उभयद्वादशी :
एक तिथिव्रत. व्रतारंभ मार्गशीर्ष व. द्वादशीला होतो. दर द्वादशीला विष्णूच्या केशव, नारायणादी एकेका रूपाची पूजा करतात. याप्रमाणे वर्षभरात चोवीस रूपांची पूजा होते.
२ भृगूव्रत :
हे तिथिव्रत आहे. मार्ग. व. द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावच्या बारा देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.
३ सुरूप द्वादशी :
मार्ग. व. पुष्पयुक्त द्वादशीच्या आदल्या दिवशी रात्री जितेन्द्रिय राहून विष्णूचे ध्यान करावे आणि श्वेत धेनूच्या शेणाच्या गोवर्या पेटवून त्या अग्नीत घृतादियुक्त तिळाच्या १०८ आहुती देऊन हवन करावे. दुसरे दिवशी नदी, तलाव आदी जलाशयावर स्नान करुन भगवंताच्या सोन्याच्या प्रतिमेची तिळाच्या पात्रात ठेवून पूजा करावी. तीळ, फळे यांचा नैवेद्य दाखवावा. नंतर
'नमः परमशान्ताय विरूपाक्ष नमोस्तुते'
या मंत्राने अर्घ्य द्यावा. ब्राह्मणभोजन घालून ती मूर्ती त्यास दान द्यावी.