|
न. घर ; सदन ; आलय ; आगर ; मंदिर ; मकान . [ सं . ] सामाशब्द - ०कच्छप पु. कांसवाच्या पाठीच्या आकाराचा दगडी पाटा , खल . ०कर्म कृत्य कार्य धंदा - न . घरकाम ; घरगुती धंदा ( विशेषत : बायकांचें - झाडसारवणादि ). ०कलह पु. भाऊबंदकी ; घरगुती तंटा ; यादवी ; अंत : कलह . ०कुक्कुट मार्जार श्वान - पुन . घर - कोंबडा - मांजर - कुत्रा ; पाळलेला कोंबडा वगैरे ; पाळीव जनावर . ०छिद्र न. १ कुटुंबांतील दोष , व्यंग , उणेपणा ; खाजगी वाईट गोष्टी ; वर्मेकर्मे . ( क्रि० काढणें ; बोलणें ). श्रीमंतांच्या घरोघर दुराचार व गृहच्छिद्रें किती असतात हें जवळजवळच्या लोकांस तरी पूर्णपणें विदित असतें . - नि . २ ( ल . ) घरांतील फूट , भेद , बेबनाव ; ज्यामुळें तिर्हाइताचा शिरकाव , फायदा होईल अशी घरांतील गुप्त , नाजुक गोष्ट . ०जात गृहदास अर्थ २ पहा . ०दान न. घर दान करणें . ०दार न. घराचा पुढचा दरवाजा , दार . ०दास पु. १ घरांतील चाकर , गुलाम . २ ( हिंदु कायदा ) दासीपुत्र . ०दासी स्त्री. मोलकरीण . ०निमग्न वि. घरच्या गोष्टींत नेहमीं गुंतलेला ; फाजील गृहासक्त ; घरबशा . ०पति पु. यजमान ; घरधनी ; मालक . ०प्रवेश पु. १ सुमुहूर्त पाहून , धार्मिक विधि करून नवीन घरांत समारंभानें रहावयास जाणें ; घरभरणी ; वास्तुशांति . २ विवाहानंतर नूतन वधूचा स्वगृहीं प्रथम प्रवेश ; वरात . ०भंग पु. घर , कुटुंब , पेढी , मंडळी इ० ची फूट , वाताहत , नाश , मोड ; घरादाराचा सत्यानाश . ०भूमि स्त्री. घराची जागा . ०भेद पु. १ गृहकलह पहा . यादवी . २ गृहच्छिद्रें , घरांतील बिंगे कळण्यासाठीं घरांत भांडण लावणें . ३ घरफोडी ; दरवडा . ०भेदी वि. १ घरांत , कुटुंबांत भांडणें लावणारा , उत्पन्न करणारा ; घरभेद्या . २ घरांतील बिंगें माहीत असणारा . चोर ; दरोडेखोर . ०मंडन न. घराची मांडामांड करणें ; घर सुव्यवस्थित राखणें , सुशोभित , अलंकृत , सज्ज . - वि . घरांतील कर्ता पुरुष . घराला भूषणभूत असा माणूस ; घराचा अलंकार . ०मंडप पु. घरांतला , घरालगत घातलेला ( रस्त्यावरील - सार्वजनिक नव्हे ) मांडव . ०मंत्री पु. दिवाण - मंत्र्यांपैकीं एक ; देशांत शांतता आणि सुव्यवस्था राखणारा मंत्री ; ( इं . ) होममेंबर . ०रत्न न. ( ल . ) मुलेंबाळें . गृहरत्नानि बालका : । ०लंपट लोलुप - गृहनिमग्न पहा . ०वास पु. घरांत राहणें ; गृहस्थाश्रमी असणें . याच्या उलट अरण्यवास . ०विच्छेद पु. कुटुंब निर्वश होणें - करणें ; वंशक्षय ; कुलक्षय . शांति , संमार्जन , शुध्दि - स्त्री . १ घराच्या शुध्दीकरणाचा धार्मिक विधि ; वास्तुशांति ; भूतेंखेते , विटाळ , रोग इ० च्या नाशासाठीं केलेला धार्मिक विधि . २ घराची स्वच्छता ; सारवण , झाडलोट वगैरे करणें . ०संपत्ति स्त्री. १ गृहसौख्य ; घर चांगलें असण्याचें सौख्य . २ मोठा घरखटला ; मोठें कुटुंब ; मोठा परिवार . गृहस्त , गृहस्थ - पु . १ घरबारी ; गृहस्थाश्रमी ; चार आश्रमांपैकीं दुसर्या आश्रमांतील व्यक्ति ( संन्यासी , अरण्यावासी नव्हे ). २ सपत्नीक ; सहकुटुंब ; कुटुंबवत्सल ; प्रापंचिक ; यांच्या उलट फटिंग . ३ कोणी माणूस , इसम , व्यक्ति . ४ भिक्षुक नव्हे तो . ५ कुलीन ; सभ्य ; भला . गृहस्थ , गृहगिरी , गृहपणा , गृहस्थाई , गृहस्थी - स्त्रीपुस्त्री . १ माणुसकी ; सभ्यता ; भळेपणा . २ गृहस्थवृत्ति ; गृहस्थाचें कर्तव्यकर्म , आचरण . ०स्थधर्म पु. गृहस्थाश्रम ; गृहस्थाचीं कर्तव्यकर्मे , वर्तन , वागणूक . श्रीकृष्ण म्हणे सूता सर्वात गृहस्थधर्म सन्मत रे । - मोउद्योग ३ . ५३ . ०स्थभाई पु. सामान्य नोकरपेशाचा ; भिक्षुकीखेरीज धंद्याचा , भिक्षुक नव्हे असा मनुष्य . ०स्थाश्रम पु. चार आश्रमांपैकीं दुसरा आश्रम . गृहस्थधर्म पहा . आतां स्त्रीकरून यथार्थ । गृहस्थाश्रम संपादी । ०स्थिति स्त्री. घरची स्थिति ; घरप्रपंचाची व्यवस्था . ०स्थी वि. गृहस्थाविषयींची ( रीत - भात , वेष , भाषण , डौल , बाणा इत्यादि ). स्थी , अक्षर - न . सुबोध , ठसठशीत , ऐटबाज अक्षर ; व्यवहाराला योग्य असें लेखन . ०स्थी पु. १ घरगुती खर्चाचा बेतबात ; टापटीप . २ घराची आर्थिक , पैशासंबंधीं नीट व्यवस्था ; मितव्यय . कावा पु. १ घरगुती खर्चाचा बेतबात ; टापटीप . २ घराची आर्थिक , पैशासंबंधीं नीट व्यवस्था ; मितव्यय . ०स्थी पु. मितव्यय ; बेतबात ; गृहस्थी कावा . खर्च पु. मितव्यय ; बेतबात ; गृहस्थी कावा . ०स्थी पु. १ गृहस्थाची वृत्ति ; गृहस्थ धर्म . २ टापटिपीची , व्यवस्थितपणाची वागणूक . बाणा पु. १ गृहस्थाची वृत्ति ; गृहस्थ धर्म . २ टापटिपीची , व्यवस्थितपणाची वागणूक . ०स्थी गृहस्थीबाणा अर्थ २ पहा . गृहांगन , गृहांगण - न . घराचें अंगण . गृहांगना - स्त्री . घरधनीण ; मालकीण . गृहांतर - न . दुसरें घर . गृहांतर , गृहाभ्यंतर - न . घराच्या आंतील , खोलींतील भाग . गृहासक्त - वि . गृहनिमग्न पहा . गृहिणी - स्त्री . गृहांगना ; घरधनीण ; पत्नी ; बायको ; विवाहित स्त्री . गृह्य - वि . १ घरासंबंधीं ; घरगुती . २ पाळीव ; माणसाळलेलें . गृह्याग्नि - पु . प्रत्येक त्रैवर्णिकानें लग्नानंतर किंवा वेगळें बिर्हाड केल्यानंतर निरंतर पाळावयाचा अग्नि . विवाहानंतर वधूसह गृहप्रवेश करतेवेळीं ज्या अग्नीवर होम करावयाचा तोच आग्नि पुढें निरंतर जतन करून ठेवावयाचा असतो व यावर नित्य सकाळ - संध्याकाळ होम द्यावयाचा असतो . बेत गृहस्थीबाणा अर्थ २ पहा . गृहांगन , गृहांगण - न . घराचें अंगण . गृहांगना - स्त्री . घरधनीण ; मालकीण . गृहांतर - न . दुसरें घर . गृहांतर , गृहाभ्यंतर - न . घराच्या आंतील , खोलींतील भाग . गृहासक्त - वि . गृहनिमग्न पहा . गृहिणी - स्त्री . गृहांगना ; घरधनीण ; पत्नी ; बायको ; विवाहित स्त्री . गृह्य - वि . १ घरासंबंधीं ; घरगुती . २ पाळीव ; माणसाळलेलें . गृह्याग्नि - पु . प्रत्येक त्रैवर्णिकानें लग्नानंतर किंवा वेगळें बिर्हाड केल्यानंतर निरंतर पाळावयाचा अग्नि . विवाहानंतर वधूसह गृहप्रवेश करतेवेळीं ज्या अग्नीवर होम करावयाचा तोच आग्नि पुढें निरंतर जतन करून ठेवावयाचा असतो व यावर नित्य सकाळ - संध्याकाळ होम द्यावयाचा असतो .
|