-
पु. १ ( लांकूड इ० ) तोडण्याची क्रिया ; ( फुले , फळे इ० ) खुडण्याची , तोडण्याची , गोळा करण्याची क्रिया . ) क्रि० करणे ; काढणे ; घेणे ; उतरणे ; तोडणे ). २ ( लांकूड इ० कांचा ) तोडलेला भाग ; तुकडा ; ठोकळा ; ओंडा . सुतळीचा तोडा ३ ( बे . ) मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ] ०मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ]
-
पु. १ ( सोनारी धंदा ) हातांत , पायांत घालावयाचा सोन्याचा , चांदीचा एक प्रकारचा दागिना . २ शिंदेशाही घडणीचीच पण क्वचित पोकळ बनावाची ( स्त्रियांच्या ) हातांतील सोन्याची जाड साखळी . ३ ( को . ) दरवाज्याच्या मुख्य चौकटीच्या वरच्या चौकटीची वगैरे तोड्यासारखी नक्षी . ४ ( पगडबंद ) सांखळीच्य कड्यांच्याप्रमाणे केलेले पागोट्यांतील बांधणीचे काम . ५ लुगड्याच्या कांठांतील कड्यांच्या सांखळीच्या आकाराची विशिष्ट रचना ( इं . ) डिझाईन .
-
पु. ( वाद्य ) सतार वगैरे वाद्यांच्या गतीस शोभणारा स्वरसमूह ; तबल्याचा , नृत्याचा एक विशिष्ट बोल .
-
पु. १ सोन्याची , चांदीची - मोहरा , रुपये इ० हजार नाणी भरलेली पिशवी . - वाडमा १६४ . श्रावणमासी खर्चतो कोट्यावधि तोडा । - राला २ . १०१ . २ बंदुकीतील दारु पेटविण्याचा काकडा ; जामगी . पहार्यास शिपाई उभे पेटवुनी तोडा तोडा । - राला १०१ . ३ दोराचा , दोरीचा , सुतळीचा हात दोन हात लांब तुकडा . ४ कठिण व जाड जरतार . ५ ( दारुकाम ) फुलबाज्या , बाण इ० बांधण्याच्या उपयोगाचा चिखलांत भिजविलेला सुताचा दोरा , वाख . [ तोडणे ] तोड्याची बंदूक - स्त्री . तोड्याने , काकड्याने दारु पेटवून उडवावयाची बंदूक . इच्या उलट चापेची बंदूक .
Site Search
Input language: