ज्येष्ठ शु. षष्ठी

Jyeshtha shuddha Shashthi


अरण्यषष्ठी :

ज्येष्ठ शु. षष्ठी हे तिथीव्रत आहे.

ज्येष्ठे मासे सिते पक्षे षष्ठी चारण्यसंज्ञिता ।

व्यजनैक करास्तस्यामटन्ति विपिने स्त्रियाः ।'

तां विन्ध्यवासिनीं स्कन्दषष्ठीमाराधयन्ति च ।

कन्दमूलफलाहारा लभन्ते संतति शुभाम् ॥

अर्थ- ज्येष्ठ शु. षष्ठीला अरण्यषष्ठी असे नाव आहे. तिला स्कन्दषष्ठी असेही म्हणतात. त्या दिवशी सुवासिनी हातात पंखा घेऊन वनात हिंडतात. कंद-मुळे-फळे खाऊन उपास करतात व विंध्यवासिनीची पूजा करतात. अपत्यप्राप्तीसाठी हे व्रत आहे.

राजस्थानातल्या स्त्रिया हे व्रत करतात व त्या दिवशी अरण्यात जाऊन अपत्यप्राप्तीसाठी विशिष्ट वनस्पती खातात. यासारखा आणि याच हेतूने प्राचीन ड्‍रुइडिक (Druidic) लोक एक सण पाळीत आणि त्याची तिथीही षष्ठी हीच असे.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP