|
न. एक सुगंधी औषधी द्रव्य ; नखला . [ अर . नखत ] पुन . १ मनुष्याच्या हातांच्या , पायांच्या बोटांच्या टोकाला असणारे शिंगाच्या जातीचे पातळ कवच . २ पशूच्या , पक्ष्याच्या पंजाला असणारे तीक्ष्ण अणकुचीदार हाड ; पंजा . ३ खवल्या मांजराच्या अंगावर असलेल्या खवल्यांपैकी प्रत्येक . ४ नखांतील विष ; नखविष . ( क्रि० बाधणे ; लागणे ; धावणे ). ५ थेंब ; अगदी थोडे प्रमाण ( तूप इ० चे ). कुंकवाचे नख . ६ ( सोनारी ) खरवईच्या दुसर्या टोकाशी असणारी नखाकृति लोखंडी मूठ ; ही गडवे घडण्याच्या उपयोगी असते . [ सं . नख ; प्रा . नह ; हिं . नह ; सिं . नहु ; पं . नहुं ; पोर्तु . जि . नई ] ( वाप्र . ) ०दृष्टीस पडणे - ( एखाद्या कुलीन स्त्रीने ) बाहेर मुळीच न दिसणे , पडणे ; पडद्याच्या आंत राहणे ; अति मर्यादशीलपणाने वागणे , ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे , तिचे नख तुझ्या दृष्टीस पडणार नाही . न पडणे - ( एखाद्या कुलीन स्त्रीने ) बाहेर मुळीच न दिसणे , पडणे ; पडद्याच्या आंत राहणे ; अति मर्यादशीलपणाने वागणे , ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे , तिचे नख तुझ्या दृष्टीस पडणार नाही . ०देणे लावणे ठार करणे . नीतीला नख देणारे । - संग्रामगीते ९ . ०नख - दिमाखाने , ऐटीने , कुर्रेबाजपणाने बोलणे . बोलणे - दिमाखाने , ऐटीने , कुर्रेबाजपणाने बोलणे . ०लावणे ( लहान अर्भक इ० कांच्या कोमल गळ्याला ) नखांनी दाबून जीव घेणे , ठार करणे . नख देणे पहा . माझे मर्यादेची रेख । पृथ्वी न विरवी उदक । उदकाते तेज देख । न लवी नख शोषाचे । - एभा २४ . १३९ . अरिहि न करिल असे त्वा केले , कां नख न लाविले जननी । - मोउद्योग ११ . २३ . ०शिरणे शिरकाव होणे ; चंचुप्रवेश होणे . नखांबोटांवर खेळविणे चाळविणे ( एखाद्यास ) भूलथाप देणे ; चाळविणे ; झुलविणे ; भुरळ पाडणे . नखाबोटांवर चालणे ठमकत , ठमकत , मिजासीने चालणे . नखाबोटांवर जेवणे चाखतमाखत , चोखंदळपणे जेवणे . नखाबोटांवर दिवस मोजणे ( एखाद्या गोष्टीची ) अत्यंत आतुरतेने वाट पहाणे , प्रतीक्षा करणे . नखांला आग लागली ( अजून सारे अंग जळायाचे आहे ). संकटावर , संकटे येण्याची नुसती सुरवात झाली , अजून पुष्कळ संकटे यावयाची आहेत ; ( एखाद्याच्या ) नखी दोष नसणे , नखाला माती न लागणे ( एखादा ) अत्यंत शुर्चिर्भूत , निष्कलंक , पवित्र असणे . नखी पातक लागूं न देणे पापापासून अलिप्त राहणे ; यत्किंचितहि पाप न करणे . नको लागो देऊं किमपि विमळे पातक नखी । - सारुह ७ . १४६ . नखेचावीत कुरतुडीत वाजवीत बसणे १ निरुद्योगी , रिकामटेकडेपणाने असणे ; उद्योगधंदा न मिळतां असणे . २ कुंठित , हिरमुसले होऊन बसणे . नखोनखी सुया मारणे शिक्षेचा एक प्रकार . नखोनखी सुया मारिती । या नाव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७१ . जेथे नख नको तेथे कुर्हाड लावणे साध्याच साधनाने काम होईल अशा ठिकाणी मोठमोठी साधने , शक्ति उपयोगांत आणणे . आपलीच नखे आपणांस विखे आपल्याच दुष्कृत्यांनी स्वतःवर आलेली संकटे . म्ह ० जेथे नखाने काम होते तेथे कुर्हाड कशाला . = जेथे क्षुल्लक , अल्प साधनाने , शक्तीने काम होण्यासारखे असेल तेथे मोठे साधन शक्ति कशाला योजावी ? नखहि नको ज्या कार्या , त्या काढावा कशास करवाल । - मोभीष्म ४ . ४६ . साधित शब्द - नखभर वि . नखावर मावण्याइतके ; अत्यंत थोडे . नखभर तूप . नखाएवढा वि . अगदी लहान ; किरकोळ ; क्षुल्लक ( जिन्नस , काम , कर्ज , अपराध , मनुष्य इ० ). मेला नखाएवढा जीव नाही . - नामना १२ . नखाची जीभ स्त्री . नखाखालील नाजूक त्वचा ; जिव्हाळी . सामाशब्द - खुरपा वि . नखाने खुरपून काढता येण्याजोगा ( कोंवळ्या नारळांतील मगज इ० ). [ नख + खुरपणे ] ०जीन न. ( राजा . ) नखे काढण्याचे न्हाव्याचे हत्यार ; नर्हाणी . [ नख + फा ] ०मूळ नखरडुं नखरुं - न . नखाच्या जवळ होणारा फोड , सूज इ० विकार . [ नख + मूळ ] ०वणी न. ज्यांत मनुष्याने नखे बुडविली आहेत असे धार्मिक कृत्यास निषिद्ध मानलेले पाणी . [ नख + पाणी ] ०विख विष - न . १ नखांतील विष ; नखांत एक प्रकारचे विष असून फार खाजविले असतां खाजविलेल्या भागास ते बाधते . खाजवूं नकोस , नखविष बाधेल . २ नखांतील विष बाधून झालेला व्रण , जखम , ( क्रि० बाधणे ; लागणे ; धावणे ). नखविख आणि हिंगुर्डे । बाष्ट आणी वावडे । - दा ३ . ६ . ४८ . [ नख + विख ] ०शिखपर्यंत नखशिखांत - क्रिवि . पायांच्या नखापासून शेंडीच्या अग्रापर्यंत ; आपादमस्तक ; सर्व शरीरभर . दर पंधरवड्यास जरी नखशिखांत क्षौर केले तरी त्याबद्दल आम्ही त्यास दोष देणार नाही . - आगर वाघास पाहतांच नखशिखपर्यंत कंप सुटला . [ नख + सं . शिखा = शेंडी + पर्यंत , अंत ] ०क्षत न. १ नखाने ( शरीर इ० कांवर ) काढलेला ओरखडा . २ ( प्रणयलीलेत ) नखाचा ओरखडा , वण उमटणे . नखक्षताने मृदु किण्वंती नवनवगुण रागिणी । धरावी हृदयी कवटाळुनी । - राला ३६ . दंतक्षत पहा . [ नख + सं . क्षत = जखम , ओरखडा ] नखाग्री क्रिवि . १ नखाच्या टोंकावर . व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा . - केका ५ . २ ( ल . ) लिहितांना चटकन आठवेल इतका पाठ असलेला ( धडा , श्लोक इ० ). जिव्हाग्री पहा . [ नख + सं . अग्र = टोंक ] नखोदक न . नखवणी पहा . [ नख + उदक = पाणी ]
|