|
वि. शंभर . भारताचें शतें सात । सर्वस्वगीता । - ज्ञा १८ . १६६१ . [ सं . ] म्ह० शतं तत्र पंचोत्तर शतं ( शंभर तेथें एकशें पांच ) ऐशीं तेथें पंचायशी ( खर्च करण्यास काय हरकत ? ). [ सं . ] ०क न. शेंकडा ; शंभराचा समुदाय . [ सं . ] ०कूट वि. शेकडों तुकडे झालेला ; शतधा भिन्न . तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे । - ज्ञा १ . १४७ . वाटे उर्वी शतकूट । होऊन जाईल क्षणार्धे । - पांप्र ४१ . २२ . ०कृत्य न. १ ( शतक्रतूबद्दल चुकीचा शब्दप्रयोग ) शंभर अश्वमे यज्ञ करण्यासारखें अचाट कृत्य ; शंभर यज्ञांचें कार्य . २ ( ल . ) एखादें अचाट काम ; महत्कृत्य . शतक्रतु पहा . ३ विशेष प्रकारची चटणी , रायतें . ०कृत्य पुण्य करणें ; चांगली गोष्ट करणें . करणें पुण्य करणें ; चांगली गोष्ट करणें . ०क्रतु पु. १ इंद्र . २ शंभर अश्वमेघ यज्ञ हे केले असतां यजमानाला इंद्रपद मिळतें . ३ ( ल . ) मोठा विजय ; मोठा पराक्रम ; मोठें शौर्य ; अचाट कृत्य . जन्मास आल्यापासून एक तळें बांधलें एवढा कायतो शतक्रतु केला . [ सं . ] ०गुण वि. शंभरपट . शतगुणें स्नेहोवाढला तिसी । - एभा ७ . ६०१ . [ सं . ] ०घृत शंभर वेळां धूवून स्वच्छ केलेलें तूप ( औषधाकरितां ). [ सं . ] ०घ्नी स्त्री. ( शंभरांची हत्त्या करणारा ) लोखंडी भाले , खिळे बसविलेला एक ठोकळा ; एक विशिष्ट हत्यार ; कारलें ; शेंकडों लोक मारण्याचें जुनें आयुध . पट्टिश बाण लोहवृश्चिक उरण । दशघ्नया आणि शतघ्नया । - ह २२ . ३४ . २ एक प्रकारची तोफ ; उल्हाटयंत्र . शतघ्नी नामक अस्त्रें उंच प्रदेशावर नेऊन ठेवावीं . - हिंलई २४ . ०चिंध्या स्त्री. शंभर जागीं फाटलेलें वस्त्र ; नेसतां किंवा वापरतां न येण्याइतकें फाटकें वस्त्र ; लक्तर्या . ०चूर वि. शंभर तुकडे झालेलें . शतकूट पहा . घट घायें कीजे शतचूर । - एभा २२ . ४२७ . ०चूर्ण न. अगदीं चुरा ; तुकडे तुकडे झालेले , पडलेले आहेत अशी स्थिति ; पार चुराडा . फुटोनि होय शतचूर्ण । - अमृ ७ . ६७ . एकेचि घातें शतचूर्ण । - एरुस्व ८ . ४६ . - वि . चुरा झालेला ; विभिन्न . [ सं . शत + चूर्ण ] ०च्छंदी वि. ( शंभर लुच्चेगिर्या , फंद असणारा ) फंदी ; बेढंगी ; वाईट चालीचा . ०च्छिद्र वि. शेंकडों भोकें पडलेला ; चाळण झालेला ( कागद , वस्त्र इ० ). ०जर्जर वि. शंभर ठिकाणीं फुटलेली ; शेंकडों ठिकाणीं खिळखिळी झालेली . शतचूर्ण पहा . यालागीं शतजर्जर नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें । - ज्ञा ९ . ४९० . [ सं . ] ०तंत्रीवीणा स्त्री. एक वाद्य . सारमंडळ पहा . ०तारका स्त्री. १ सत्तावीस नक्षत्रांपैकीं चोविसावें नक्षत्र ( शंभर तार्यांचें मिळून झालेलें ). २ ( ल . ) एखाद्यास अनेक मुली असल्या म्हणजे थट्टेनें म्हणतात . [ सं . ] ०द्वार वि. शंभर द्वारें , दरवाजे , भोंकें वगैरे असलेलें . [ सं . ] ०धा क्रिवि . १ शंभरदां ; शंभरवेळां . २ शेकडों प्रकारांनीं . कैसा शतधा दुर्वादीं । निस्तेजिलासी । - ज्ञा ११ . १०१ . [ सं . ] ०धृति पु. १ ब्रह्मदेव . २ इंद्र . ०धौत वि. शंभरवेळां धुतलेलें ( तूप वगैरे ). ०पत्र न. एक जातीचें कमळ . २ सेवतीचें फूल . - वि . शंभर पाकळया , पानें असलेलें ( कमळ ). [ सं . ] ०पत्रनेत्रा स्त्री. कमलाक्षी ( स्त्री ). तेथूनि तूं मजसि ने शत - पत्र - नेत्रा । - नवनीत पृ . ९७ . [ सं . ] ०पत्रिका एक फुलझाड ; शेवंती . [ सं . ] ०पद पाद पदी - स्त्री . घोण ; गोम . ०पदी स्त्री. शतपावली ; जेवणानंतर अन्नपचनक्रिया सुलभ होण्यासाठीं फेर्या घालणें , थोडें चालणें . [ सं . ] ०पावली स्त्री. शतपदी पहा . ०भाग वि. ( शाप . ) शंभर भाग ज्याचे पाडले आहेत असें . ( इं . ) सेंटिग्रेड . - रसामू ३० . शतंभीष्म - पु . १ ( शंभर भीष्म ; भीष्माचार्या सारखे पुष्कळ , एकाहून एक बलवान ) आपल्या सामर्थ्याची बढाई मारणार्याबद्दल निंदार्थी शब्दप्रयोग ; अनेक वरचढ , अधिकाधिक पराक्रमी पुरुष . तूं आपली एवढी प्रतिष्ठा कशास सांगतोस . तुजसारखे असे शतंभीष्म पडले आहेत . ऐसे दाते शतंभीष्म बहुत आहेत . - शिवाजीचें चरित्र तुझ्या सारखे मी पुष्कळ शतंभीष्म लोळविले आहेत . २ वृध्द ; विशेष ज्ञानी पुरुष . ०मख पु. १ शंभर यज्ञ करणारा ; इंद्र . जें शतमखा लोक सायासें । तें तो पावें अनायासें । कैवल्यकामु । - ज्ञा ६ . ४४१ . २ शंभर यज्ञ . जें शतमखींहीं आंगवणें । नोहेचि एका । - ज्ञा ८ . २६५ . [ सं . ] ०नखोत्तीर्ण वि. ( शंभर यज्ञ करून पार झालेला ) शंभर यज्ञ पूर्ण झाल्यामुळें इंद्रपद मिळालेला ; इंद्र . जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे । - ज्ञा १० . २४० . [ शत + मख + उत्तीर्ण ] ०मान वि. १ शंभराचें माप , मोज ; शंभर संख्या भरणारें . शतमान आयुष्य . २ ( सांकेतिक ) शंभर रुपये दक्षिणा तेथें तुम्हास काय मिळाले ? शतमान किंवा एक शतमान मिळालें . ०मारी वि. १ शंभर रोगांवर रामबाण उपाय करणारा निष्णात ( वैद्य ). २ ( ल . ) शंभर रोग्यांना मारक किंवा त्यांची हत्या करणारा ( वैद्य ). ०मूर्ख पु. ( शंभरपटीनें , शंभरमूर्खा इतका मूर्ख ) अत्यंत मूर्ख , अज्ञानी ; शुध्द , केवळ मूर्ख ; महामूर्ख . [ सं . ] ०वर्ष वार्षिक - वि . १ शंभर वर्षे टिकणारें , चालणारें ; शंभर वर्षाच्या मुदतीचें . २ शंभर वर्षांतून एकदां येणारें . ३ शंभर वर्षाचा ; शंभर वर्षे जगलेला ; शतायुषी . ४ शंभर वर्षासंबंधी . [ सं . ] ०वृध्द पु. शतायु ; शंभर वर्षाचा . जे तो शतवृध्द आहे । नेणों कैचा । - ज्ञा १३ . ५८४ . ०शः अक्रिवि . शेंकडों ; शेंकडयानें , शंभर शंभर अशा संख्येनें मोजलें जाणारें . [ सं . ] ०शाख वि. ( शंभर फांद्या , अंगें , विभाग असलेला ) विविध प्रकारचा ; बहुविध ; नानाविध ; असंख्य प्रकारांनीं युक्त . [ सं . ] शताधीश , शतायु , शतायुषी - पु . १ शंभरांचा स्वामी - मालक ; शंभर लोकांवरील अधिपति . २ ( थट्टेनें ) ज्याच्या जवळ शंभर रुपये आहेत तो . शंभर वर्षे वयाचा , शंभर वर्षे जगणारा . [ सं . ] शताळशी , शताळसी - वि . अतिशय आळशी ; आळश्यांचा राजा . [ सं . शत + आळशी ] शती - स्त्री . शेंकडा ; शे . [ सं . ] ( समासांत उपयोग ) द्वि - त्रिशती . शतं - न . शतकृत्य पहा . रान सुटले ... शतं केले . - ख ९७४ . - वि . शंभर . [ सं . ] शतंजीव - अ . ( शंभर वर्षे जग ) एक आशीर्वाद ; लहान मुलांस शिंक आली असतां त्याची आई अथवा कोणी प्रौढ स्त्रिया उच्चारतात . शिंक आली असतां आयुष्यहानि होते अशी भावना आहे त्यावरून . शतंजीव शिंकतां आळवीसी वो । - मध्व १५ . [ सं . ]
|