|
स्त्री. पु. आंब्यास येणार्या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि . स्त्री. अग्रभाग ; पुढचा भाग ; पुढची जागा . केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्हेच्या इतर झाडाला . एक सोन्याचें नाणें . पुढील फौजेचें तोंड ; पुढें असलेले किंवा गेलेले लोक ; बिनी ; अघाडीची फौज ; पुढील तुकडी . मागें दुरावला श्रीधर । पुढें गेली गाईंची मोहर । - ह १४ . २६ . ( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें . शिक्का . अग्रभागीची निषाणी , खूण , चिन्ह ; ध्वज . तंव बाणाचे वहनासमोर । तो चालिला गरुडमोहर । गरुडें करुनि जर्जर । पडिला तो । - कथा १ . ७ . ( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें . कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा . बोलणें चालणें , कांहीं काम करणें इ० ची परिपाठी . ( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें . रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति . गमनाची दिशा ; गंतव्यस्थान ( क्रि० धरणें ); मार्ग ; रस्ता - ज्ञा ३ . १७१ . पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें . कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ] ( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ] ०बन्द वि. मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ] बाजू . ईश्वराची मोहर धरी - महानु ९० . प्रकार . आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनि मोहरा । जालिया तेहावीरा । रोकडे दाऊं - ज्ञा १७ . १२० . [ सं . मुख ; प्रा . मुह ] मोहर धरणें - अघाडीस जाणें ; पुढरीपण घेणें ; पुढें निघणें ; अघाडीला जाणें . ऐसें म्हणोनी तस्कर । गांवाकडे धरिली मोहर . । मोहरकाडा - पु . अग्रेसर . मोहरकाढ्या , म्होरक्या , मोहरकडा , डी , मोहरपी , प्या - वि . पुढाकार घेणारा ; पुढें होणारा ; ( कोणत्याहि मंडळाचा , सभेचा - संघाचा ) मुख्य इसम किंवा पुढारी ; समारंभाचा चालक ; मालक . मोहरकी , मोहोरकी - स्त्री . ( व . ) ( बैलाच्या किंवा घोड्याच्या वगैरे तोंडाभोवतालून मानेवरुन दुहेरी किंवा तिहेरी विळखे घेऊन बांधलेले ) कातड्याचें किंवा दोरीचें बंधन , घोड्याचें तोंडास बांधलेली पट्टी ; बैलाच्या तोंडास बांधलेली जाळी . मोहरकी गांठ - स्त्री . मोहरकी तयार करण्याची शेतकरी लोकांना अवगत असलेली गांठ . मोहरचा , ला - वि . पुढचा - ला ; अघाडीचा ; पुढें जाणारा ( कालामध्यें , किंवा जागेवर ) भविष्य काळाचा . [ मोहर ] मोहरणें - क्रि . मिरव ; मोर्चा वळविणें . नाना पुनिवेचे अंधारें । दिहा भेणें रातीं मोहरें - अमृ ७ . ४० . मोहरणें - अक्रि . पुढें होणें ; वळणें ; फिरणें . सक्रि . वाजविणें ( पोवा , मोहरी ) गोंजारणें . - तुगा २१३० . मन आकर्षणें ; मोहून टाकणें . गोपी स्त्रियांचें मन मोहरी हा - नदा ५२ . मोहरप - पुढला ; वडील . रामचंद्र पाटील निमे मोकदम मोहरप . मोहरा - पु . बुद्धिबळाच्या खेळांत राजा व प्यादा खेरीज बाकीचीं बुद्धिबळें प्रत्येक . ( यावरुन ) नेता ; मुख्य ; पुढारी . मृदंग वाजविण्याचा एक प्रकार . चेहरा ; मुद्रा ; तोंडावळा ; मुख ; तोंड ; चेहेरेपट्टी ; मुखाची रुपरेषा . देखणा ; पराक्रमी किंवा साधनसंपन्न असा इसम ; ज्याचा चेहरा दिसण्यांत सुंदर आणि इभ्रतदार आहे असा मनुष्य . कोणीहि कोणत्याहि गुणानें उत्कृष्ट असा मनुष्य . कागद , दागिना , सोनें , चांदी , इ० चें पात्र गुळगुळीत व चकचकीत करण्यासाठीं घोटावयाचा मणि किंवा दगड ; अशा घोठण्यानें आलेली चकाकी , तजेला , गुळगुळीतपणा . सर्पाच्या डोक्यांतील कल्पित मणि . हा विषाला मारक आहे असें म्हणतात . - केका ८४ . आघाडी ; अग्रभाग ; पुढील भाग ; पुढची किंवा अघाडीची जागा ; बिनी ; फौजेचा पुढचा भाग . कोर्या कागदामधील शिक्का किंवा आकृती . [ मुखर ] मोहोरा इरेस पडणें - क्रि . अभिमानीं गुंतणें ; अब्रुखातर कोणतें एक कृत्य नेटानें करणें . असें संकट प्राप्त झालें . मोहरा इरेस पडला . आंतून कोणी सल्ल्यास येईनात . - भाब ३ . मोहोरा माघारी फिरविणें - आघाडी मागें फिरविणें ; तोंड फिरविणें . मोहरा - क्रिवि . सामोरा ; आघाडी ; बाजूला ; पुढें ; समोर ; नीट . मग निकट दक्षिणेच्या मोहरा । आले कर्हाड सोलापुरा । मार्गी भेटले महावीरा । परशुरामासी । - कथा २ . २ . ८६ . मोहरी - वि . पुढचा ; अग्रभागचा ; पुढील अघाडीचा . मोहरुन - क्रिवि . ( बा . ) समोरुन ; पुढून ; पुढील ; समोरील ; समोरच्या जागेपासून . मोहरें - न . तोंड ; चेहरा . राजा खेरीज करुन मुख्य आठ बुद्धिबळापैकीं कोणतेंहि एक बुद्धिबळ ; बुद्धिबळांतील प्यादीं व राजा याशिवायचीं बुद्धिबळें . तोंडानें वाजवावयाचें एक वाद्य . शृंगें काहळ्या रणमोहरीं । - मुआदि २३ . ११९ . - क्रिवि . १ पुढें ; च्या समोर , पुढें , अघाडीस . २ ठराविक वेळेच्या पुढील काळांत किंवा दिवसांत . [ फा . मुहरा ; सं . मुख ; प्रा . मुह ; हिं . मुंह ; सिं . मुहु ; गु . मोहो ] रणमोहरें - रणवाद्य . मोहरें घालणें - गोंजारणें . - शर . मोहिरा - पु . अग्रभाग . मोहिरें - न . सन्मुखता . परतले अविद्येचें मोहिरें - अमृ २ . १४ . मोहाडे पहा .
|