|
स्त्री. गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग ; जांघ . बसण्याचा एक प्रकार ; बैठक ( घोड्यावरची , लिहिणाराची इ० ). लगामाच्या बाहेरील बाजूच्या दोन कांबी , कड्या . [ मंडण ] ( वाप्र ) आपली मांडी उघडतां आपणासच लाज वाटते , मांडी उघडतां आपणासच लाज वाटते - स्वतःचीं दुष्कृत्यें उघड करताना स्वतःस लाज वाटते ; स्वतःचीं व्यंगें उघडकीस आणण्याचें कर्म कठीण आहे . ०चें करणें , वर मान ठेवणें - दुसर्याच्या मांडीवर आपलें डोकें टेकणें ; त्याच्यावर बिनदिक्कत विश्वास ठेवणें ; आपली मान दुसर्याच्या हातांत देणें . उसें करणें , वर मान ठेवणें - दुसर्याच्या मांडीवर आपलें डोकें टेकणें ; त्याच्यावर बिनदिक्कत विश्वास ठेवणें ; आपली मान दुसर्याच्या हातांत देणें . ०ठोकणें बैठक मारणें . ०ठोकून राहणें , टेकून राहणें - लढण्यास इ० सज्ज होऊन उभें राहणें . उभें राहणें , टेकून राहणें - लढण्यास इ० सज्ज होऊन उभें राहणें . ०ठोकून , टेकून - ( गायन , लेखन इ० कांविषयीं ) आपली उत्कंठा , तयारी दाखविणें . बसणें , टेकून - ( गायन , लेखन इ० कांविषयीं ) आपली उत्कंठा , तयारी दाखविणें . ०देणें मरणोन्मुख ( वडील ) मनुष्याच्या मानेखालीं मांडी ठेवणें . वृद्ध व्याकूळ होतां मांडी द्यायांसि या समीप रहा । - मोउद्योग १२ . ७० . ०पालटणें संततीविषयीं नवर्याकडून निराश झालेल्या स्त्रीनें संततिसाठीं परपुरुषगमन करणें . ०बांधणें निश्चय करणें . अधिकें जंवजंव औषधी । सेवायाचि मांडी बांधी । - ज्ञा १८ . १५५ . ०मोडणें लेखनव्यवसायास योग्य असें दृढ आसन घालणें . लिहिण्यासाठीं घातलेली मांडी बदलणें ; विचलित करणें . पंचवीस बंद ते मांडी न मोडतां लिहीत असत . - कोरकि ६४ . ०वर , देणें - एखाद्याशीं बरोबरीनें वागणें . घेणें , देणें - एखाद्याशीं बरोबरीनें वागणें . ०वर , बसविणें - दत्तक घेणें . घेणें , बसविणें - दत्तक घेणें . ०वर - दत्तक देणें . देणें - दत्तक देणें . ०वर टाकून , घालून बसणें - निरुद्योगी , स्वस्थ बसणें . मांडीस माडी टेकून बसणें - मांडी टाकून , घालून बसणें - निरुद्योगी , स्वस्थ बसणें . मांडीस माडी टेकून बसणें - एखाद्याशीं स्पर्धा करणें ; टक्कर देणें . बरोबरी करणें . मांडीखालचा - वि . नेहमींचा बसायाचा ; पूर्ण संवयीचा ( घोडा ). स्वाराच्या मांडीखालचा घोडा असावा . सामाशब्द - ०चेपणें चेपणा - नस्त्री . लग्नसमारंभांत सुनमुखाचे वेळीं वरमातेला वधूच्या आईनें द्यावयाचें लुगडें किंवा इतर वस्त्र . नवर्या मुलीस आपल्या माडीवर बसवितांना वरमातेनें हें लुगडें आपल्या मांडीखालीं ठेवण्याची चाल आहे त्यावरुन . [ मांडी = चेपणें ] ०चोळणा पु. निवळ मांड्या झांकणारा चोळणा , विजार ; मांडचोळणा पहा . ०मोड स्त्री. लेखनाचा दृढ व्यासंग ; मेहनत , कसालत ; शीण ; परिश्रम . [ मांडी + मोडणें ]
|