वैशाख शु. त्रयोदशी
Vaishakh shuddha Trayodashi
१) कामदेव व्रत :
कामदेव मदनाची सुवर्णमुर्ती करुन वैशाख शु. त्रयोदशीला तिचे पूजन करावे व उपवास करावा. दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून पूजासामग्रीसहित मूर्तीचे दान करवे व नंतर जेवावे. याप्रमाणे वर्षभर प्रत्येक शु. त्रयोदशीला केले असता सर्व रोग नाहीसे होऊन आरोग्यप्राप्ती होते.
२) पूत्रादिप्रद प्रदोषव्रत :
चैत्रादी महिन्यातील प्रदोषव्रताप्रमाणेच या व्रताचा आचार असला, तरी ' कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे.
१) पूत्रप्राप्तीची इच्छा असेल तर ज्या त्रयोदशी दिवशी शनिवार असेल त्या दिवशी सुरूवात करुन वर्षभर अगर फलप्राप्ती होईपर्यंत हे व्रत करावे.
२) ऋणमुक्त होण्याची इच्छा असेल तर ज्या त्रयोदशीला मंगळवार असेल , तेव्हा सुरूवात करावी.
३) सौभाग्य अगर स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी आरंभ होणारी त्रयोदशी घ्यावी.
४) अभिष्ट-सिद्धी हवी असेल तर सोमवारी सुरू होणारी त्रयोदशी असावी.
५) आयुरारोग्य याची कामना असेल तर रविवारी येणारी त्रयोदशी असावी.
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' असा संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे ' भवाय भवनाशाय ' या मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी. भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP