१ ब्रह्मोत्सव :
व्रज मंडळात साजरा होणारा एक उत्सव. चैत्र व. द्वितीयेपासून एकादशीपर्यंत प्रामुख्याने वृंदावनातल्या रंगनाथमंदिरात हा उत्सव होतो. रामानुज सांप्रादायातील हा सर्वात महत्वाचा उत्सव होय. उत्सवाच्या या कालात रंगनाथाला निरनिराळी वाहने करतात व त्याची मिरवणूकही काढतात. वद्य नवमीला रथयात्रा असते. या उत्सवात गावातील सर्व लोक बहुसंख्येने सामील होतात.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP