-
वि. १ बळकट ; धिप्पाड ; कंटक . २ हुषार ; चतुर ; निपुण ; तज्ज्ञ ; चपळ ( लेखख , वक्ता , योद्धा , स्वार इ० ). ३ वीरश्रीयुक्त ; शूर ; उत्साहपूर्ण ; तल्लख ; धाडशी ( माणुस , मसलत , युक्ति ). - शिदि ३४३ . ४ घनघोर ; भयंकर कडाक्याची ; आवेशाची ; कटाकटीची ; जोराची ( लढाई , कज्जा , भाषण , मेहनत ). ५ थोर ; अफाट ; मजबूत ; साहसी ; बळकट ( सैन्य व्यूह ). ६ अंतःकरणापासूनचा ; निग्रही ; पक्का . ' औरंगजेब कट्टा मुसलमान होता .' ७ पूर्ण ; पुरा ; जाज्वल्य . उ० - कट्ठा सुधारक ; कट्ठा अभिमानी . ( कट = अति , पुष्कळ ; कटखादक = कट्टा खादाड . - भाअ १८३४ .)
-
पु. कापाकाप ; कत्तल ; नाश - पया ३११ . ( अर . कतअ ; सं कृत = कापणें ; प्रा . कट्ट )
-
पु. १ ओटा . ' घरापुढील कट्टा ; ' ' जकातकंठ्ठा ; ' ' देऊळकट्ठा .' २ ( क .) ओझेकर्यांनीं ओझें ठेवण्यासाठीं मोठ्या रस्त्याच्या बाजूला खांद्याइतका उंच बांधलेला ओटा ; धर्मधक्का . ३ जूट . ( सं . कट = आवरणें ; तें . कट्टु = ओटा , बांध ) ४ दुकानांची रंग , जसें - सराफकट्टा . ( का . कट्टु = बांधणे ; कट्ठे = ओटा )
-
०कट्टी ( क .) पंतगांची काटाकाट . ' मी त्याच्या पंतगाशीं कट्टाकाट्टी घालती .'
Site Search
Input language: