१) नृसिंह-नवरात्र
ज्यांचे कुलदैवत नरसिंह आहे , त्यांच्या घरी वैशाख शु. अष्टमीपासून पोर्णिमेपर्यंत नृसिंह-नवरात्र असते. नवरात्रकलत नित्यपूजा ; अभिषेक ; पुराणवाचन ; ब्राह्मण-संतर्पण इ. विधी होतात.
२) वैशाख अष्टमी :

या दिवशी या व्रतासाठी म्हणून आम्ररसाने ( आंबरसाने ) स्नान करावे. अपराजितीदेवीला उसीर व जटामांसीमिश्रित पाण्याने स्नान घालावे. नंतर पंचगंधांनी ( जायफ़ळ, पूगफ़ल, कापूर, कंकोळ आणि लवंग ) लेपन करुन गंधफ़ुलांनी पूजा करावी. तूपसाखरयुक्त खिरीचा नैवद्य दाखवावा.स्वत: उपवास करावा व दुसरे दिवशी ब्राह्मणओजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे समस्त तीर्थस्नाचे पूण्य मिळते.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP