चैत्र व. अष्टमी
Chaitra vadya Ashtami
१ जानकी व्रत :
हे व्रत चैत्र व. अष्टमीला करतात. यात जनककन्या जानकीची पूजा करतात. श्रीगुरु वसिष्ठांच्या आज्ञेवरुन श्रीरामचंद्राने समुद्रतटावर असलेल्या तपोभूमीवर बसून हे व्रत केले होते. या व्रतात भाताचे हवन करावे व अनरशांचा नैवेद्य दाखवावा. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता हे व्रत अवश्य करावे.
२ भैरव- शीतल अष्टमी :
चैत्र व. अष्टमी दिवशी शीतलादेवीचे पूजन करतात. प्रथम थंड पाण्याने आणि नंतर दुधाने देवीला स्नान घालून भाताचा नैवेद्य दाखवतात. अन्य उपचारही अर्पण करतात. त्याचप्रमाणे भैरवाचीही पूजा करतात. म्हणून या व्रताला भैरव-शीतला अष्टमी असे म्हणतात.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP