कांकड आरती - उठा उठा हो साधक, साधा आपु...

कांकड आरती

उठा उठा हो साधक, साधा आपुलालें हित ।
गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत ॥ १ ॥
उठा उठा हो वेगेंशीं, चला जाउं राउळासी ।
झडतिल पातकांच्या राशी, काकडाआरती पहोनी ॥ ध्रु. ॥
जागे करा रुक्मिणीवरा, देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा, इष्ट होईल म्हणऊनियां ॥ २ ॥
उठोनियां हो पांहाटे, पाहा विठ्ठल उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे, अमृतदॄष्टी अवलोका ॥ ३ ॥
पुढें वाजंत्री वाजती, ढोल दमामे गर्जती ।
होत कांकडआरती, माझ्या पंढरीरायाची ॥ ४ ॥
सिंहनाद शंख-भेरी, गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी, नामा चरण वंदितो ॥ ५ ॥

N/A

N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP