-
वि. १ सर्वांत धाकटा ; लहान ; वयानें कमीं . २ कमी योग्यतेचा ; कमी प्रतीचा ; हलक्या दर्जाचा ( गुणानें ). विरक्त न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें । ' - दा २ . ९ . २७ . ३ अगदीं खालचा ; कमी ; तिसर्या प्रतीचा ; शेवटचा ( उत्तम , मध्यम , कनिष्ठ या तीन प्रतीपैकीं ). ' येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेवूनी गोड । ' - तुगा ७३४ . ४ अल्प ; थोडा ; लहान . - पु . ( लय ) ( संगीत ) द्रुतलत पहा .
-
०पक्ष पु. उत्तम , मध्यम याच्या खालच्या पक्ष ; कमींत कमीं प्रमाण , स्थिति , अनुक्रम . - क्रिवि . कमींत कमी ; किमान पक्षी ; नाहीं म्हटलें तरी . ' याचें लग्नाला कनिष्ठपक्ष शंभर रुपये लागतील . ( सं .)
-
वि. अगदी , खालचा , शेवटचा , सर्वात धाकटा , सर्वात लहान ;
-
a Younger. Inferior. The least, merciful.
Site Search
Input language: