१ उभय सप्तमी :
हे व्रत पौष शु.सप्तमी दिवशी उपवास करून सकाळ, दुपार व सायंकाळ तिन्ही वेळा गंध, फुले,घृतादीनी भगवान सूर्याची पूजा करावी. तापलेल्या तुपात मीठ घालून त्यात तळलेल्या मोदकांचा (क्षारमोदकांचा) सूर्यास नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना भोजन द्यावे. गाय दान द्यावी आणि भूमिशयन करावे, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात.
२ मार्तंड सप्तमी :
पौष शु. सप्तमीस मार्तंड (सूर्य)- पूजा करावी. गाईचे दान द्यावे, याप्रमाणे वर्षभर केल्यास व्रत करणार्यास उत्तम फल प्राप्त होते.