥

ज्याप्रमाणे खिडकींतुन घराच्या आंतल्या बाजुस आलेलें किरण स्वर्तः अचल असतांही त्यांत हात नाचविला असतां तें किरणच नाचतें अशीभ्रांति वाटते ॥१८॥

त्याप्रमाणें साक्षीही आपल्या ठिकाणी स्थिर असुन आंत बाहेर येरझारा करीत असुनही बुद्धिच्या चल्यास्तत्व तो करितो अशी भ्रांति होते. ॥१९॥

हा साक्षी बाहेरही नाहीं व आंतहीं नाहीं आंत बाहेर हा देशविभाग केवळ बुद्धिचा आहे बुध्यादिकांचा लय झाला असता तो आपला आहे तेथेंच आहे. ॥२०॥

N/A


References : N/A
Last Updated : March 18, 2010