वैशाख पौर्णिमा
Vaishakh Purnima - वैशाख पौर्णिमा
१) वैशाखी व्रत :
वैशाखी पौर्णिमा फार मोठी शुभ तिथी आहे. या दिवशी दानधर्मादी अनेक पुण्य कृत्ये करतात. ही जर सूर्योदयापासून दुसरे दिवशी सूर्योदयापर्यंत असेल, तर अधिक प्रशस्त मानली आहे. एरवी ती कार्यानुसार घ्यावी. या दिवशी
(१) धर्मराजासाठी पाण्याने भरलेला कुंभ व मिष्टान्न दान दिल्यास गोदानाचे पुण्य मिळते,
(२) पाच अगर सात ब्राह्मणांना हलवा ( शर्करायुक्त तीळ ) दिला, तर सर्व पापांचा क्षय होतो.
(३) सारवलेल्या भूमीवर तीळ पसरून त्यावर सपुच्छ मृगाजिन शिंगासह अंथरून व उत्तम प्रकारच्या वस्त्रासह दान केल्यास महान फळ मिळ्ते,
(४) तिळाने स्नान करून तूपसाखर आणि तिळाने भरलेला कलश भगवान विष्णूच्या नाममंत्राने आहुती द्यावी, अगर तीळ आणि मध यांचे दान करावे. तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत. तिलतर्पण करावे, अगर गंगास्नान केल्याने सर्व पापांतून मुक्त होतो
(५) जर या दिवशी एकभुक्त राहून पौर्णिमा, चंद्रमा व सत्यनारायणव्रत केले, तर सर्व प्रकारची सुखे, संपदा आणि श्रेयस यांची प्राप्ती होते.
काही ठिकाणी या पौर्णिमेस ' विनायक पौर्णिमा ' असेही म्हणतात. यावेळी धर्मराजाची सुवर्ण प्रतिमा करून तिची षोडशोपचारे पूजा करतात. या दिवशी पाणी भरुन मृत्तिकापात्रे दान, दिली तर सुवर्णपात्रासमान पुण्य मिळते. या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे. मिष्टान्न व तांबूल दानाने गोदान, नौकादान याचे पुण्य मिळते. यामुळे अकाली निधन व कुमृत्यूपासून रक्षण होते.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP