|
पु. उंसाची एक जात . भोंस - पु . बोरुसारखें एक तृण . पु. साखर , काकवी , खडीसाखर , गूळ इ . ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५ - ६ हात उंचीची वनस्पती ; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . याचे पांढरा , तांबडा , काळा , पुंड्या , पटरी वगैरे प्रकार आहेत . तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा ; याच्या गुळाचा उतार कमी असतो . २ आड ( ढ ) साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा ; याचा गूळ कसदार व रुचकर असतो . ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा ; याचा गूळ चिकीचा असतो . उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं . हा समशीतोष्ण आहे . रस थंड असतो . वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे . उंसाचा फड ; उभें पीक . उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण . [ सं . इक्षु ; प्रा . इक्खु , उच्छु ; हिं . ऊख . ] ०म्ह१ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा ?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय ? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये . ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें , त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो . ( व . ) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर . उसांत जाऊन वाढें शोधी , किंवा आणणें . उंसांतलें वाड - उसाचा शेंडा , वाढें . ( ल . ) हुषार , होतकरु मुलगा . ०खतविणें उसास खत घालणें . ०साळणें सोजळणें - उसाचीं पानें - पाती सोलणें .
|