१ जयंतिअष्टमी :
पौष शु. अष्टमी दिवशी बुधवार असून जर भरणीनक्षत्र असेल तर ती 'जयंती' होते. त्या दिवशी स्नान, दान, जप, होम, देवर्षिपितृतर्पण केल्यास, ब्राह्मणभोजन घातल्यास कोटिपट फळ मिळते.
२ महाभद्राष्टमी :
पौष शु. अष्टमीला बुधवार असेल तर त्या दिवशी स्नानदानादी गोष्टींनी शंकर प्रसन्न होतात, असा विश्वास आहे.